बापरे ! एवढी झाली होती सुपरहिट ठरलेल्या ‘बॉर्डर’च्या पहिल्या दिवसाची कमाई?

बापरे ! एवढी झाली होती सुपरहिट ठरलेल्या ‘बॉर्डर’च्या पहिल्या दिवसाची कमाई?

आजपर्यंत बॉलिवूडमध्ये देशभक्तीवर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती झाली. मात्र या सगळ्या चित्रपटांमध्ये प्रेक्षकांच्या मनावर कोरला गेलेला चित्रपट म्हणजे जे. पी. दत्ता यांचा बॉर्डर. भारत-पाकिस्तान युद्धाची कथा सांगणारा हा मल्टीस्टारर चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास २३ वर्ष झाली आहेत.

मात्र तरीदेखील त्याची लोकप्रियता तसुभरही कमी झालेली नाही. हा चित्रपट त्याकाळी तुफान गाजला होता.विशेष म्हणजे या चित्रपटाने त्यावेळी पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर कोटयवधी रुपयांची कमाई केली होती.

१९९७ साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेला हा चित्रपट त्याकाळी विशेष लोकप्रिय झाला होता. इतकंच नाही तर प्रेक्षकांमध्ये त्याची तुफान क्रेझ वाढली होती. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांबाहेर गर्दी करत होते म्हणूनच हा चित्रपट त्याकाळी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता.

या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल १ कोटी १० लाख रुपयांची कमाई केल्याचं म्हटलं जातं. ही रक्कम त्याकाळी सर्वात मोठी रक्कम होती. त्यानंतर या कमाईची आकडेवारी वाढत गेली आणि तो सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.

दरम्यान, हा चित्रपट मल्टीस्टाटर असून यात सनी देओल, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना, राखी, तब्बू, पूजा भट्ट असे अनेक दिग्गज कलाकार झळकले होते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *