तुमच्या लघवीच्या रंगावरून समजेल किडनीचे आरोग्य! या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात…

तुमच्या लघवीच्या रंगावरून समजेल किडनीचे आरोग्य! या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात…

आपले शरीर आपल्याला अवयव निरोगी आहेत किंवा नाहीत याबद्दल काही संकेत देत असतात. मात्र, आपल्याला त्याबद्दल फारशी माहिती नसते म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. स्वतःचे शरीरी निरोगी राहावं यासाठी आपले अवयव स्वस्थ असणे देखील महत्वाचे असते.

यकृत, हृदय, किडनी, असं आपले सगळेच अवयव स्वस्थ आणि निरोगी असणे खूप आवश्यक असते. हृदय, यकृताबरोबरच किडनीचे स्वास्थ्य देखील महत्त्वाचेच ठरते. किडनी अर्थात मूत्रपिंडचे आजार एकदा सुरु झाले की, अखेरपर्यत त्याच्याशी संघर्ष करावाच लागतो.

मात्र, मूत्रपिंड निकामी होताना आपले शरीर आपल्याला काही खास संकेत देतात. त्याकडे वेळीच लक्ष दिल्यास मोठाले आजार सहजपणे टाळू शकतो. मूत्रपिंड म्हणजेच किडनी निकामी झाल्यावर, आपल्या लघुशंकेचा रंग बदलतो. लघवीचा रंग बदलणे याव्यतिरिक्त सुरुवातीचे काही लक्षण आहेत, ज्यावरून किडनी फेल्युअर बद्दल आपल्याला संकेत मिळू शकतात.

आज आम्ही तुम्हाला याच लक्षणांबद्दल सांगणार आहोत. उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा काही विशेष औषध मूत्रपिंड निकामी करण्यास कारणीभूत ठरू शकतात. आजार बराच वाढल्यानंतर, किडनी फेल्युअरची लक्षण दिसतात. पण यामध्ये सर्वात सुरुवातीचे लक्षण म्हणजे लघवी कमी होणं.

सांधेदुखी आणि श्वास लागण हि देखील मूत्रपिंड निकामी होण्याची लक्षणं आहेत. अंगावर खाज सुटणं हेदेखील मूत्रपिंड निकामी होण्याचं मोठं लक्षण आहे. स्किन ऍलर्जी आहे, किंवा खरचटलं असेल, असं समजून आपण याकडे दुर्लक्ष करतो मात्र सतत अंगावर्जर खाज येत असेल तर हे किडनी फेल्युअरच एक मोठं लक्षण आहे.

त्याचबरोबर डोकेदुखी आणि सतत थकवा येणं हेदेखील मूत्रपिंड निकामी होण्याच लक्षण आहे. अनेकांना रात्री झोप लागत नाही आणि भूक देखील कमी लागायला सुरुवात होते. त्यामुळे वजन कमी होणे, समरणशक्ती कमी होणं हे सुद्धा मूत्रपिंड निकामी झाल्याची लक्षणं आहेत. यासर्वांमधे तुमच्या लघवीचा रंग काही प्रमाणात मूत्रपिंडाच्या आरोग्याबद्दल सूचित करू शकतो.

१.स्वच्छ अथवा फिकट पिवळा रंग – तुमच्या लघवीचा रंग जर स्वछ किंवा फिकट पिवळा असेल तर, तुमच्या शरीरात पाण्याची पातळी योग्य असल्याच हे चिन्ह आहे.

२. गडद पिवळा रंग – शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास म्हणजेच डिहायड्रेशन झाल्यास तुमच्या लघवीचा रंग गडद पिवळा होतो. अशा स्थितीत जास्तीत जास्त पाणी पिणे योग्य असते.

३. केशरी रंग – जर तुमच्या लघवीचा रंग केशरी असेल तर थोडा चिंतेचा विषय आहे. तुमच्या शरीरात पाण्याची तीव्र कमतरता असल्यास किंवा रक्तामध्ये पित्ताचं प्रमाण वाढल्याच हे लक्षण आहे.

४. गुलाबी किंवा लाल रंग – लघवीतील रक्तामुळे असा रंग आढळतो. तेव्हा नक्कीच तुमच्या डॉक्टरांना लवकरात लवकर संपर्क साधा. मात्र कधी कधी स्ट्रॉबेरी आणि बीटसारखे पदार्थ खाल्ल्यामुळं देखील लघवीचा रंग लाल होतो.

५. लघवीत फेस दिसणं – मूत्रपिंडाच्या आजाराचं लक्षण लघवीतील प्रथिनांचं प्रमाण दर्शवतं. लघवीत फेस दिसत असल्यास ते मूत्रपिंड निकामी होण्याचं प्रमुख लक्षण असू शकतं. अशा परिस्थितीमध्ये वेळ न दवडता आपल्या डॉक्टरांकडून ट्रीटमेंट सुरु करणेच योग्य ठरते.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published.