IPL 2022 : कॅप्टन होणार हार्दिक पांड्या ! मुंबई इंडियन्स सोडल्यानंतर ही टीम देणार साथ..!

IPL 2022 : कॅप्टन होणार हार्दिक पांड्या ! मुंबई इंडियन्स सोडल्यानंतर ही टीम देणार साथ..!

आयपीएलच्या पुढच्या मोसमापासून म्हणजेच IPL २०२२मध्ये, आता ८ ऐवजी १० टीम मैदानात उतरनार आहेत. नव्या टीममध्ये अहमदाबाद आणि लखनऊचा समावेश आहे. त्यामुळे, आता आयपीएलच्या संघामध्ये, म्हणजेच संघातील खेळाडूंमध्ये मोठा फेरबदल होणार असल्याचं म्हणलं जात आहे. बीसीसीआयने फ्रॅन्चायजींना, आयपीएलच्या पुढच्या मोसमात ४ खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी दिली आहे.

मुंबईने रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, जसप्रीत बुमराह यांना कायम ठेवण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. सोबतच, इशान किशन किंवा सूर्यकुमार यादव या दोघांपैकी, एक जण मुंबईचा चौथा रिटेन केलेला खेळाडू असेल, अशी शक्यता वर्तनवण्यात येत आहे. मुंबई इंडियन्सचा, स्टार खेळाडू ऑलराऊंडर हार्दिक पांड्या, आयपीएलच्या यंदाच्या मोसमात चांगलाच संघर्ष करताना दिसला.

संपूर्ण मोसमात हार्दिकने बॉलिंग तर केलीच नाही, तसंच त्याला बॅटिंगमध्येही अपयश आलं. २०१९ साली, हार्दिकच्या पाठीची श’स्त्रक्रि’या झाली आणि त्यानंतर हार्दिक फार बॉलिंग करताना दिसला नाही. म्हणून, आता मुंबई इंडियन्स आयपीएलच्या पुढच्या मोसमाआधी हार्दिकला रिटेन करणार नाही असं म्हणलं जात आहे. आता, हार्दिक पांड्या अहमदाबादच्या टीमकडून खेळणार असल्याचे म्हणलं जात आहे.

तो गुजरातचा आहे, तसंच तो स्थानिक क्रिकेटही बडोद्याकडून खेळतो. सोबतच आता हार्दिक पांड्या, अहमदाबादच्या टीमचा कर्णधारही होऊ शकतो. हार्दिक पांड्याशिवाय, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनाही अहमदाबादची टीममध्ये घेण्याबाबत विचार करत असल्याचं सांगितलं जात आहे. अय्यर माघील, मोसमात पंजाब किंग्सचा तर दिल्लीचा कर्णधार असलेल्या श्रेयस अय्यरला दुखापतीमुळे सुरुवातीचा मोसम मुकावं लागलं.

यानंतर ऋषभ पंतकडे दिल्लीचं नेतृत्व गेलं. आता राहुल आणि अय्यर त्यांच्या सध्याच्या आयपीएल टीमला सोडण्याच्या तैयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. केएल राहुलने आयपीएलच्या या मोसमात ६०० पेक्षा जास्त रन केले. या मोसमापर्यंत प्रत्येक टीम खेळाडूंवर ८५ कोटी रुपये खर्च करू शकत होती, हीच रक्कम आता ९० कोटी रुपयांपर्यंत नेण्यात आली आहे.

आयपीएलच्या जुन्या टीमना प्रत्येकी ४ खेळाडू रिटेन करता येणार आहेत. तर नव्या दोन टीम लिलाव करण्याआधी ३ खेळाडू विकत घेऊ शकत असल्याच सांगितलं जात आहे. सनरायजर्स हैदराबादने डेव्हिड वॉर्नरला आयपीएलच्या या मोसमात कॅप्टन्सीवरून हटवलं, यानंतर त्याला टीममधून देखील डच्चू देण्यात आला. आता आपण नवीन, टीमकडून खेळणार आहे असं, वॉर्नरने स्पष्टसुद्धा केलं होत.

लखनऊची, टीम डेव्हिड वॉर्नरला कॅप्टन करणार आहे, अशी शक्यता आहे. याशिवाय, उत्तर प्रदेशकडून स्थानिक क्रिकेट खेळणारे सुरेश रैना आणि भुवनेश्वर कुमार देखील लखनऊच्या संघाकडून खेळू शकतात. सुरेश रैना आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो. पण, यावर्षी चेन्नईने त्याला फायनल आणि इतर अनेक मॅचमध्ये खेळवलं नाही. आरपीएसजी ग्रुपने लखनऊची टीम, तब्बल ७०९० कोटी रुपयांना विकत घेतली. सीव्हीसी कॅपिटलला, अहमदाबादची टीम ५,१६६ कोटी रुपयांना मिळाली.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *