फायनल आधीच महेश मांजरेकरांनी सोडला Big Boss Marathi शो ? ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर..

फायनल आधीच महेश मांजरेकरांनी सोडला Big Boss Marathi शो ? ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर..

आता बिग बॉस मराठीचा खेळ अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे घरातील सदस्यांची, विजेतेपद जिंकण्यासाठीची धडपड बघायला मिळत आहे. प्रत्येकजण आता कुठे तरी आपली मैत्री बाजूला ठेवून पुढे, ग्रँड फिनालेकडे वाटचाल करत आहे. बिग बॉस मराठी ३ च्या विजेत्याला तब्ब्ल २५ लाख रुपये इतकी मोठी रक्कम मिळणार आहे.

त्यामुळे या शोचे बजट देखील किती जास्त मोठे असेल, याचा कयास चाहते लावत आहेत. मात्र त्याचसोबत आता अजून एका मोठ्या बाबीबद्दल चाहते बुचकळ्यात पडले आहेत. या आठवड्याच्या चावडीच्या भागात, अचानक महेश मांजरेकर यांनी आपली सूत्रसंचलनाची धुरा सिद्धार्थ जाधवकडे दिली.

अशा प्रकारे ऐनवेळी सिद्धार्थ जाधवला होस्टिंग करायला लावण्यामागचे नक्की काय कारण आहे, हा प्रश्न आता चाहत्यांना सतावत आहे. शोच्या सुरुवातीला, ग्रँड प्रीमियरच्या रात्री देखील सिद्धार्थ जाधव झळकला होता. पण त्यानंतर कोणत्याही भागात तो आला नाही. मग अखेच्या टप्प्यात सिद्धार्थ जाधव कसा काय आला, असा सवाल शोचे चाहते करत आहेत.

आता कदाचित महेश मांजरेकर बॉग बॉस होस्ट करणार नाहीत अशा चर्चा देखील सुरु आहेत. तर याबद्दलचा मोठा खुलासा आम्ही करणार आहोत. बिग बॉस मराठीचे चौथे पर्व कदाचित महेश मांजरेकर होस्ट करणार नाहीत, हे सत्य आहे. महेश मांजरेकर यांनी कॅ’न्सर सारख्या आजारावर यशस्वीपणे मात केली.

आणि उपचार सुरु असताना देखील त्यांनी ‘अंतिम’ सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले. उपचार संपल्यानंतर त्यांनी लगेच बिग बॉसचे होस्टिंग सुरु केले, त्यामुळे त्यांच्याकडून नवीन पिढीला खूप काही शिकायला मिळत आहे. सगळीकडूनच त्यांचे कौतुक देखील करण्यात येत आहे. मात्र असे असले तरीही, त्यांची शारीरिक प्रकृती बघता, आराम आणि शांतीची त्यांना खूप जास्त आवश्यकता आहे.

एकूणच सर्व काही बघता, त्यांना काही टाळण्याचा सल्ला त्यांच्या डॉक्टरांनी दिला आहे. जास्त ताण येईल अशा गोष्टी आवर्जून टाळायच्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये, बिग बॉस शोचे होस्टिंग करणे सहाजिकच त्यांच्यासाठी धोक्याचे आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची बाब लक्षात घेता, बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचे सूत्रसंचालन आता महेश मांजरेकर करणार नाही.

त्याचबरोबर, बिग बॉसच्या मेकर्स सोबत म्हणजेच वायोकॅम १८ सोबत त्यांचा तीन वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट होता. त्यामुळे आता या सीझनसोबत हा कॉन्ट्रॅक्ट देखील संपत आहे. मग आता कॉन्ट्रॅक्ट पुन्हा एकदा रिन्यू करणार की नाही, हे अजुनपर्यंत निश्चित झालेले नाहीये. सिद्धार्थ जाधवला याबद्दल विचारले असता, सध्या आपण बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाच्या ग्रँड फिनालेकडे लक्ष देऊ या, असं उत्तर देत त्याने मूळ मुद्दा टाळला.

तेव्हा आता बिग बॉस ३ चे विजेतेपद कोण पटकावणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. बिग बॉस मराठी १ची विजेती अभिनेत्री मेघा धाडेला पहिले ३ सदस्य कोण असतील असं विचारण्यात आल्यावर, विशाल, जय आणि मीनल यांचे नाव तिने घेतले.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *