अपमान करणाऱ्या व्यक्तीला धडा कसा शिकवायचा, याच रतन टाटा यांनी जगासमोर ठेवलेलं एक उत्तम उदाहरण…

अपमान करणाऱ्या व्यक्तीला धडा कसा शिकवायचा, याच रतन टाटा यांनी जगासमोर ठेवलेलं एक उत्तम उदाहरण…

जेव्हा आपण यशाच्या शिखरावर असतो तेव्हा आपल्या सोबत सर्वचजण असतात मात्र जेव्हा आपल्याला अपयशाला सामोरे जावे लागते तेव्हा मात्र आपल्याला जवळच्या व्यक्ती सुद्धा सोडून जातात असे अपना नेहमी ऐकत असतो. प्रत्यक्षात असा प्रसंग आल्यावर अपयशामुळे खचून न जाता पुन्हा एकदा यशाच्या उंचीला गाठून सर्वांना उत्तर देणे फारच क्वचित लोकांना जमते.

आपल्या कृतीमधून लोकांना आपले कर्तृत्व दाखवणाऱ्या व्यक्ती नेहमी खूप साहसी व तडफदार व्यक्तिमत्वाच्या असतात. भारतीय उद्योग जगतामध्ये अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांनी आपल्या कृतीमधून परदेशातील उद्योगांना ज्यांनी भारतीय उद्योग संस्कृतीला कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना वेळ आल्यावर शांतपणे,उत्तम गुणवत्ता व दर्जाच्या उत्पादनांच्या आधारे उत्तर दिले आहे व भारतीय उद्योगजगताने तयार केलेल्या उत्पादनांबद्दल दिलेल्या तुच्छ वागणुकीबद्दल शरमिंदा व्हायला लावले आहे व हे सर्व अत्यंत विनम्र पद्धतीने केले आहे.

आज आपण भारतीय उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा व ज्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून खऱ्या अर्थाने स्वदेशीचा कानमंत्र संपूर्ण जगभरामध्ये निनादत ठेवला आहे असे टाटा उद्योग समूहाचे श्री रतन नवल टाटा यांच्या अशाच एका कृतीने दिलेल्या प्रत्युत्तराबद्दल जाणून घेणार आहोत.

टाटा उद्योग समूह खाद्यपदार्थ ,तंत्रज्ञान यासोबतच वाहन उद्योगांमधील सुद्धा आघाडीवर असलेला उद्योग समूह मानला जातो. टाटा उद्योग समूहाने मानवी मूल्यांच्या आधारे व तत्त्वनिष्ठ पणे प्रत्येक उद्योगाची पायाभरणी केलेली आहे व हे मूल्य आणि तत्व कायम अमलात आणली आहेत. टाटा उद्योगसमूहाचे अमेरिकेत असलेली टाटा मोटर्स कंपनी आर्थिक तोट्या मध्ये गेले होते.

सर्व प्रयत्न केल्यानंतर टाटा यांनी ही कंपनी फोर्ड या कंपनीला विकण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीपासूनच रतन टाटा ही कंपनी विकण्याच्या प्रस्तावाबाबत खुश नव्हते. अखेर एक दिवस निश्चित केला गेला व त्यादिवशी फोर्डचे अध्यक्ष व अन्य सदस्यांसोबत बैठक करण्यासाठी रतन टाटा आपल्या सहकार्‍यांसोबत गेले.

तोट्यात असलेल्या कंपनीचा आपल्याकडे जणू काही भीक मागण्यासाठी आलेल्या याचका प्रमाणे आहे असे दाखवून फोर्ड कंपनीच्याअध्यक्षांनी रतन टाटा यांना खूप भलेबुरे सुनावले व आपण टाटा मोटर्स कंपनी विकत घेऊन त्यांच्यावर एक प्रकारे उपकारच करत आहोत असे सुद्धा बोलून दाखवले.

अतिशय स्वाभिमानी वृत्ती असलेल्या रतन टाटा यांनी दुप्पट परिश्रम करून व जिथे जिथे काही त्रुटी आढळल्या त्याठिकाणी सुधारणा करून पुन्हा एकदा टाटा मोटर्स कंपनीची गाडी रुळावर आणली व 2008 साली कंपनी पुन्हा एकदा आर्थिक नफ्यात येऊन जगभरातील आघाडीच्या वाहन उद्योगांमध्ये गणली जाऊ लागली.

टाटा मोटर्स कंपनी एकीकडे आर्थिक घोडदौडी मध्ये पुढे असतानाच फोर्ड कंपनी मात्र तोट्यात गेली होती. लँड रोव्हर, जँग्वार या फोर्ड कंपनीच्या उत्पादनांना भारतीयांनी स्पेशल नाकारले गेले होते व त्यामुळे कंपनी आर्थिक दिवाळखोरीच्या मार्गावर होती.

सुज्ञास सांगणे न लगे या उक्तीप्रमाणे रतन टाटा यांनी याच संधीचा फायदा घेत आपल्याला मिळालेल्या अपमानास्पद वागणूकीची परतफेड करण्याचे ठरवले व फोर्ड कंपनीकडे लँड रोवर आणि जग्वार या उत्पादनांना खरेदी करण्यासाठी चा प्रस्ताव ठेवला.

या क्षणाला फोर्ड कंपनीने रतन टाटा यांनी ठेवलेला प्रस्ताव देवाकडून आलेल्या आशीर्वादाप्रमाणे मानून तो प्रस्ताव लगेच स्वीकारला आणि यासाठीची अंतिम बैठक करण्यासाठी कंपनीचे अध्यक्ष मुंबई येथील टाटा कंपनीच्या मुख्यालयामध्ये आले. यावेळी झालेल्या करारानुसार टाटा समूहाने लँड रोवर आणि जागवार हे दोन ब्रँड जवळपास नऊ हजार तीनशे कोटी रुपयांना विकत घेतले.

बाजारपेठेतील अपयशामुळे खचून गेलेल्या बिल फोर्ड यांनी यावेळी रतन टाटा यांचे आभार मानत तुम्ही माझ्यावर हे दोन ब्रांड विकत घेऊन अक्षरशः उपकार केले आहेत असे म्हटले. काळाचे चक्र हे अशाप्रकारे फिरते. की ज्या बिल फोर्ड यांनीज्यावेळी टाटा मोटर्स कंपनी आर्थिक संकटातून जात होती व टाटा यांनी फोर्ड कंपनीने टाटा मोटर्सला विकत घ्यावे असा प्रस्ताव ठेवला होता तेव्हा याच बिल फोर्ड यांनी रतन टाटा यांना तुमची कंपनी विकत घेऊन मी तुमच्यावर उपकार करत आहे असे तुच्छ बोल सुनावले होते.

मात्र आजच्या बाजारीकरणाच्या युगातही आपल्या तत्त्व आणि मुल्याना सोबत धरून सचोटीने रतन टाटा यांनी अगदी वर्मावर घाव घालत आपल्या अपमानाचा बदला या कृतीने घेतला.लँड रोवर आणि जग्वार ही दोन उत्पादने टाटा समूहाने विकत घेतल्या नंतर भारतीय बाजारपेठांमध्ये या दोन्ही वाहनांना प्रचंड असा प्रतिसाद मिळाला.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *