‘कवट्या महाकाळची’ भूमिका साकारणारा कलाकार नक्की कोण होता?

‘कवट्या महाकाळची’ भूमिका साकारणारा कलाकार नक्की कोण होता?

महेश कोठारे यांच्या चित्रपटातली व्हिलेनची हटके नावं कोण्या प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली नसेल तरच नवल. तात्या विंचू, कुबड्या खविस, गिधाड गँग, कवट्या महाकाळ अशी भूमिकेशी निगडित असणारी व्हीलनची नावं चित्रपटाचा महत्वाचा भाग असायची. अशा हटके नावामुळे महेश कोठारे यांच्या अचाट कल्पनाशक्तीची जाणीव करून देणारी ठरली आहेत. भूमिकांना अशी हटके नावं देण्याची संकल्पना त्यांनी त्यांच्या गुरूंकडूनच शिकली होती.

अण्णासाहेब देऊळगावकर यांनी धुमधडाका, दे दणादण हे चित्रपट लिहिले होते. दे दणादण चित्रपटातील व्हीलनसाठी ‘झगड्या रामोशी ‘ हे नाव देखील त्यांनीच सुचवलं होतं. त्यांच्याच प्रेरणेने थरथराट चित्रपटात सगळेच टकले असणारे व्हिलन महेश कोठारेना हवे होते. मग टकलू हैवान हे नाव सुचले. त्यानंतर महेश कोठारे यांना एक असा व्हिलन प्रेक्षकांसमोर आणायचा होता ज्याचा चेहरा संपूर्ण चित्रपटात दिसला नाही पाहिजे. एक भीतीदायक चेहरा वाटावा म्हणून कवटी असलेला मास्क त्यांनी या व्हीलनसाठी वापरण्याचे ठरवले. परंतु या भूमिकेला नेमके नाव काय द्यावे हेच त्यांना सुचत नव्हते.

चित्रपटावेळी वेगवेगळे दौरे करत असतानाच कवठे महांकाळ या गावाचे नाव त्यांना विशेष भावले. याच नावावरून त्यांनी आपला आगामी चित्रपट धडाकेबाजसाठी “कवट्या महांकाळ” हेच नाव हेरून ठेवले. संपूर्ण चित्रपटात मास्क वापरल्याने कवट्या महांकाळ ही भूमिका साकारणारा कलाकार नेमका कोण? हेच प्रेक्षकांना कधी समजले नाही.

एका मुलाखतीत महेश कोठारे यांनी या भूमिकेबाबत स्पष्टीकरण दिले होते की , सुरुवातीला कवट्या महांकाळची भूमिका बिपीन वर्टी या कलाकाराने साकारली होती. परंतु एकाच चित्रपटात दोन भूमिका ते साकारत होते शिवाय एका सिन मध्ये ते एकमेकांच्या समोरही दाखवले जाणार होते ह्या कारणामुळे ही त्यांनी भूमिका सोडली पुढे चित्रपटात तब्बल वेगवेगळ्या आठ कलाकारांनी ती भूमिका साकारली.

तब्बल ८ वेगवेगळ्या कलाकारांनी हि भूमिका साकारल्याने नेमकी भूमिका करणारा व्यक्ती कोण हे सांगणे त्यांनी टाळले. बिपीन वर्टी यांनी झपाटलेला चित्रपटात कुबड्या खविस, अशी ही बनवाबनवी मध्ये इन्स्पेक्टर अशा विविध चित्रपटातून अभिनय साकारला होता. बिपीन वर्टी अभिनयासोबतच उत्तम दिग्दर्शकही होते. डॉक्टर डॉक्टर, एक गाडी बाकी अनाडी यासारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. बिपीन वर्टी यांचे खूप वर्षांपूर्वी निधन झाले आहे. आज ते आपल्यात नसले तरी त्यांनी साकारलेल्या अफलातून भूमिकेमुळे ते कायम रसिकजनांच्या स्मरणात राहतील.

Admin

One thought on “‘कवट्या महाकाळची’ भूमिका साकारणारा कलाकार नक्की कोण होता?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *