कमी वयात केस पांढरे झालेत, करा हे घरगुती उपाय

कमी वयात केस पांढरे झालेत, करा हे घरगुती उपाय

सध्या कमी वयात केस पांढरे होणे ही कॉमन समस्या झाली आहे. अगदी ९-१० वर्षांच्या मुलापासून तर तरुणांपर्यंत सर्वांचे केस पांढरे असतात. आपली बदलती जीवनशैली, बदललेल्या खानपानपद्धती, तणाव, अपुरी झोप या सर्व कारणांमुळे केस पांढरे होत असतात.

आता यावर आम्ही काही घरगूती उपाय सांगणार आहोत, ते केल्यास नक्कीच फरक पडेल.

१) साधारणपणे मोठ्या वाटीत कढीपत्ता उकळवून घ्या. आणि मग पाणी थंड करायला ठेवा. पाणी थंड/कोमट झाले की प्या. रोज हा उपाय केल्यास नक्कीच बदल जाणवेल. फक्त असे पाणी पिण्यात सातत्य असावे.

२) एका ग्लासमध्ये लिंबू पिळावे आणि त्यात आवळा पावडर घ्या. चांगले ढवळून घ्या. मग हे मिश्रण प्या.

हा उपाय सकाळी करावा. केस तुटणे, केसांना इजा पोचणे आणि केस पांढरे होण्यासारख्या समस्यांपासून मुक्तता मिळते.

३) त्रिफळा चूर्ण केसांसाठी फायदेशीर असते. त्रिफळा चूर्ण केसांना पांढरे होण्यापासून थांबविण्याबरोबरच डॅमेज झालेल्या केसांनादेखील ठीक करते.

४) रोज रात्री कांद्याचा रस केसांच्या मुळाशी लावून रात्रभर केस तसेच ठेवावे आणि सकाळी डोक्यावरून अंघोळ करावी.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *