घनसावंगीचा लेक बनला महाराष्ट्राचा ‘रक्षक’ आरोग्य मंत्री ‘राजेश टोपे’ यांची कौतुकास्पद प्रवास.

सध्या जगभरसह देशात आणि पर्यायाने महाराष्ट्रात देखील कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. रोजच्या रोज पाचशेवर रुग्ण सध्या राज्यात सापडत आहेत. तरीदेखील यामध्ये आशादायी चित्र दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीमधील आरोग्य मंत्री राजेश टोपे सध्या सर्वांना धीर देत आहेत.
आम्ही सर्व परिस्थिती पुन्हा जशाच्या तशी करू, असा विश्वास लोकांना देत आहेत. खऱ्या अर्थाने टोपे महाराष्ट्राची लढाई हे एकहाती लढत आहेत. ‘मीच माझा रक्षक’ अशी टॅगलाईन घेऊन त्यांनी लोकांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे.
उच्च विद्याविभूषित असलेले राजेश टोपे हे जालना जिल्ह्यातील घनसांगवी या मतदारसंघाचे नेतृत्व करतात. त्यांचे वडील अंकुशराव टोपे यांनी राज्याच्या राजकारणात मोठा काळ गाजवला आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजेश यांनीदेखील आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.
महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात टोपे यांच्यावर आरोग्यमंत्री जबाबदारी देण्यात आली. सरकार स्थापन होऊन काही महिने झाले असतानाच कोरोना महामारीचे संकट राज्यावर ओढावले आहे. अशा परिस्थितीत टोपे यांनी सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. राज्यामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून टोपे दररोज माध्यमांसमोर येऊन नागरिकांना रुग्णांबाबत आणि सध्याच्या स्थितीबाबत माहिती देतात.
त्यामुळे राजेश टोपे हे राज्यातील जनतेच्या गळ्यातले ताईत बनले आहेत. पर्यायाने ते अतिशय लोकप्रिय आरोग्यमंत्री ठरल्याचे सध्यातरी दिसत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्यावर जो विश्वास टाकला त्याला कुठेही तडा न जाऊ देता टोपे यांनी अतिशय शांतपणे आपली भूमिका बजावली आहे.
आई रुग्णालयात असताना राज्याची चिंता
राजेश टोपे यांच्या मातोश्री सध्या मुंबईतील एका रूग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोना व्हायरस संकट आल्यानंतर टोपे यांनी आईची रोज सकाळी भेट घेऊन राज्याची चिंता आपली जबाबदारी असल्याचे आपल्या कृतीतून दाखवून दिले. त्यामुळे त्यांनी लोकांच्या मनात तान निर्माण केले.
सोशल मीडियावर लोकप्रिय
कोरोना संकट ज्याप्रकारे टोपे यांनी हाताळले. त्यानंतर त्यांच्या फॉलोवरमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. फेसबुक, ट्विटर यासारख्या माध्यमातून टोपे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
तसेच त्यांना आगामी काळासाठी शुभेच्छा देण्यात देखील लोक कमी पडत नाहीत. याआधी असा आरोग्यमंत्री कधीही पाहिला नाही, अशाही टिप्पणी अनेक जण करतात.
असा आहे राजकीय प्रवास
टोपे यांनी २००९ मध्ये घानस्वांगी या मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यानंतर ते राज्यात मंत्री झाले. मात्र २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत त्यांनी अगदी काही मतांच्या फरकाने शिवसेना उमेदवारावर विजय मिळवला होता. टोपे यांच्या जालना जिल्ह्यात अनेक संस्था आहेत. तसेच अनेक सहकारी संस्थांचे देखील ते कामकाज पाहतात.
आजपर्यंत भैयासाहेब अजेय आहेत कधीही त्यांचा पराभव झालेला नाही
चुकीची माहिती प्रसारित करू नका.