कौन बनेगा करोडपतीमध्ये 5 कोटी जिंकणाऱ्या सुशील कुमारचे नंतर काय झाले?

कौन बनेगा करोडपतीमध्ये 5 कोटी जिंकणाऱ्या सुशील कुमारचे नंतर काय झाले?

बिहारचा सुशील कुमार कौन बनेगा करोडपती 11 व्या सिजनच विजेता होता आणि त्याने त्यात 5 कोटी जिंकले. शोमध्ये येण्याआधी सुशील कुमार मोतीहारीमध्ये संगणक ऑपरेटर म्हणून काम करत असे. 5 करोड जिंकण्यापूर्वी त्याचा पगार फक्त सहा हजार रुपये महिना होता. 5 कोटी जिंकल्यानंतर त्याला केबीसीने 3 कोटी 40 लाख रुपयांमध्ये दिले होते. त्यानंतर त्याला केबीसी जिंकल्यानंतर ग्रामीण विकास मंत्रालयाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर देखील बनविण्यात आले. एक संगणक ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या सुशील कुमार एकदा सरकारी अधिकारी होण्याची आकांक्षा बाळगली, पण केबीसीच्या यशानंतर त्यांनी प्रयत्न सोडून दिले. त्यानंतर सुशील कुमार कंगाल झाला आहे अशी बातमी मीडियामध्ये यायला लागल्या त्यात सुशील कुमारची नोकरी गेली आणि त्याने जिंकलेले 5 कोटी देखील त्याने खर्च करून टाकले अशा प्रकारच्या त्या बातम्या होत्या.

पण यात काही तथ्य नसून एकदा त्याला एका पत्रकाराचा फोन आला आणि त्याने विचारले की शोमध्ये जिंकलेल्या पैशाचे काय झाले? सुशीलने विनोद केला आणि सांगितले की पैसे संपले आणि त्यानंतर ही बातमी मीडियाने व्हायरल केली. नंतर जिंकलेल्या पैशाचे काय झाले?कर कपातीनंतर त्याला 5 कोटीपैकी फक्त 3.6 कोटी रुपयये बक्षिस म्हणून मिळाले होते. सुशील कुमारचे 18 सदस्यांचे कुटुंब आहे. त्यासाठी त्याने एकत्र राहत असे घर बांधले. त्याला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. काही पैशांचा त्याने त्याच्या भावांसाठी व्यवसाय सुरू केला. उर्वरित पैसे त्याने बँकेत जमा केले आहे. त्याने बँकेत जमा केलेल्या रुपयांचे व्याजवर त्याच्या कुटुंबाचा खर्च चालू आहे आणि आता त्याच्याकडे सुमारे दोन कोटी रुपये आहेत. त्याने मिळून काही गायीही घेतल्या आणि तेही त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. सुशील सामाजिक कार्य आणि पर्यावरण वाचविण्यातही खूप गुंतलेला आहे.

कुमार आता समाजसेवा आणि पर्यावरणीय कामात सक्रिय आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील 100 मुलांच्या शिक्षणाचा खर्च तो करतो. त्याच वेळी, तो घरातील चिमण्यांच्या संरक्षणाच्या मोहिमेमध्ये सामील आहे, ज्यांची संख्या अलिकडच्या काळात खूप कमी झाली आहे. त्याने 70 हजाराहून अधिक रोपांची लागवड देखील केली आहे. बिहारचा सुशील कुमार कौन बनेगा करोडपती 11 व्या सिजनच विजेता होता आणि त्याने त्यात 5 कोटी जिंकले. शोमध्ये येण्याआधी सुशील कुमार मोतीहारीमध्ये संगणक ऑपरेटर म्हणून काम करत असे. 5 करोड जिंकण्यापूर्वी त्याचा पगार फक्त सहा हजार रुपये महिना होता. 5 कोटी जिंकल्यानंतर त्याला केबीसीने 3 कोटी 40 लाख रुपयांमध्ये दिले होते. त्यानंतर त्याला केबीसी जिंकल्यानंतर ग्रामीण विकास मंत्रालयाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर देखील बनविण्यात आले. एक संगणक ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या सुशील कुमार एकदा सरकारी अधिकारी होण्याची आकांक्षा बाळगली, पण केबीसीच्या यशानंतर त्यांनी प्रयत्न सोडून दिले. त्यानंतर सुशील कुमार कंगाल झाला आहे अशी बातमी मीडियामध्ये यायला लागल्या त्यात सुशील कुमारची नोकरी गेली आणि त्याने जिंकलेले 5 कोटी देखील त्याने खर्च करून टाकले अशा प्रकारच्या त्या बातम्या होत्या.

Admin

12 thoughts on “कौन बनेगा करोडपतीमध्ये 5 कोटी जिंकणाऱ्या सुशील कुमारचे नंतर काय झाले?

    1. मोबाइल द्वारा बड़ी ही तेजी से गलत खबरें फैल जाती है

    1. मोबाइल द्वारा बड़ी ही तेजी से गलत खबरें फैल जाती है। और उसे हम सही समझ लेते हैं।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *