अंडी खरीदी करताना ताजे आहेत की शिळे कसे ओळखाल? पहा सर्वात सोपा आणि घरगुती उपाय…

अंडी खरीदी करताना ताजे आहेत की शिळे कसे ओळखाल? पहा सर्वात सोपा आणि घरगुती उपाय…

देशात आणि जगात सध्या को-रोना म-हामा-रीमुळे थै-मान घातलेले आहे. अनेक रुग्णालयात अ-संख्य रु-ग्ण भरती झाले आहेत. त्यामुळे प्रशासनावर याचा ताण देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रशासनाला रु-ग्णाला उपचार सेवेसोबतच सकस आहार देखील द्यावा लागतो.

या रु-ग्णांमध्ये तातडीने प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी सरकारी रुग्णालयांमध्ये रु-ग्णांना अंडी देण्यात येत आहेत. दोन वेळेस तरी ही अंडी देण्यात येत आहेत. अंड्याचे सेवन केल्याने रु-ग्णाची प्रतिकारशक्ती ही मोठ्या प्रमाणात वाढते आणि को-रोना म-हामा-री वर मात करू शकतात. त्यामुळे अंड्याचे महत्त्व सध्या खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

तसेच आपण फार पूर्वीपासून देखील संडे हो या मंडे रोज खाओ अंडे, ही जाहिरात आपण ऐकली असेल. त्यामुळे अंड्याचे महत्त्व हे दिवसेंदिवस वाढतच आहे. अंडे खाल्ल्याने आपल्याला ऊर्जा प्राप्त होते. अंड्यामध्ये सर्व प्रकारचे विटामिन भरलेली असतात. अंड्यामध्ये b12 सोबतच इतर पोषक द्रव्ये मोठ्या प्रमाणात असतात.

त्यामुळे डॉक्टर देखील अंडीचे सेवन करण्याचा सल्ला देतात. ज्या लोकांना अंडी खाणे जमत नाही, असे लोक हे औषध गोळ्या घेऊन आपल्या शरीरातील झीज भरून काढण्याचा प्रयत्न करतात. मात्र, नैसर्गिक फळे खाणे हे कधीही चांगले. त्यामुळे नैसर्गिक फळांचे सेवन केले पाहिजे. यासोबतच अंडी खाऊ शकतात.

मात्र, बाजारामध्ये आजकाल मोठ्या प्रमाणात भेसळ होऊ लागली आहे. काही महिन्यापूर्वीच आपण प्ला-स्टिक अंडे येत असल्याच्या बातम्या वाचल्या असतील. मात्र, बाजारामध्ये भ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता.अनेकदा बाजारामध्ये ताजी अंडी कोणती आणि शिळी कोणती हे ओळखता येत नाही. अनेक लोक हे एक डझन अंडे एकदाच घेऊन जातात.

मात्र, ही अंडी फ्रीजमध्ये नाही ठेवली तर ती खराब होऊन जातात. त्यामुळे एकाच वेळेस अंडी घेऊन आपण जात असाल तर जरा सावधान. अंडी पाहून खरेदी करावी. आपल्याला शिळे अंडी कोणती आणि ताजी कोणती हे ओळखता येत नाही. मात्र, नुकताच माय गो इंडिया या ट्विटर अकाउंटने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये ताजी अंडी कुठली आणि शिळे अंडी कुठली हे ओळखण्याचे प्रात्यक्षिक दाखवले आहे. तर आपल्याला ताजी अंडी ओळखायची असल्यास आपण एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घ्यावे. त्यामध्ये अंडे सोडावे हे अंडे आडवे आणि तळाशी राहिले तर हे अंडे ताजे समजावे. मात्र, अंडे हे वर तरंगत राहिले तर हे अंडे शिळे आहे, असे समजावे. अशाप्रकारे आपण ताजी अंडी आणि शिळे अंडी यामधला फरक ओळखू शकतात.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *