जेवणानंतर पोट फुगत असेल तर, हे उपाय करून पहा…..

जेवणानंतर पोट फुगत असेल तर, हे उपाय करून पहा…..

निरोगी व सुदृढ शरीर हे मानवाची खरी संपत्ती असते असे अनेकदा आपण ऐकतो. यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली ही सुदृढ आरोग्य पासूनच सुरु होते. मनुष्य आपल्या  रोजच्या आयुष्यात जी काही धावपळ करत असतो ते सर्व दोन वेळचे जेवण व मूलभूत गरजा भागवण्यासाठी करत असतो.

या सर्व गरजांचा संदर्भ हा कित्येकदा पोटाशी लावला जातो कारण अन्न हे मनुष्याच्या जीवनातील मूलभूत गरजांपैकी एक आहे व अन्नाच्या चयपचयाचे कार्यही पोट या अवयवाद्वारे पार पाडले जाते म्हणूनच हा मनुष्याच्या शरीरातील एक महत्त्वपूर्ण घटक ठरतो. पोटाच्या आरोग्याचा शरीराशी निगडित अनेक समस्यांवर सुद्धा प्रभाव पडत असतो.

बऱ्याचदा पोटाशी निगडित उद्भवणारी प्रमुख समस्या म्हणजे पोट फुगणे होय. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जेवणाच्या अनियमित वेळा, जंकफूड खाणे, बाहेरच्या खाण्याचा आहारातील अतिवापर इत्यादी मुळे पोट फुगण्याच्या समस्या अगदी निरोगी व्यक्तींमध्ये सुद्धा निर्माण होऊ शकतात. पोटफुगीच्या या समस्येला कसे दूर ठेवता येऊ शकते व पोट दुखीसारखी समस्या निर्माण झाली तर त्यावर काय उपाय योजले जाऊ शकतात हे आज आपण जाणून घेणार आहोत.

पोट दुखी किंवा पोट फुगल्यासारखे समस्यांवर आपल्या भारतीय आहार पद्धती ने काही पदार्थांच्या स्वरूपात रामबाण उपाय अगोदरच निर्माण केले आहेत. केळी, रताळी इत्यादींसारख्या पोटॅशियमचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट केल्यामुळे पोटामध्ये जास्त जागा असल्याची भावना निर्माण करणारे द्रवपदार्थ शरीरातून सहजपणे बाहेर टाकले जातात.

आपल्या पूर्वजांनी आहारव्यवस्थेमधील महत्त्व नेहमीच अधोरेखितत केले आहे. सकाळचा नाष्टा हा राजाप्रमाणे केलेला असावा असे सांगितले जाते. सकाळचा नाश्तामध्ये फायबर युक्त पदार्थांचा, प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश केला तर आपले पोट व्यवस्थित भरलेले आहे अशी भावना निर्माण होते आणि आपोआपच दुपारचे जेवण हे अतिरिक्त प्रमाणात घेतले जात नाही.

तसेच रात्रीचे जेवण सुद्धा हे नेहमीच पचण्यास हलके असे घेतले जावे. जेणेकरून पचनसंस्थेवर ताण निर्माण होत नाही.डाएटच्या नावाखाली सकाळचा नाष्टा चुकवणे म्हणजे पोट दुखी ला व पोटफुगीला आमंत्रण देण्यासारखेच आहे.

योग्य आहारासोबतच परिपूर्ण व्यायाम सुद्धा शरीराच्या योग्य त्या समतोलासाठी आवश्यक ठरतो. वेळ नाही या कारणास्तव अनेक जण सध्याच्या काळामध्ये व्यायामाला चुकवतात मात्र शरीराला हालचाल घडवणे अन्नपचना सोबतच अन्य शारीरिक क्रियांच्या सुरळीत चालण्यासाठी खूप आवश्यक ठरते.

व्यायाम करणे म्हणजे जिमला जाणे असे नव्हे तर आपल्या वेळेनुसार बागेत फिरायला जाणे, घरातील शरीराला हालचाल घडवणारी कामे करणे, झाडांना पाणी घालणे याद्वारे सुद्धा आपण शरीराला व्यायाम घडवून आणू शकतो.व्यायामाच्या अभावी  शरीरातील अन्नपचनास गती मिळत नाही व त्यामुळे पोट दुखणे किंवा पोट फुगण्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

पाणी पिणे अन्नपचनासाठी खूप आवश्यक असते मात्र एकाच वेळी बाटलीभर पाणी पिल्यामुळे निश्चितच पोट फुगू शकते त्यामुळे दिवसभरात थोड्या वेळाच्या अंतराने सात ते आठ ग्लास पाणी पिणे आरोग्याच्या व पोटाच्या दृष्टीने फायद्याचे ठरते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *