धोनीच्या शिष्याने गुरूला टाकले माघे; 24 तासांत २ वेळा केले ‘हे’ काम..

धोनीच्या शिष्याने गुरूला टाकले माघे; 24 तासांत २ वेळा केले ‘हे’ काम..

भारतीय क्रिकेट जगातील एक ऐतिहासिक नाव म्हणून नेहमीच महेंद्र सिंह धोनीचे नाव घेतले जाते. धोनीने आपल्या दमदार खेळीने वेगवेगळे नवीन विक्रमांची नोंद स्वतःच्या नावावर केली आहे. त्याने आपला खेळ केवळ स्वतःपुरता मर्यादित ठेवला नाही तर, इतर नवीन खेळाडूंना देखील शिकवला. ज्ञान दिल्याने वाढते, हे धोनीने नेहमीच सिद्ध केले आहे.

धोनीसोबत खेळणारे अनेक खेळाडू त्याला आपला गुरु मानतात. अनेकांना धोनीने खेळातील बारीक आणि खास गोष्टी शिकवल्या आहेत. त्यामुळे अनेक धोनी अनेक नवख्या खेळाडूंचा गुरु आहे, असं म्हणलं तर चुकीच ठरणार नाही. अशाच नवख्या खेळाडूंपैकी एक मराठमोळा ऋतुराज गायकवाड देखील आहे.

पुण्याच्या ऋतुराज गायकवाडने काहीच दिवसांत सगळीकडेच आपल्या खेळाचा डंका वाजवला आहे. त्याच्या उत्तम खेळाने भल्याभल्या खेळाडूंना अवाक केले आहे. Chennai Super Kings टीमने, यंदाच्या झालेल्या आयपीएल स्पर्धेचं (IPL 2021) विजेतेपद पटकावले. या विजयामध्ये Ruturaj Gaikwadने खूप मोठे योगदान होते.

धोनीने आणि टीमच्या प्रमुखांनी देखील ऋतुराजच्या या योगदानाची दखल घेत त्याला पुढील सिझनसाठी मोठ्या रक्कमसोबत रिटेन केले आहे. आणि आता ऋतुराजने देखील, धोनीचा विश्वास सार्थ ठरवला आहे. त्याचा जबरदस्त फॉर्म कायम ठेवत अजून एक नवीन विक्रम त्याने आपल्या नावे केला आहे. सध्या विजय हजारे स्पर्धा (Vijay Hazare Trophy) सुरु आहे.

या स्पर्धेमध्ये ऋतुराज महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. या स्पर्धेत त्याने सलग दुसऱ्या दिवशी देखील शतक झळकावले आहे. त्याने गुरुवारी छत्तीसगड विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये १४३ बॉलमध्ये नाबाद १५४ रनची दमदार खेळी केली. या खेळीच्या दरम्यान त्याने १४ फोर व ५ सिक्स लगावले.

त्याच्या या जोरदार खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने ही मॅच ८ विकेट्सनं दणदणीत जिंकली. यश नाहरनं ५२ रन करत, त्याला चांगली साथ दिली. एका दिवसापूर्वीच, रुरतुराजने मध्य प्रदेश विरुद्ध ११२ बॉलमध्ये १३६ धावा केल्या होत्या. ऋतुराज कॅप्टन म्हणून देखील या स्पर्धेत चांगलाच यशस्वी ठरत आहे.

महाराष्ट्र क्रिकेट टीमने त्याच्या कॅप्टनसीमध्ये सलग दोन मॅच जिंकत स्पर्धेची दमदार सुरुवात केली आहे. ऋतुराज साठी २०२१ हे वर्ष चांगलेच यशस्वी ठरले आहे. आयपीएल स्पर्धेमध्ये देखील त्याने सर्वाधिक ६३५ धावा करत प्रथमच ऑरेंज कॅप पटकावली होती. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेमध्ये देखील ५ मॅचमध्ये १५० हुन अधिक स्ट्राईक रेटने २५९ धावा केल्या.

आणि आता विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत देखील सलग २ शतक झळकावत त्याने आपला फॉर्म कायम ठेवला आहे. म्हणूनच आपल्या या जबरदस्त फॉर्ममुळे आता ऋतुराजने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वन-डे टीमसाठी त्याची दावेदारी सादर केली आहे. कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) व हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) आता ऋतुराजच्या नावाचा निवड समितीकडे आग्रह करण्याची दाट शक्यता आहे.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *