यावेळी ‘देवमाणूस-2’ मध्ये डॉक्टरच्या भूमिकेत किरण गायकवाड नाही? तर…

यावेळी ‘देवमाणूस-2’ मध्ये डॉक्टरच्या भूमिकेत किरण गायकवाड नाही? तर…

काही मालिका अगदी हटके अशा विषयावर आधारित बनलेल्या असतात. या मालिका बनवताना त्या प्रेक्षकांना आवडतील किंवा नाही याबद्दल शंका असतेच. या मालिका कधी कधी अगदी सुपरहिट ठरतात तर अनेकवेळा लवकरच बंद होतात. पण काही मालिका चांगल्याच लोकप्रिय ठरतात. या मालिकाचे कथानक नेहमीपेक्षा वेगळे असते आणि म्हणून त्या मालिकासाठी आतुरता चाहत्यांच्या मनात असते.

मालिकेत पुढे नक्की काय होणार आणि कथानक कसे वळण घेणार हे बघण्यासाठी चाहते उत्सुक असतात. याच काही निवडक मालिकांपैकी एक देवमाणूस देखील आहे. या मालिकेने 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. मालिकेचा पहिला सिजन संपला आणि आता मालिकेचा दुसरा सिजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या मालिकेने बोलीवूडकरांना देखील चांगलेच वेड लावले आहे. त्यामुळे तर स्वतः रणवीर सिंग देवमाणुसच्या प्रमोशनसाठी उतरला असल्याचे आपण पाहिले. देवमाणूस २ या मालिकेचे चित्रीकरण नुकतंच सुरू झालं आहे. अभिनेत्री श्वेता शिंदेने आपल्या इन्स्टाग्रामवरुन याबद्दलची एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

ती परत आलीये या मालिकेच्या जागी आता देवमाणूस मालिकेचे दुसरे पर्व प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेमध्ये डॉक्टरची भूमिका अभिनेता किरण गायकवाड याने साकारली होती. ता भूमिकेत त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. पण आता या दुसऱ्या सिजनमध्ये डॉक्टरच्या भूमिकेत किरण गायकवाड दिसणार आहे की नाही यावरून प्रेक्षकांच्या मनात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

स्वतः किरण ने इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमुळे हा सर्व गोंधळ उडाला आहे. किरण गायकवाडने त्याच्या इन्स्टा स्टोरीला स्व:ताचा फोटो पोस्ट केला आहे. देवमाणूस-2 येत आहे, पण यावेळी मी नाही असं लिहिलं होते. म्हणून प्रेक्षकांचा चांगलाच गोंधळ उडाला. डॉक्टरच्या भूमिकेत इतर कोणाचा विचार चाहते करूच शकत नाही.

मग किरण गायकवाड नाही तर कोणता अभिनेता डॉक्टरांच्या भूमिकेत दिसणार? मात्र हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे समोर आले आहे. यामुळे मालिकेच्या चाहत्यांना मोठा देखील दिलासा मिळाला आहे. डॉक्टरच्या भूमिकेत किरण गायकवाडच दिसणार असल्याचे पक्क झालं आहे. 15 ऑगस्टला मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला होता.

अखेरच्या भागासाठी चाहते चांगलेच उत्सुक होते. पण शेवटी प्रेक्षकांची निराशाच झाली. अखेरच्या भागात तरी देवी सिंग पो’लिसां’च्या ताब्यात जाणार अशी आशा प्रेक्षकांना होती, पण तसं झालं नाही. त्याउलट शेवटी चंदाचा आणि विजयचा मृ’त्यू दाखवला आहे. सोबतच नव्यानेच मालिकेत एन्ट्री झालेल्या स्त्रीचा देखील डॉ’क्टरने खू’न केलेला दाखवन्यात आले आहे.

वाड्यातील आणि गावातील लोकांना देवमाणसाचा अर्थात डॉक्टरांचा खरा चेहरा मात्र समजला नाही. चंदा आणि डॉक्टरचे नि”धन झाले असल्याचे बातमी लोकांना समजते. डॉक्टरच्या निधनाच्या बातमीने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. थोडक्यात पूर्ण शेवट अनपेक्षित पाहायला मिळाला. देवमाणूसच्या दुसऱ्या सीजनसाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता बघितली जात आहे.

मालिकेचे अनेक प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. मालिकेचा नवीन प्रोमो पाहून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. दुसऱ्या सिजनचे प्रमोशन करण्यात मेकर्स कोणतीच कमी ठेवत नाहीयेत. अतिशयोक्ती म्हणजे प्रमोशनसाठी डॉक्ट’रचा पुतळा देखील उभारण्याता आला होता.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *