‘हे’ घरगुती उपाय करून खोकल्याला द्या कायमची सुट्टी..

गेले काही दिवसांपासून जगभरामध्ये कोरोनाची साथ सुरू असून यामुळे सर्वांमध्ये भीतीचे वातावरण आहे. को रो ना मध्ये खोकल्याचे लक्षण देखील आहे. खोकला हा पावसाळी वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पाहायला मिळते आणि खोकला झाला की कोरोना झाला की काय, अशी शंका देखील अनेकांना येते. त्यामुळे यात आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे.
सध्या वातावरणामध्ये प्रचंड बदल होत आहे. कधी पाऊस तर कधी प्रचंड ऊन पडत आहे. यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे. अनेकांना थंडी ताप आणि खोकल्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावर तुम्ही नियमितपणे डॉक्टरांना दाखवतो. यावर घरगुती उपाय करून खोकला हा कायमचा दूर ठेवू शकतो.
तुम्हाला जर खोकल्याचा त्रास जाणवत असेल तर
1. तव्यावर तुरटी भाजून घ्या. त्यानंतर त्याची पावडर बनवून गुळासोबत नियमित सेवन करा. यामुळे तुमचा खोकल्याचा त्रास नाहीसा होण्यास मदत मिळते.
2. मोहरीच्या तेलामध्ये चार-पाच पाकळ्या लसूण टाकून गरम करा. झोपण्यापूर्वी कोमट तेल आणि पायाच्या तळव्यावर छातीवर मालिश करा. यामुळे देखील तुमचा खोकल्याचा त्रास काही प्रमाणात कमी होऊ शकतो.
3. एक कप पाण्यात आल्याचा तुकडा चिमुटभर दालचिनी आणि मिरी टाकून उकळून घ्या. कोमट झाल्यावर गाळून मध मिसळून घ्या. याचे सेवन करा. यामुळे खोकल्याचा त्रास कमी होतो.
4. लसणाच्या तीन-चार पाकळ्या आणि अर्धा चमचा हळद एक ग्लास दुधामध्ये टाकून उकळा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी घ्या. याचे सेवन केल्यानंतर खोकल्याचा त्रास कमी होतो.
5. एक चमचा कांद्याच्या रसामध्ये एक चमचा मध मिसळून करून सकाळी उपाशीपोटी घ्या. यामुळे खोकल्याचा त्रास कमी होतो.
6. एक कप पाण्यात चार पाच लवंग टाकून उकळा. कोमट झाल्यानंतर यात लिंबू पिळा. एक चमचा मध मिसळून घ्या. रोज घेतल्याने तुमचा खोकला कमी होतो.