आजचा सर्वात मोठा खुलासा, इतका महागडा आहे अंकिताचा फ्लॅट, सुशांत भरत होता का हप्ते ! काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या..

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आपल्यामधून हे जग सोडून जवळपास दोन महिन्याचा कालावधी लोटला असला तरी अजूनही या बाबत चर्चा थांबयाचे नाव घेत नाहीत. सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्यास महाराष्ट्र सरकारचा विरोध होता.
मात्र, अखेर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे, असे सांगितले. आता सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. सुशांतच्या बाबतीत प्रत्येक बाजू तपासून पाहत आहेत. या प्रकरणी सीबीआयने मंगळवारी सुशांतचा अकाउंट श्रीधर त्यांचा मित्र सिद्धार्थ पीठानी यांची पुन्हा चौकशी केली.
तसेच त्यांनी सुशांत यांच्याकडील नौकरी का सोडली याबाबतही त्याच्याकडे विचारणा करण्यात आली. मिळालेले दस्तावेज बँक अकाउंट डिटेल्स, आर्थिक व्यवहार, खर्च, गुंतवणूक आरटीआय याचा तपशील त्यांनी सीएकडून मागून घेतला आहे, असे सूत्रांनी सांगितले. वांद्रे पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी यांना चौकशीसाठी सीबी आय ने समन्स बजावले आहे.
14 जून पासून या प्रकरणाचा तपास करणारे वांद्रे पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्याकडे दोन महिन्यातील तपास एफआयआर न घेता केवळ चौकशी करणे या भूमिकेकडे संशयाने पाहिले जात आहे. याप्रकरणी आजवर 56 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणी सीबीआयने सुशांत याचा जवळचा मित्र असलेल्या पंकज दुबे याची अजून चौकशी केली नाही.
मात्र, शनिवारी पोलिसांनी रजत मेवानी आणि दीपेश सावंत यांची चौकशी केली. त्यांच्या चौकशीतून काही तथ्य समोर आल्याचेही समजते. 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूत याचा राहत्या फ्लॅटमध्ये मृतदेह आढळला होता. त्यानंतर या प्रकरणाचे अनेक कांगोरे समोर येत आहेत. सुशांत हे जग सोडून जाण्यामागे सलमान खान तसेच बॉलिवूडची एक लॉबी सक्रीय असल्याचेही समोर आले होते.
या प्रकरणी सलमान खानवर सुशांत सिंह राजपूत यांच्या चाहत्यांनी मोठी टीका केली होती. तसेच या प्रकरणात शेवटी रिया चक्रवर्ती हिचे नाव समोर आले. रिया चक्रवर्तीची सीबीआय तब्बल दहा तास चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रिया व तिच्या भावाने या प्रकरणात मोठी हेराफेरी केल्याचे देखील समोर येत आहे. तसेच मनी लॉन्ड्रिंग देखील झाल्याचा संशय सीबीआयला आहे. त्यामुळे सीबीआय या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
सुशांत सिंह राजपूत याने महेंद्रसिंग धोनी याच्यावरील चित्रपटात चांगली भूमिका करून नाव मिळवले होते. त्यानंतर त्याच्याकडे अनेक ऑफर होत्या. मात्र, त्याला चांगले चित्रपट मिळू नये यासाठी काही जणांनी दबाव टाकला ते देखील समोर येत आहे. या प्रकरणात महेश भट्ट यांचे नाव समोर आले होते. महेश भट्ट आणि रिया चक्रवर्ती यांच्या मध्ये झालेले व्हाट्सअप चॅटिंग देखील काही दिवसांपूर्वीच व्हायरल झाले होते.
त्यामुळे पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहेत. आता या प्रकरणात एक नवीनच बाजू समोर आलेली आहे. सुशांत याची माजी प्रेयसी अंकिता लोखंडे हिला सुशांतने फ्लॅट घेऊन दिला होता आणि त्याची किंमत तब्बल साडेचार कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या फ्लॅटचा हफ्ता सुशांत सिंह राजपूत स्वतः भरत असल्याचे देखील समोर येत आहे.
मात्र, अंकिता लोखंडे हिने या वृत्ताचे खंडन केले आहे. तसेच तिने 2019 ते 2020 पर्यंतचे बँक खात्याची डिटेल्स उघड केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता नेमके प्रकरण काय आहे, याचा तपास देखील सीबीआय करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.