….म्हणून फ्रीजमध्ये ठेवलेले गव्हाच्या ‘मळलेल्या’ शिळ्या ‘पिठाच्या’ चपात्या करू नये…..

आपण नेहमी रात्रीचे शिल्लक राहिलेले काही पदार्थ नेहमी फ्रीजमध्ये ठेवत असतो. पण अशी काही पदार्थ आहेत की जे कितीही वेळ फ्रिजमध्ये ठेवले तरी त्याच्या काहीच उपयोग होत नाही किंवा त्याचा विपरीत परिणाम होऊन तो पदार्थ आपल्या शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकतो. फ्रिजचे टेम्परेचर कितीही असले तरी त्या पदार्थावर याचा काहीच परिणाम होत नाही. त्या वस्तू तुमच्यासाठी बेकारच नाही तर जीवघेण्या होतात.
सध्याच्या काळात स्त्री घरात बसलेली तुम्हाला दिसणार नाही ती सुध्दा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नोकरी करते आणि आपल्या संसारालाही हातभार लावते. पण ज्याप्रमाणे तुम्ही नोकरी करून आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करता ती फक्त दोन वेळ पोटभरून खाण्यासाठी नाही तर त्याचबरोबर तुमचे स्वास्थ ही निरोगी राहायला हवे असे नाही का तुम्हाला वाटतं.
बर्याच महिला सकाळची कामे सोपी होण्यासाठी गव्हाचं पीठ रात्रीच भिजून फ्रीजमध्ये ठेवत असतात. आणि सकाळी ते वापरत असतात, नक्कीच याने वेळेची बचत तर होतेच पण तुम्ही जे मळलेले पीठ फ्रिज मध्ये ठेवत आहात ते पीठ जास्त काढ फ्रिजमध्ये ठेवल्याने आपल्यासाठी घातक ठरू शकते.
फ्रिजमध्ये पीठ ठेवत असताना या चुका करू नका
भिजलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवत असताना महिला एक चूक करतात पहिली म्हणजे भिजलेले पीठ तीन बंद डब्यात ठेवावे जेणेकरून ते काळे पडत नाही आणि काळे पडलेले पीठ आपल्या शरीरासाठी धोकादायक असते.
फ्रिजमध्ये ठेवलेले पीठ जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवू नका कारण जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यास आंबण्याची प्रक्रिया सुरू होते. आणि भिजलेल्या पिठामध्ये काही बॅक्टेरिया आणि हानिकारक रसायन तयार होतात. त्यामुळे पोळ्या लवकर खराब होतातच त्याचबरोबर आपल्याला पोटाच्या समस्या देखील उद्भवतात.
फ्रीजमध्ये ठेवलेले हे पीठ जास्तीतजास्त 48 तासांपर्यंत वापरा त्यापुढे जाऊन ते खराब होते. शिवाय शिळ्या पिठाच्या चपात्या तशा चवीला ही चांगल्या नसतात आणि तुमच्या शरीराच्या दृष्टीनेही चांगल्या नसतात.
म्हणून जर तुम्हाला शक्य होत नसेल तरच मळलेल्या पिठाच्या चकल्या बनवा नाहीतर ताजे पीठ मळून पोळ्या बनवलेले कधीही उत्तम. फ्रिजमध्ये ठेवलेल्या पिठाचा बनवलेल्या पोळ्या खडक येतात.
लहानपणापासूनच तुमच्या कानावर एक शब्द पडला असेल की शीळ अन्न खाऊ नये, शीळ अन्न खाल्ल्यामुळे विविध प्रकारच्या आजार होतात त्याचप्रमाणे शीळ वारंवार खाण्याने आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकते. म्हणून थोडा उशीर झाला तरी चालेल पण ताज्या मळलेल्या पिठाच्या पोळ्या बनवा.