हे ‘3’ आसन केल्याने मासपेशी होतील मजबूत..’या’ आजारांपासून मिळेल, कायमची सुटका

हे ‘3’ आसन केल्याने मासपेशी होतील मजबूत..’या’ आजारांपासून मिळेल, कायमची सुटका

सध्या कोरोना महामारीमुळे तंदुरुस्त रहाणे अत्यावश्यक आहे. यामुळे अनेक जण सध्या रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या गोळ्या घेत आहेत. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे काढे देखील घेत आहेत. मात्र, यापेक्षाही आपण रोजच्या रोज व्यायाम करून आपली रोगप्रतिकारशक्ती ही वाढवू शकता. आपल्या आयुर्वेद, योगामध्ये असे भरपूर असने आहेत की, ज्यामुळे आपण योग्य व्यायाम करून आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकतात. आम्ही आपल्याला या लेखांमध्ये अशाच एका आसनाबद्दल माहिती देणार आहोत.

ज्यावेळी पोटाच्या मांसपेशी कमकुवत होतात, त्यावेळी अशक्त जागेतून अंग बाहेर येते, त्याला हार्निया असे म्हणतात. हा सामान्यतः पोटात असतो. बेंबी आणि कमरेच्या आसपासदेखील हार्निया होऊ शकतो. विविध आसने करून आपण हार्निया व इतर आजारावर नियंत्रण मिळू शकता.

वज्रासन : प्रथम गुडघ्यावर बसा. नंतर दोन्ही पायांना जोडा आणि टाचांना वेगळे करा. आता तुम्ही नितंबांना टाचा वर टेकवा आणि हातांना गुडघ्यावर ठेवा. तुम्ही पाठ डोके सरळ ठेवा. दोन्ही गुडघ्यांना जोडून घ्या. आता डोळे बंद करून घ्या. सामान्यता श्वास घेत राहा. अशा अवस्थेमध्ये तुम्ही पाच ते दहा मिनिटापर्यंत असे बसण्याचा प्रयत्न करा.

हे अासन उपाशीपोटी करावे. परंतु, वज्रासन जेवणानंतर केल्यास पचनक्रिया फायदेशीर ठरते. हर्नियासाठी हे अासन खूप फायदेशीर आहे. कारण यामुळे मांसपेशी मजबूत होतात. पोटाच्या समस्या कमी होतात आणि पोट निरोगी राहते दीर्घ श्वास घेतल्यामुळे फुफूस मजबूत होईल.

ताडासन : ताडासन करण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही उभे राहा आणि तुमच्या कमरेला आणि मानेला सरळ ठेवा. आता तुमच्या हाताला वर उचला आणि श्वास घेत हळूहळू शरीराला असे उचला की, पायाच्या बोटांपासून हाताच्या बोटांपर्यंत ताण जाणवला पाहिजे. या अवस्थेत काही वेळ श्वास सोडा हात आणि शरीराला पूर्व असताना तीन ते चार वेळा हे असं करा. हे असं केल्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. मुलांची उंची वाढवण्यासाठी हे अासन अतिशय फायदेशीर आहे. यामुळे हार्नियादेखील काही प्रमाणात कमी होऊ शकतो.

पादहस्तासन : हे असन करण्यासाठी सुरुवातीला सरळ उभे राहा. हातांना वर उचला आणि सरळ ठेवा. श्वास सोडा आणि तुमच्या शरीराला समोरच्या बाजूला वाकवा जोपर्यंत तुमच्या हाताचा पायाच्या बोटांना स्पर्श होणार नाही. आता हाताच्या बोटांना पायाच्या बोटात आणि ठेवा. या अवस्थेत कमीत कमी 15 ते 30 सेकंद हा तुमची पाठ आणि पाय सरळ ठेवा.

पूर्व अवस्थेत होण्यासाठी हाताला पायाखालून बाहेर काढा. आता शरीराला हळू सरळ करा त्यानंतर डोक्याला सरळ करा. काही वेळ श्वास घ्या आणि असे कमीत कमी दोन वेळेस करा. हे असे केल्याने तुमची पचनक्रिया सुधारते. वजन कमी करण्यास मदत करते. आणि नितंबामध्ये ताण निर्माण करते. यकृत आणि चांगले कार्य करण्यास मदत करते. मानसिक तणाव यामुळे कमी होतो.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *