उद्योगपतीने आपल्या लॉकरमध्ये सांभाळून ठेवलं होत १०००वर्ष जून शिवलिंग ! किंमत वाचून चक्रवातील डोळे…

उद्योगपतीने आपल्या लॉकरमध्ये सांभाळून ठेवलं होत १०००वर्ष जून शिवलिंग ! किंमत वाचून चक्रवातील डोळे…

आपल्याकडे अनेक जुन्या आणि पुरातन वस्तू असतात. पिढ्यान पिढ्या त्या वस्तूंचे जतन अनेकजण करतात. माघील कित्येक पिढ्यांपासून ती आपल्या कुटुंबात आहे, म्हणून आपण त्या वास्तूचा उत्तम प्रकारे सांभाळ करतो. मात्र अनेकवेळा अतिशय सामान्य वाटणाऱ्या या वस्तूंची किंमतीचा आपण विचार देखील करत नाही.

या वस्तू आपल्याला अगदी सामान्य आणि रोजच्या बघण्यातील असतात म्हणून त्यांचं महत्त्व आणि त्याला असलेली किंमत याची साधी कल्पना देखील आपल्याला नसते. अमुक एका व्यक्तीच्या घरात आढळलेल्या, कोणत्यातरी प्राचीन वस्तूला कोट्यवधी रुपये किंमत मिळाली, अशा अनेक घटना आपण ऐकत आणि वाचत आलोच आहोत.

आता सध्या अशीच एक असामान्य घटना तमिळनाडू येथील तंजावूरमधून समोर आली आहे. तंजावूरमधील एका ज्येष्ठ व्यावसायिकाच्या बँक लॉकरमध्ये एक खास वस्तू सांभाळून ठेवण्यात आली होती. आणि अचानकच ती वस्तू आढळली. मात्र अशी एखादी वस्तू त्या लॉकरमध्ये आढळू शकते याचा कल्पनादेखील कोणी केली नव्हती.

एक प्राचीन शिवलिंग या व्यावसायिकाच्या बँक लॉकरमध्ये मिळालं. हे शिवलिंग ५३० ग्रॅमचं असून पाचूच्या धातूपासून बनवण्यात आलेलं आहे. बघताच क्षणी मन मोहून घेणारी रचना या शिवलिंगाची आहे. यात सर्वात विशेष आणि लक्ष वेधून घेणारी बाब या शिवलिंगाची किंमत ठरली आहे.

पाचूपासून बनलेल्या ५३० ग्रॅमच्या प्राचीन शिवलिंगाची किंमत चक्क ५०० कोटी रुपये इतकी आहे. बँकेच्या लॉकरमध्ये आढळलेल्या या प्राचीन शिवलिंगाची लांबी ८ सेंमी आहे. दरम्यान, हे शिवलिंग या ज्येष्ठ व्यावसायिकाकडे कसं आणि कुठून आलं, याबद्दल कोणत्याही प्रकराची ठोस माहिती अद्याप समोर आली नाहीये.

सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. WION च्या रिपोर्टनुसार, तंजावूरमधील एका घरात अॅन्टिक मूर्ती ठेवलेली आहे अशी माहिती एडीजीपी जयंत मुरली मिळाली होती. याबद्दलची माहिती मिळताच याचा शोध सुरु करण्यात आला असताना हे शिवलिंग आढळून आलं.

मात्र हे शिवलिंग नागपट्टिनमजवळील थिरुक्कुवलई येथील थ्यागराज स्वामी मंदिरातून २०१६ साली चोरी झालं होतं. सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार, साइन्टिफीक इन्वेस्टिगेशनद्वारेच, हे शिवलिंग कधी बनवलं गेलं आहे याचा शोध लागेल. तरीही हे प्राचीन शिवलिंग जवळपास हजार वर्षापूर्वीच असल्याचं बोललं जात आहे. तूर्तास, पोलिसांनी याप्रकरणी खटला दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published.