को’रो’नाच्या काळात फारच उपयुक्त आहे लसणाचा ज्यूस, पहा कसा आणि केव्हा घ्यायचा….

सध्याच्या को’रो’ना म’हामा’रीच्या काळामध्ये आपले आरोग्य जपणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. या काळामध्ये आपले आरोग्य जपून प्रतिकारशक्ती वाढवावी. नाहीतर आपण एखाद्या रु’ग्णाच्या संपर्कात आल्यावर आपली प्रतिकारशक्ती कमी झाल्यास हा आजार आपल्याला देखील लागू शकतो.
यासाठी आपण दर्जेदार असे अन्न फळ आणि ोषक द्रव्यांचे सेवन करणे आवश्यक असते. यासोबतच आपण काही घरगुती वस्तू देखील खाऊन अनेक आजारांवर मात करू शकता. साधा सर्दी-खोकला जर आपल्याला आला असेल तर आपण घशातील खवखव, खोकला, सर्दी, ताप देखील कमी करू शकतो.
आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये लसुन खाण्याचे फायदे सांगणार आहोत. लसूण खाल्ल्याने आपले र’क्ताभिसरण हे व्यवस्थित रित्या होत असते. त्यामुळे आपल्या आहारामध्ये नेहमी लसूण हा खावा. लसुन खाल्ल्याने होणारे फायदे जाणून घेऊया.
1) खोकला – सध्याच्या काळामध्ये खोकला आला तर आपल्याला अतिशय घाबरायला होते. त्यामुळे आपल्याला जर साधारण खोकला आला असेल तर आपण दोन लसणाच्या पाकळ्या घेऊन त्याचा रस तयार करावा आणि डाळींबावर हा रस टाकावा. त्यानंतर हे डाळिंब आपण खावे. त्यानंतर आपला खोकला हा नक्कीच कमी होतो.
2) अस्थमा- सध्याच्या या महामारी मध्ये ज्या लोकांना दमा अस्थमाचा त्रास हा आहे. त्या लोकांना हा आजार लवकर जडू शकतो. ज्या लोकांना अस्थमाचा त्रास आहे, अशा लोकांनी मध आणि लसुन एकत्रित करून खावा, असे केल्याने अस्थमाचा त्रास हा कमी होतो. मात्र, यासाठी मध उच्च प्रतीचा घ्यावा.
3) घशातील खवखव- वातावरण बदललं तर आपल्याला घशात खवखव ही होत असते. यावर आपण गरम पाणी नेहमीच पीत असतो. मात्र, कोमट पाण्याबरोबर आपण लसणाची पाकळी टाकून जर गुळण्या केल्या तर आपल्या घशातील खवखव कमी होते.
4) केस गळती- अनेक लोकांना वाढत्या वयासोबत किंवा शरीरात होणाऱ्या बदलामुळे केस गळतीची समस्या ही मोठ्या प्रमाणात असते. यासाठी आपण इतर उपाय तर करतच असता. मात्र, यासाठी आपण लसुणाची पेस्ट करून आपल्याला ज्या ठिकाणी केस गळती आहे त्या ठिकाणी लावावी. असे केल्याने आपली केस गळती होणार नाही.
5) महिलांसाठी उपयोगी- महिलांना हार्मोन्स बदलाने वेगवेगळे त्रास होत असतात. त्यामुळे महिलांनी रोज एक लसणाची पाकळी खावी. असे केल्याने आरोग्य त्यांचे व्यवस्थित राहते.
6) हृदय रोग- अनेकांना रक्त घट्ट होण्याची समस्या असते. त्यामुळे अशा लोकांनी लसणाची पाकळी रोज खावी, असे केल्याने रक्त पातळ होऊन ह्रदय रोगाची समस्या होत नाही.
7) पिंपल्स- अनेक तरुण-तरुणींना पिंपल्स येण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात असते. अशा तरुणांनी व तरुणींनी कुठलेही क्रीम लावण्याआधी लसणाची पेस्ट याठिकाणी पिंपल्स आले आहे, त्या ठिकाणी लावावी, असे केल्याने आपले पिंपल्स कमी होतात.