‘हे’ सुपरफूड भिजवून खाणे आरोग्यासाठी लाभदायक, मिळतो ‘या’ 5 आजारांपासून दिलासा

‘हे’ सुपरफूड भिजवून खाणे आरोग्यासाठी लाभदायक, मिळतो ‘या’ 5 आजारांपासून दिलासा

आपल्याला बऱ्याचदा सांगितले जाते की, ताकद येण्यासाठी किंवा निरोगी राहण्यासाठी चणे, मूग ही कडधान्य भिजवून खावी. भिजवून खालेले पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

मात्र, ही कोणती सुपरफूड आहेत. ज्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होतो? चला तर जाणून घेऊया अशी काही सुपरफूड जी भिजवून खाणे आरोग्यासाठी लाभदायक ठरते.

मेथीचे दाणे

तणाव कमी करण्यासाठी मेथीचे दाणे वापर उपयुक्त ठरतात. याशिवाय जर मेथीचे दाणे भिजवून सकाळी खाल्ले तर मधुमेहाच्या रुग्णांना ते खूप फायदेशीर ठरते. त्याचबरोबर ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांच्यासाठी मेथीचे दाणे भिजल्याने आतडेही साफ होतात. मेथीचे दाणे खाल्ल्याने पाळीच्या काळात होत असलेल्या वेदना कमी होण्यासाठी फायदा होतो.

खसखस

खसखस भिजवून सकाळी गरम पाण्यासोबत खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. त्यात फोलेट थायमिन, व्हिटॅमिन बी असते जे चयापचय वाढवण्यास मदत करते.

अळशी

जर तुम्हाला हृदयासंबंधी काही आजार असल्यास अळशी एक रामबाण उपाय आहे. अळशी रात्रभर पाण्यात भिजवून त्याचे सेवन करावे. ओमेगा ३ हा फॅटी एसिडचा एकमेव शाकाहारी स्त्रोत आहे. जे खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होते.

मनुका

मनुके रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी त्याचे सेवन करावे. यामुळे पचनक्रिया सुधारते. अॅसिडिटीचा त्रास दूर होण्यास मदत होते. तसेच अशक्तपणा, मूत्रपिंडातील दगडही बरा होतो. याच बरोबर कोरडी द्राक्षेही दुधात भिजवून खाऊ शकतात. कोरड्या द्राक्षांमध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम आणि लोहाचे प्रमाण जास्त असते. जे कर्करोगाच्या पेशी वाढण्यास प्रतिबंध करते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *