पाच बॉडी बिल्डर, जे नकली बॉडी बनवून लोकांना बनवत आहेत मूर्ख, अशा पध्दतीने त्यांनी बनवली आहे बॉडी

फिजिकल फिटनेस हा कोणाला नाही आवडत. आजकालच्या जमान्यात तर व्यायाम करणे फार महत्त्वाचे आहे. सध्या कोरोना महामारी मुळे तर आपले शरीर सुदृढ ठेवून प्रतिकारशक्ती वाढवणे हे अतिशय गरजेचे बनले आहे.
फार पूर्वीपासून आपल्या देशात सूर्यनमस्कार योग आणि इतर व्यायामाच्या पद्धती आहेत. पूर्वीच्या काळी अनेक जन एकाच वेळी 1000 सूर्यनमस्कार काढत असे. मात्र, आताच्या जमान्यात जिम लावून व्यायाम करणे याकडे ट्रेंड वाढत आहे. तरीदेखील अनेक जण सायकलिंग, रनिंग आणि पायी फिरणे याला प्राधान्य देतात.
मात्र, काही जण असे आहेत की जे जिममध्ये जाऊन केवळ सिक्स पॅक बॉडी बनवत आहेत. तर आम्ही आपल्याला अशाच पाच बॉडी बिल्डर बद्दल आपल्याला माहिती देणार आहोत ज्यांनी बनावट म्हणजे कृत्रिम बॉडी बनवली आहे.
1.रोमिनेरो डोस सारोस अलेक्स: हा एक ब्राझीलियन बॉडी बिल्डर आहे. त्याला व्यायाम करायची लहानपणापासून आवड होती. त्यामुळे तो जिममध्ये जायचा. मोठ्या मसल्स असणाऱ्या लोकांशी त्याचा संपर्क झाला. त्यानंतर त्यांनी त्याला बॉडीमध्ये बदल होईल, असे सांगितले.
मात्र अल्कोहल इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तो बॉडी मध्ये अल्कोहोल आणि इतर केमिकल घेतो. असे करण्यास त्याला डॉक्टरांनी विरोध केला आहे. तसेच असे केल्यास मृत्यू ओढवू शकतो, असेही सांगितले आहे. मात्र, तरीदेखील तो कृत्रिमरीत्या बोडी फुगवत आहे.
2. मुस्तफा इस्माईल: हा इजिप्तमध्ये राहणारा एक मोठा बॉडीगार्ड आहे. याची बॉडी देखील अतिशय भयंकर आहे. त्याची साइज मोठी असून त्याचे दंड 31 इंच मोठे आहेत. तोदेखील सिंथोल आणि इतर कृत्रिम इंजेक्शन घेऊन आपले बॉडी फुगवतो.
3. जस्टिन जेडली: हा एक अमेरिकन बॉडीगार्ड आहे. तो दिसायला हडकुळा आहे. पण त्याचे शरीर अतिशय पिळदार आहे. त्याने आजवर सातशे सर्जरी करून आपला चेहरा आणि शरीर पूर्ण खराब करून टाकले आहे. त्याची बॉडी दिसत असली तरी ती बनावट कृत्रिम आहे.
4. ब्लादिमीर सिगा रो: ब्लादिमीर हादेखील एक धष्टपुष्ट बॉडी बिल्डर आहे. याने देखील बनावट रसायने वापरून आपली बॉडी केली आहे. अमली पदार्थ वापरून आपली बॉडी फुगवत असल्याचे सांगण्यात येते.
5. अल रिंडो डिसूजा: हादेखील एक वेगळाच बॉडी बिल्डर आहे. याला देखील आपले शरीर बनवायचे होते. त्यामुळे त्याने केमिकल वापरून आपले दंड तयार केले आहेत. मात्र, ही बॉडी काहीही कामाची नाही. डॉक्टरांनी याला देखील अशी बॉडी केल्यास शरीराला अपाय होऊ शकतो, असे सांगितले होते. मात्र, त्याने काही ऐकले नाही.