कोणता पक्षी डोके पुढे असून सुध्दा मागील सर्व काही पाहू शकतो ? नाव ऐकून चकित व्हाल…

कोणता पक्षी डोके पुढे असून सुध्दा मागील सर्व काही पाहू शकतो ? नाव ऐकून चकित व्हाल…

पक्षी हे उंच उडणारे दोन पायांवर चालणारे पिसे असलेले गरम रक्ताचे जीव आहेत. जीवशास्त्रानुसार पक्ष्यांची व्याख्या फेदर्ड बायपेड अशी होते. याचा अर्थ पिसे असलेले दोन पायांचे प्राणी. पक्ष्यांचे सर्वांत चांगले वैशिष्ट्य म्हणजे त्यांची उडण्याची क्षमता. ही क्षमता पक्ष्यांना इतर प्राण्यांपेक्षा वेगळे ठरवते. पेंग्विन व शहामृग असे फारच थोडके पक्षी वगळता इतर सर्व पक्ष्यांना उडता येते.

त्यांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची पिसे. सर्व पक्ष्यांना पिसे, चोच व चार कप्याचे हृदय असते. हृदयाच्या चार कप्यांमुळे पक्षी उष्ण रक्ताचे आहेत. पिसांच्या व चोचीच्या रचनेमुळे पक्षी वजनाने अतिशय हलके असतात. पिसे त्यांचे थंडीपासून सं‍रक्षण करतात व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उडण्याची शक्ती देतात.

पक्ष्यांची उत्पत्ती प्राचीनकालीन डायनासॉरपासून झाल्याचे मानण्यात येते. सुरुवातीला ही कल्पना पटणे थोडेसे कठीण होते. कारण डायनासॉर थंड रक्ताचे सरपटणारे प्राणी, तर पक्षी उष्णरक्तीय उडणारे प्राणी. मात्र उत्खननात सापडलेल्या पुराव्यांमुळे. ही कल्पना सत्य असल्याचे दिसून आले. गेल्या शतकात जर्मनीतील एका खाणीत आर्चिओप्टेरिक्स या पक्ष्याचा सांगाडा मिळाला.

या सांगाड्याला पंखांची रचना होती व पंखामध्ये पक्ष्यांमध्ये न आढळणार्याओ नख्या होत्या. सांगाड्यात सरपटणार्या् प्राण्यांना असतात तशा जबड्याऐवजी आजच्या पक्ष्यात आढळणारी चोच होती. शिवाय पक्ष्यांमध्ये नसलेली लांब शेपटी होती. अशा प्रकारे या उत्क्रांतीमधील महत्त्वाच्या दुवा असलेल्या त्या सांगाड्याने सिद्ध केले की पक्षी हे सरपटणार्याश प्राण्यांपासून बनले असले पाहिजेत.

चला आज आपण IAS किंवा MPSC परीक्षेत पक्ष्यांवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर चर्चा करू. पक्ष्यांबद्दल जनरल माहिती तर तुम्ही वर वाचली आहे चला आता प्रश्न उत्तरे बघू.

1) प्रश्न: कबूतर कोणत्या वैज्ञानिक नावाने ओळखले जाते?
उत्तर: कोलंबो लिव्हिया
2) प्रश्नः कोणता पक्षी एकाच वेळी पुढे आणि मागे दोन्हीकडे पाहू शकतो?
उत्तर: बदक
3) प्रश्नः भारताच्या सर्वात उंच पक्ष्याचे नाव काय आहे?
उत्तरः सारस क्रेन

4) प्रश्नः कोणता पक्षी मान वर करून पाण्यात पोहतो?
उत्तरः साप पक्षी
5) प्रश्नः जपानची राजधानी, टोकियो कोणत्या आडनावावरून ओळखली जाते?
उत्तर: ओसाका
6) प्रश्न: सिंधू संस्कृतीचे बंदर कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर: लोथल
7) प्रश्नः गाव जत्रेत पंजीकरण शुल्कचे उत्पन्न कोणाला मिळते?
उत्तर: जिल्हा परिषदेला

पक्ष्यांची व्याख्या करणे सोपे आहे. सगळ्या जगात पिसे असलेले प्राणी म्हणजे पक्षीच. पक्षी साधारणपणे उडतांना, घरटी बांधतांना आणि अंडी घालतांना बघायला मिळतात म्हणून सगळे पक्षी सारखेच असतात असा समज आहे. परंतू जरा बारकाईने निरीक्षण केले तर ह्या पक्ष्यांमध्ये विविध प्रकारचे आकार असतात आणि ते इतर पक्ष्यांच्या तुलनेत एकसारखे नसतात. ह्याचे उदाहरण बघायचे ठरले तर मानवाच्या हाताच्या अंगठ्या एवढा इवलासा सुमधुर गुणगुणणारा हमिंग बर्ड तर दुसरीकडे घोड्याच्या उंचीएवढा मोठा शहामृग असे वेगळेपण बघायला मिळते.

आज पृथ्वीवर पक्ष्यांच्या जवळपास ८६५० जाती असून भारतातील १२०० पक्ष्यांच्या जाती आहेत. म्हणजेच भारतातील पक्ष्यांची संख्या मोठी आहे आणि एकाच देशात आढळणा-या पक्ष्यांचे विविध प्रकार ह्यात आढळतात. आपल्या देशात आढळणारे थंड हवामान, राजस्थान मधील कोरडे वाळवंटी हवामान, डोंगराळ भागातील थंड हवामान, उष्ण आणि दमट हवामान, हिमालयातील थंड हवामान असे हवामानाचे वैविध्य आपल्या देशात आढळून येते आणि पक्ष्यांसाठी हे अनुकुल ठरते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *