बॉबी नाही तर ‘हा’ होता ऋषी कपूर यांचा पहिला चित्रपट, फक्त एका ‘चॉकलेटसाठी’ केलं होतं चित्रपटात काम

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे नुकतेच मुंबईत निधन झालं. त्यानंतर त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार देखील करण्यात आले. ऋषी यांच्या जाण्यानंतर त्यांच्या जुन्या आठवणींना अनेक जण उजाळा देत आहेत. यातच त्यांनी लहान असताना काम केलेल्या एका चित्रपटातील भूमिकेबाबत एक किस्सा व्हायरल होत आहे.
ऋषी कपूर यांनी बॉबी हा सोलो अभिनेता म्हणून पहिला चित्रपट जरी केला असला तरी त्यांनी अतिशय लहानपणीच चित्रपटात पदार्पण केले होते. ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटाचा आधी देखील त्यांनी एका चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील नाव होते ‘श्री 420’.
या चित्रपटामध्ये राज कपूर आणि नर्गिस यांच्या भूमिका होत्या. हा चित्रपट जुन्या काळी खूप गाजला होता. या चित्रपटातील ‘प्यार हुआ इकरार हुआ’ हे गाणे प्रचंड गाजले होते आणि या गाण्यातच तीन मुले पावसातून चालताना दिसतात. यातील एक मुलगा म्हणजे ऋषी कपूर हा होय.
या चित्रपटाबाबत ऋषी कपूर यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, या गाण्याचे चित्रीकरण सुरू झाले आणि मध्येच तीन मुले चालत असताना दाखवण्यात आली. यातील एक मुलगा म्हणजे मी होतो. आणि बाकीचे माझे भाऊ होते. मात्र, पावसात चालण्याने अंगावर पाणी पडत होते.
त्यामुळे मी पाणी पडल्या पडल्या खूप रडत होतो, असे करून अनेक शॉट झाले. मात्र, हा सीन काही केल्या पूर्ण होत नव्हता. त्यामुळे नर्गिस यांनी आपल्याला पाणी अंगावर पडल्यानंतर तू जर रडला नाहीस तर मी तुला चॉकलेट देईल, असे सांगितले होते.
मग चॉकलेट मिळणार या खुशीत मी अंगावर पाणी पडले, त्या वेळी अतिशय शांतपणे चालत समोर गेलो. त्यानंतर हा सीन पूर्ण झाला. त्यानंतर नर्गीस यांनी दिलेल्या आश्वासनालाप्रमाणे मला चॉकलेट देखील दिले. या चित्रपटातील हे गीत अतिशय गाजले होते आणि लहान जाणारी मुले देखील सुपरहिट ठरली होती. त्यानंतर ऋषी कपूर हे सर्वांच्या गळ्यातील ताईत झाले होते.