काळे ओठ गुलाबी आणि लुसलुशीत बनवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती ७ उपाय, पहा होतील एक दिवसात…

काळे ओठ गुलाबी आणि लुसलुशीत बनवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती ७ उपाय, पहा होतील एक दिवसात…

चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करत असतो. चेहऱ्याचा महत्त्वाचा आणि आकर्षक भाग म्हणजे तुमचे ओठ. सुंदर ओठांसाठी तुम्हाला काही चांगल्या सवयी असायला हव्यात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजिबात धु*म्रपान करू नये. दुसरं म्हणजे कमी कॉफी प्यावी. घरातून बाहेर पडताना चांगल्या दर्जाचं SPF लिप बाम वापरणं अत्यंत गरजेचं आहे.

इतकं करूनही जर तुमचे ओठ काळे पडत असतील तर त्यासाठी आम्ही तुम्हाला काळे ओठ गुलाबी होण्यासाठी उपाय सांगत आहोत. ज्यामुळे तुमचे ओठ पहिल्यासारखेच गुलाबी राहतील.ओठ लाल होण्यासाठी उपाय काय आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचे आहे. ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी उपाय अनेक आहेत. खरं तर ओठ काळे का पडतात हे आधी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी उपाय आपण पाहूया आणि त्याआधी आपण जाणून घेऊया ओठ काळे का पडतात त्याची काही महत्त्वाची कारणे.

ओठ काळे पडण्याची कारणे
ओठ काळे का पडतात असा प्रश्न आपल्याला नेहमीच सतावतो. पण त्याचीही अनेक कारणे आहेत. ही कारणे काही नैसर्गिक आहेत तर काही आपण स्वतःहून ओढवून घेतलेली आहेत. त्यापैकी महत्त्वाचे कारण म्हणजे आपला उन्हात असलेला वावर. आपण बऱ्याचदा उन्हात फिरताना त्वचेची काळजी घेतो पण ओठांची घेत नाही. तसंच तुम्हाला काही अ*लर्जी असतील तर त्यामुळेही ओठ काळे पडतात. त्याशिवाय मुंबईसारख्या शहरांमध्ये असलेले प्रदूषणही ओठ काळे पडण्याला जबाबदार आहे.

तुम्हाला ओठ गुलाबी राखून ठेवायचे असतील तर तुम्ही तुमचं कॉफी पिण्याचं प्रमाणही कमी करायला हवे. त्याशिवाय सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे महिलांनी ओठांवर सतत लिपस्टिक लावणे. लिपस्टिकमध्ये अनेक के*मिकल्स असतात आणि तुम्ही जास्त वेळ ओठांवर सतत लिपस्टिक लावून ठेवल्यास ओठांवर नैसर्गिक गुलाबी रंग निघून जातो आणि ओठांवरील काळे डाग वाढतात. आता आपण ओठ गुलाबी करण्यासाठी घरगुती उपाय कोणते आहेत ते पाहूया.

काळे ओठ गुलाबी करण्याचे उपाय
काळे ओठ पडल्यानंतर गुलाबी कसे करावे असा प्रश्न नेहमीच असतात. पण ओठ गुलाबी करण्यासाठी तुम्हाला घरगुती उपाय करता येतात. त्यासाठी तुम्हाला वेगळे काही प्रयोग करायची गरज नाही. आम्ही तुम्हाला इथे काही घरगुती उपाय सांगणार आहोत. तुम्ही नक्की याचा वापर करून पाहा.

बीटरूट ज्युस : कसा वापरावा > बीटचा रस काढून घ्यावा. तुम्ही नुसता रसही तुमच्या ओठांना लावून ओठांचा मसाज करू शकता अथवा तुम्ही त्यामध्ये मध घालूनही तुमच्या ओठांना लावल्यास त्याचा योग्य परिणाम तुम्हाला काही दिवसातच दिसून येईल. तुमचे ओठ गुलाबी करण्यासाठी बीटचा रस हा चांगला पर्याय आहे. नैसर्गिक एक्स्फोलिएटर असल्याने काळ्या ओठांवर याचा चांगला परिणाम होतो.

कधी वापरावा – बीटाचा रस हा नैसर्गिक असल्याने तुम्ही कधीही वापरू शकता. पण तुम्हाला त्याचा योग्य परिणाम हवा असेल तर तुम्ही झोपण्याआधी तुमच्या ओठाला बीटाचा रस लावा आणि रात्रभर तुमच्या ओठांवर हा रस तसाच राहू द्या. सकाळी उठल्यानंतर तुम्ही ओठ स्वच्छ गार पाण्याने धुवा. तुम्हाला नैसर्गिक गुलाबी रंग ओठांना आलेला दिसून येईल.

ऑलिव्ह ऑईल : कसा वापरावा > ऑलिव्ह ऑईलचे 2-3 थेंब रोज ओठाला लावा. त्यामुळे तुमच्या ओठांचा काळेपणा कमी होईल आणि तुमच्या ओठांना हवा असणारा ओलावादेखील मिळेल.

