बाबो ! Mukesh Ambaniचा कुक कमावतो मुख्यमंत्रीपेक्षाही जास्त पगार, मुलं शिकतात अमिरिकेत, पगार बघून चकित व्हाल..

बाबो ! Mukesh Ambaniचा कुक कमावतो मुख्यमंत्रीपेक्षाही जास्त पगार, मुलं शिकतात अमिरिकेत, पगार बघून चकित व्हाल..

आशिया खंडामध्ये सगळ्यात श्रीमंत व्यक्ती म्हणुन मुकेश अंबानी(mukesh ambani) यांचा समावेश होतो. मुकेश अंबानी यांनी आपले साम्राज्य खूप मोठ्या प्रमाणात जपले आहे आणि वाढवले आहे. सध्या जिओच्या माध्यमातून ते आपल्या टेलिकॉम क्षेत्राचे जाळे देशभर पसरवण्यामध्ये यशस्वी झाले आहेत. त्यांचे अनेक उद्योग हे अब्जावधी रुपयांचे आहेत.

त्यांचे वडील धीरूभाई अंबानी हे देखील अतिशय जबरदस्त असे व्यावसायिक होते. धीरूभाई अंबानी यांच्या जीवनावर गुरु नावाचा एक चित्रपट काही वर्षापूर्वी आला होता. या चित्रपटामध्ये अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट प्रचंड चालला होता. आता मुकेश अंबानी यांचा पुढचा वारसा त्यांची मुलगी ईशा अंबानी, मुलगा आकाश आणि अनंत हे सांभाळत आहेत.

मात्र, असे असले तरी या सगळ्यांवर नियंत्रण हे मुकेश अंबानी(mukesh ambani) यांचे असते. आज आम्ही आपल्याला मुकेश अंबानी यांच्या एका खास गोष्टी बाबत माहिती सांगणार आहोत. तर मुकेश अंबानी यांच्या प्रत्येक गोष्टीबाबत बातम्या होत असतात. त्यामुळे त्यांचे घर गाड्या वापरण्यात येणारी चहाची पत्ती किंवा त्यांची पत्नी नीता अंबानी किती लाखाच्या साड्या वापरतात.

त्याच्या बातम्या देखील आजवर अनेकदा आलेल्या आहेत‌. मात्र, आज आम्ही आपल्याला त्यांच्या घरातील कुक बाबत माहिती सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी हे केवळ त्यांच्या कामासाठीच नाही तर त्यांच्या जीवनशैलीसाठीही ओळखले जातात. अंबानी हाऊस अँटिलियाबद्दल कोणाला माहिती नाही? देशातील सर्वाधिक चर्चेत असलेली ही एक गोष्ट आहे.

जगातील सर्वात महागड्या इमारतींपैकी एक अँटिलिया एखाद्या महालाप्रमाणे आहे. देशातील आणि आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणजे मुकेश अंबानी हे होय. अंबानी कुटुंबाच्या घरी सुमारे 600 कर्मचारी आहेत. जे घरकामापासून स्वयंपाकापर्यंत विविध गोष्टींची काळजी घेतात. अंबानी यांच्या घरामध्ये जे काम करत आहेत त्यांच्या पगारीची आपण कल्पनादेखील करू शकत नाही.

कोट्यवधी रुपयांमध्ये हे कर्मचारी पगार घेत असतात. त्यांचा पगार एखाद्या मुख्यमंत्री पेक्षा देखील कमी नाही. आज आम्ही आपल्याला मुकेश अंबानी यांच्या घरामध्ये जो मुख्य आचारी आहे त्याच्या बाबत माहिती सांगणार आहोत. एका वेब पोर्टलने याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या घरामध्ये जो मुख्य आचारी आहे त्याचा पगार जवळपास दोन लाख आहे.

त्यांच्या घरांमध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांचा प्रत्येकाचा किमान पगार हा दोन लाख रुपये महिना असल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या पगारात आयुर्विमा आणि शिक्षण भत्ता यांचाही समावेश आहे. यातील दोन कर्मचार्‍यांची मुले अमेरिकेत शिकत असल्याची माहिती आहे. या अहवालानुसार, स्वयंपाकी 2 लाख रुपये किंवा त्याहून अधिक कमावतो.

या शेफसाठी ही मोठी रक्कम आहे. अंबानींना दररोज कोणता मेनू आवडतो याबद्दल अनेकांना जाणून घेण्याची इच्छा असते. अंबानी हे अब्जाधीश आहेत. पण लोकांना त्याच्या पैशापेक्षा त्याचा साधेपणा आणि नम्रता जास्त आवडते. मुकेश अंबानी हे देशातील सर्वात मोठ्या व्यवसायाच्या साम्राज्याचे मालक आहेत पण ते साध्या भारतीय जेवणाचा आस्वाद घेणे पसंत करतात.

मुकेश अंबानी हे शाकाहारी आहेत. मुकेश अंबानींना घरी बनवलेले साधे गुजराती जेवण आवडते. त्याला फॅन्सी डिशेस आवडत नाहीत. एका न्यूज पोर्टलनुसार, मुकेश अंबानी आपल्या दिवसाची सुरुवात पपईच्या रसाने करतात, दुपारच्या जेवणात सूप आणि सॅलड खातात. साधी रोटी आणि डाळ खातात. तर त्यांच्या घरातील जो मुख्य आचारी आहे त्याला जवळपास दोन लाख रुपये महिना आणि त्यांची मुले परदेशात शिकत असल्याचे देखील या वेब पोर्टल मध्ये सांगण्यात आले आहे.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published.