IPL 2022: चेन्नईच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी! धोनीला चेन्नईच्या संघाकडून खेळण्याची इच्छा नाहीये

२००८ पासून, आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात झाली. आयपीएलने क्रिकेटमध्ये खूप महत्वपूर्ण बदल घडवून आणले.सगळ्यात महत्वाचं म्हणजे, ज्या उत्कृष्ट खेळाडूंना, काही कारणास्तव सामने खेळात येत नव्हते, त्यांना देखील आयपीएल मुळे जागतिक स्तरावरचे सामने खेळता येऊ लागले. याच सामन्यांमुळे अनेक खेळाडूंना, आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली.
अनेक क्रिकेटपटूंच्या करियरच्या सुरुवातच, आयपीएलच्या सामन्यांमधून झाली असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आयपीएल म्हणलं की, सगळ्यात पहिले आपल्या समोर येतो चेन्नई सुपर किंग्सचा संघ. या संघाचे अनेक हेटर्स आहेत, तर अनेक फॅन्स आहेत. मात्र काहीही असलं तरी, सर्वात पहिले CSKचा संघ समोर येतोच.
त्याचे कारण म्हणजे, त्या संघाच्या सुरुवातीपासूनच एम एस धोनी एक महत्वाचा खेळाडू आहे. धोनीचे संपूर्ण देशातच नाही तर जगभरात, कित्येक चाहते आहेत. आयपीएलमध्ये एम एस धोनी, पहिल्या पर्वापासून चेन्नईच्याच संघासोबत खेळतो. साऊथमध्ये धोनीचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. चेन्नईचा संघ एम एस धोनीशिवाय कोणीच विचार करूच शकत नाही.
चेन्नईचे चाहते धोनीला थाला म्हणून, अक्षरशः डोक्यावर घेतात. धोनीला पिवळ्या रंगाच्या जर्सीमध्ये बघण्यासाठी, चेन्नईचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. जेव्हा, धोनी ग्राऊंडवर खेळायला येतो, तेव्हा सगळीकडे त्याचाच नाव ऐकायला मिळते. खास करून जेव्हा तो आयपीएलचे सामने खेळण्यासाठी येतो तेव्हा, ‘थाला धोनी’ म्हणत त्याचे चाहते त्याला प्रोत्सहन देत असतात.
मात्र आत, चेन्नईच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएल २०२२ मध्ये दोन नवीन संघ समाविष्ट होणार आहेत. त्यामुळे आता, कोणते चार, खेळाडू रिटेन करायची संधी, जुन्या सर्व संघाना देण्यात आली आहे. त्यात आता कोणत्या खेळाडूला रिटेन करायचे आणि खेळाडूला जाऊ द्यायचे या द्विधा मनःस्थितीमध्ये जवळपास सर्वच संघ आहेत.
तर धोनीने, आपल्याला रिटेन करण्याची आवश्यकता नाही असं, फ्रँचायझर्स सांगितलं आहे. या बातमीने सगळीकडेच गोंधळ उडाला आहे. ‘चेन्नईने माझ्यावर पैसा वाया घालवू नये’, असे स्वतः धोनीने म्हटले आहे. सीएसकेचे मालक एन. श्रीनिवासन यांनीच हा मोठा खुलासा केला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने आयपीएल २०२१चे विजेतेपद पटकावले तर आहेच.
पण, धोनीच्याच नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाने आतापर्यंत चारही जेतेपदे जिंकलली आहेत. त्यामुळे धोनीशिवाय, चेन्नईच्या संघाचा विचार चाहते करूच शकत नाही, असे असताना धोनीच्या या विधानामुळे क्रिकेटविश्वामधे चांगलीच खळबळ उडाली आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलत असताना श्रीनिवासन म्हणाले, ‘धोनी एक निष्पक्ष व्यक्ती आहे.
त्याला कायम ठेवण्यासाठी संघाने जास्त पैसा खर्च करावा असे त्याला वाटत नाही. यामुळे संघाने रिटेन करावे, असे त्याला वाटत नाही. पण, पुढच्या सत्रातही धोनीने आमच्या संघातून खेळावे अशी माझी इच्छा आहे. आम्ही स्वतः आमचा संघ त्याच्याशिवाय इमॅजिनचा करूच शकत नाही. तो आमच्या संघाचा प्राण आहे. चेन्नईमध्ये त्याचे चाहते त्याला, महानायक समजतात.’