कधी वापरावा – ऑलिव्ह ऑईल हेदेखील एक नैसर्गिक तेल आहे. यामुळे तुमचे ओठ मऊ आणि मुलायम राहायला मदत मिळते. त्याशिवाय यातील गुणांमुळे ओठांवरील काळेपणा निघून जायला मदत मिळते. तुम्ही कधीही दिवसभरात हे तेल ओठाला लावू शकता.

लिंंबाचा रस : कसा वापरावा > लिंबाचा रस आपल्या केस आणि त्वचेसाठी एक महत्त्वाचा उपाय आहे. पण याचा परिणाम ओठांवरही खूपच चांगला होतो. लिंबाच्या रसाचे 2-3 थेंब ओठावर लाऊन मसाज करावा. त्याचा परिणाम लगेच दिसून येतो. ओठांवरील काळेपणा कमी होतो आणि ओठ मऊ मुलायम होतात.

कधी वापरावा – तुम्ही रात्री झोपताना लिंबाचा रस ओठांना लावून ठेवलात आणि साधारण अर्धा तासाने ओठ स्वच्छ केलेत तरीही याचा चांगला परिणाम होऊ शकतो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रात्रभरही ठेवू शकता. पण याचा जास्त वापर करू नका.

केशर आणि दही : कसा वापरावा > तुमच्या स्वयंपाकघरामध्ये केशर असल्यास, त्याचे दोन ते तीन धागे दह्यात घाला. दह्यामध्ये 15-20 मिनिट्स केसर तसंच राहू द्या. ही पेस्ट मुलायमपणे तुमच्या ओठांना लावा आणि मग मसाज करा. त्वरीत याचा परिणाम तुम्हाला दिसेल.

कधी वापरावा – तुम्ही दिवसभरात कधीही या पेस्टचा वापर तुमच्या ओठांवर करू शकता. फक्त तुम्ही हे लावल्यानंतर कोणत्याही प्रकारे तणावात राहू नका. तुम्हाला याचा परिणाम लगेच मिळेल.

बटर : कसा वापरावा > बटर अर्थात मस्का वा लोण्याचा वापर हा ओठांचा नैसर्गिक रंग परत आणण्यासाठी करता येऊ शकतो. रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही ओठांवर बटर लावा. घरी केलेलं लोणी असेल तर जास्तच चांगलं. यामुळे तुमचे ओठ खूपच सुंदर होतात.

कधी वापरावा – तुम्ही मस्का अथवा लोणी दिवसभरात कधीही वापरू शकता. तुमच्या घरात कायम हा पदार्थ असतो त्यामुळे तुम्ही काम करत असताना अथवा कुठेही जातानासुद्धा ओठांवर याचा वापर करू शकता.

बटाट्याचा रस : कसा वापरावा > ओठाचा काळेपणा दूर करण्यासाठी बटाटादेखील खूपच फायदेशीर आहे. बटाट्याचा रस काढून घ्या आणि रोज हा रस ओठाला लावा. रोज असं केल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच याचा फरक जाणवेल. बटाटा हा शरीरावरील काळेपणा काढून टाकण्यासाठी उपयुक्त ठरतो. यातील एक्सफोलिएट करणारे घटक अधिक फायदा करून देतात.

कधी वापरावा – कोणत्याही वेळी तुम्ही बटाट्याचा रस वापरू शकता. फक्त रस काढून ठेवू नका. बटाट्याचा रस काढल्यानंतर तुम्ही त्वरीत त्याचा वापर तुमच्या ओठांवर करा. त्याचा परिणाम लवकरच तुम्हाला दिसून येईल.

तिळाचे तेल : कसा वापरावा > रात्री झोपण्यापूर्वी तिळ्याच्या तेलाचे काही थेंब तुम्ही तुमच्या ओठाला लावा. असं रोज करा. यामुळे तुमचे ओठ गुलाबी होण्यास मदत होते.

कधी वापरावा – रोज रात्री झोपण्यापूर्वी याचा वापर नक्की करा आणि तुम्हाला हवा तसा ओठांचा नैसर्गिक गुलाबी रंग तुम्ही मिळवू शकता.

गुलाबाच्या पाकळ्या : कसा वापरावा > गुलाबी गुलाबाच्या पाकळ्या घेऊन त्या दुधात घालाव्यात आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट ओठावर लाऊन काही वेळ तशीच ठेवा. दूध तुमच्या ओठांचा काळेपणा दूर करण्यास मदत करतं. तर गुलाबाच्या पाकळ्यांमुळे तुमचे ओठ गुलाबी आणि आकर्षक दिसण्यास मदत होते.

कधी वापरावा – तुम्ही साधारण संध्याकाळी घरी आल्यानंतर याचा वापर केलात तरी चालेल. तुम्ही घरी असाल तर दुपारच्या वेळीही तुम्ही याचा वापर करू शकता.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *