रहस्यमयी! वाचा का’माख्या मंदिराचे रहस्य, ‘हे’ ५ दिवस कोणत्याही पुरुषाला नाही करता येत मंदिरात प्रवेश; चुकूनही प्रवेश झाला तर..

रहस्यमयी! वाचा का’माख्या मंदिराचे रहस्य, ‘हे’ ५ दिवस कोणत्याही पुरुषाला नाही करता येत मंदिरात प्रवेश; चुकूनही प्रवेश झाला तर..

आपल्या देशात असे अनेक मंदिर आहेत, जिथे अनेक मोठाले रहस्य दडलेले आहेत. तिथे अश्या अनेक बाबी बघायला मिळतात ज्या आजही, शास्त्रज्ञांसाठीही एक मोठं कोड आहेत. अनेकांनी ते रहस्य काय आहे हे जाणून घ्यायचा आणि त्यामाघे शास्त्र जोडण्याचा अतोनात प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये कोणालाच यश मिळाले नाही.

असंच एक रहस्यमयी मंदिर आहे, ‘कामाख्या’ देवीचं. ५१ शक्तिपीठांपैकी एक म्हणून कामाख्या मंदिराची ओळख आहे. आपला हिंदू धर्मातील, ग्रंथानुसार जेव्हा देवी सतीने आ’त्मद’ह केला तेव्हा, महादेव तिचे मृ’त श’रीर घेऊन संपूर्ण ब्रम्हांडात फिरत होते. त्यावेळी, ग्रंथानुसार देवी सतीसाठी असलेला महादेवाचा हा मोह भंग करण्याकरिताच भगवान विष्णू यांनी आपल्या दिव्य सुदर्शन चक्राने, देवी सतीच्या मृ’त श’रीराचा भं’ग केला.

देवी सतीच्या श’रीराचे भं’ग होऊन ५१ भाग झाले. पृथ्वीवर ज्या-ज्या ठिकाणी देवी सतीच्या श’रीराचे अव’यव पडले, ते शक्तीपीठ रुपात प्रसिद्ध झाले. देवी सतीचा यो’नी भा’ग पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडला, त्याच ठिकाणी जे शक्तीपीठ बनले त्यालाच ‘कामाख्या महापीठ’ म्हणतात. येथे देवीचा यो’नी भा’ग पडला असल्यामुळे या मंदिरात देवी रजस्वला होते, अशी धार्मिक मान्यता आहे.

हे का’माख्या शक्तीपीठ अनेक चमत्कार व रोमांचक गोष्टींनी परिपूर्ण आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या मंदिरात देवीची कोणतीही मूर्ती नाही. या मंदिरात देवीच्या यो’नी भागाचीच पूजा केली जाते. मंदिरातील एक कुंड सतत ताज्या आणि सुगंधित फुलांनी झाकूनच ठेवलेले असते. या कुंडाच्या जवळच एका ठिकाणी देवी सतीची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे.

हे पीठ देवीच्या ५१ पीठामध्ये, महापीठ मानले जाते. हिंदू धर्मातील ग्रंथानुसार कामाख्या शक्तिपीठाच्या भागात देवीचा यो’नी भाग पडला असल्यामुळे येथे प्रत्येक वर्षी देवी, तीन दिवसांसाठी रजस्वला होते. सर्व साधारण भाषेत बोलायचं झालं तर, या काळामध्ये मंदिरातील एका खास अश्या पाषाणातून र’क्त’स्त्राव होतो. नक्की एका पाषाणातून र’क्त्त कसे काय वाहते, हे कोणालाही न उलगडलेले रहस्य आहे.

यासाठी कोणतेही शास्त्रीय कारण सापडलेच नसल्यामुळे अखेर हा दैवी चमत्कारच आहे हे, सर्वांनी मान्य केलं आहे. कधी कधी रजस्वकाळ हा ४-५ दिवसांचं देखील असतो. या काळामध्ये हे मंदिर इतरांच्या दर्शनासाठी बंद असते. खास करुन पुरुषांना या काळामध्ये मंदिराजवळ प्रवेश नि’षेध आहे. या काळात, मंदिरात पूजा देखील महिला पंडित करतात.

असे सांगितले जाते की, या काळात जर पुरुषांनी चुकूनही मंदिरात प्रवेश केला तर प्रकृतीच्या वि’रोधात गोष्टींचा त्यांना सा’मना करावा लागतो. प्रवेश घेतल्यानंतर पासून, त्या पुरुषांना आजीवन ब्रम्हचर्यच पालन करावे लागते. त्यांना सं’तानप्राप्तीचे सुख मिळत नाही. त्याचबरोबर त्याच्या घरी लक्ष्मीचा वास होत नाही. धार्मिक कथेनुसार असे काही उदाहरण बघण्यात आले आहेत.

देवीचा रजस्व काळानंतर मंदिर पुन्हा उघडले जाते. याला मंदिराचे किंवा देवीच्या शुद्धीकरण असं देखील काही ठिकाणी म्हणलं जातं. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण येथे देवीचा प्रसाद म्हणून मिष्टान्न किंवा सुके मेवा दिले जात नाही. या मंदिरात देवीचा प्रसाद म्हणून भक्तांना ओला क’पडा दिला जातो.

प्रसाद रुपात देण्यात येणाऱ्या या कप’ड्याला अम्बुवाची व’स्त्र म्हणतात. देवी रजस्वला असताना मूर्तीच्या जवळपास पांढरा कपडा अंथरला जातो. ३ ते ५ दिवसांनी मंदिर उघडल्यानंतर पांढरा कपडा देवीच्या रजने, लाल रंगाने पूर्णपणे भिजलेला असतो. आणि त्यानंतर हेच वस्त्र प्रसाद स्वरुपात सर्व भक्तांना वाटले जाते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *