कुंभ मेळा संपल्यानंतर नागा साधू कोठे होतात गायब..? जाणून घ्या ‘कसे’ असते नागा साधूंचे रहस्यमय जीवन..

आपल्याकडे धार्मिक महत्त्व फार मोठ्या प्रमाणात आहे. त्याप्रमाणे धार्मिक उत्सव देखील मोठ्या प्रमाणात साजरे होत असतात. सध्या गणेशोत्सवाचा कालावधी आहे. त्यानंतर शारदा देवी, दुर्गा देवीचे आगमन होणार आहे. त्यानंतर नवरात्राचा उत्सव सुरू होतो. तसेच कुंभमेळा देखील भारतीयांसाठी एक उत्सवाप्रमाणेच असतो. कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी देशभरातून भाविक दाखल होत असतात.
गेल्या काही वर्षापासून कुंभमेळा दाखल होण्यासाठी परदेशातून साधू व भाविक देखील येत असतात. मात्र, या कुंभमेळ्यात सर्वाधिक आकर्षण असते ते नागा साधूचे नागा साधू हे अतिशय वेगळ्या पद्धतीने वावरतात. त्यामुळे त्यांच्याविषयी सर्वांनाच आकर्षण असते.
मात्र, कुंभमेळा संपल्यानंतर ते नेमके काय करतात, कुठे जातात, काय खातात याविषयी सर्वांनाच उत्सुकता असते. आजवर याबाबत फारशी माहिती उपलब्ध झालेली नाही. तरी आम्ही आपल्याला या लेखांमध्ये नागा साधूंकच्या एकूणच जीवनशैली बद्दल माहिती देणार आहोत.
सध्या प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू आहे. मात्र, कोरोना महामारीमुळे यंदा याला काही मर्यादा आलेल्या आहेत. त्यामुळे काही प्रमाणात नागा साधू या मेळाव्यात दिसत आहेत. नागा साधू अर्धकुंभ, महाकुंभ येथे मोठ्या प्रमाणात दिसतात. नागा साधू होण्यासाठी फार मोठे कष्ट करावे लागतात. यासाठी मोठे परिश्रम आणि धार्मिक महत्त्व देखील आहे. नागा साधू होण्यासाठी आधी नागा आखाडा येथे जावे लागते.
त्यानंतर तेथे आखाडा ज्याला नागा साधू व्हायचे त्याच्याबद्दल इत्थंभूत माहिती घेतात. त्यानंतर त्याची प्राथमिक परीक्षा घेण्यात येते. आखाडामधील साधूना जर वाटले की हा व्यक्ती नागा साधू होऊ शकतो, त्यानंतर त्याला पुढील परीक्षेसाठी पाठवले जाते. यामध्ये ब्रह्मचर्य, वैराग, धर्म आणि इतरांची दीक्षा देण्यात येते. त्यानंतरच त्याला पुढे पाठवण्यात येते. दिक्षा घेण्याचा कालावधी हा एक वर्ष ते बारा वर्षांपर्यंत असू शकतो.
दुसऱ्या क्रियेत नागा साधू यांचे मुंडन करण्यात येते. त्यानंतर त्यांच्याकडून पिंडदान देखील करुन घेण्यात येते. पिंडदान करणे म्हणजे आपल्या सर्व नातेवाईकांचे पिंडदान करून सर्वांवर पाणी सोडणे होय. म्हणजेच त्याच्यासाठी सर्वजण मृत झाले असे समजायचे आणि स्वतः देखील श्राद्ध करायचे, असा त्याचा अर्थ होतो.अनेकदा नागा साधुकडे पाहताना त्यांच्या अंगाला मोठ्या प्रमाणात भस्म लागलेले आपण पाहिले असेल.
अनेकांना प्रश्न पडतो की, हे भस्म आले कुठून आणि कशाची आहे, तर हे भस्म नेमके चितेच्या राखीचे असते. चितेची ही राख अतिशय शुद्ध करून नागा साधू ती आपल्या अंगाला लावत असतात. आजवर अनेकांना प्रश्न पडतो की, नागा साधू हे कुंभ मिळाल्यानंतर कोठे जातात, कोठे राहतात, तर नागा साधू हे कुंभमेळा झाल्यानंतर हिमालय, काशी आणि गुजरात राज्यात राहत असल्याचे पाहायला मिळते. तसेच उत्तराखंडच्या पहाडी भागात देखील ते राहतात.
एकांतवास भेटावा म्हणून अनेक साधू हे गुफा मध्ये घर करुन राहत असतात. तसेच कुंभ मेळा संपल्यानंतर अनेक साधू हे जंगलात भटकत असतात. जंगलात त्यांना कशाचीही भीती वाटत नाही. त्यांचे मन आणि शरीर तेवढे कणखर बनले असते. तिथे सर्व गोष्टीवर मात करू शकतात, असे सांगण्यात येते.
नागा साधू हे दिवसातून केवळ एकच वेळेस जेवण करतात. एकच वेळेस जेवण म्हणजे पोटभर खाऊन घ्यायचं. नंतर दिवसभर काहीही नाही खायचे. नागा साधू चे जीवन एकूणच रहस्यमय घटनांनी भरलेले आहे. यावर अनेकांनी डॉक्युमेंटरी देखील तयार केलेल्या आहेत.