कोरोनावर ‘आर्सेनिकम अल्बम 30’ खरंच उपयुक्त ठरतंय ? वाचा सविस्तर

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून कोरोना विषाणूवर अद्याप कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. मात्र, कोरोनाला अटोक्यात आणण्यासाठी एक आशेचा किरण दिसला आहे. होमिओपॅथिक रोग प्रतिकार शक्ती वर्धक औषध पुढे आलं आहे. सध्या
मिओपॅथीमधील आर्सेनिकम अल्बम 30 या औषधाची खूप मोठ्या प्रमाणावर सर्वत्र चर्चा सुरु आहे.
साबुदाण्यासारख्या दिसणाऱ्या होमिओपॅथिक गोळ्या अनेकांना खाण्यास आवडतात. होमिओपॅथिचं एक औषध बऱ्याच आजारांवर काम करू शकतं.
सध्या आर्सेनिक अल्बम 30 हे औषध चर्चेत आहे. कारण कोरोनाची जी लक्षणं आहेत त्या लक्षणावर प्रभावी असणारं हे औषध आहे. या औषधामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होत असल्यामुळे या औषधाची मागणी वाढली आहे. आयुष मंत्रालयाने प्रतिबंधात्मक उपचार म्हणून हे औषध घेण्याचा सल्ला दिल्यानंतर या औषधाकाडे लोकांचा कल वाढू लागला आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण हे औषध घेऊ शकतात.
असे तयार होते हे औषध
शेळीचे दूध, अल्कोहोल आणि सॅक्रीम हे सर्व मिक्स करून याची फर्मासीमध्ये प्रक्रिया पूर्ण करून हे होमिओपॅथिक औषध तयार केलं जातं.
गोळ्यांचे सेवन कसे करायचे
होमिओपॅथिक गोळ्यांना हात न लावता औषधांच्या झाकणात घेऊन सरळ जिभेवर टाकून चोखायचे. कारण होमिओपॅथिक गोळ्यांच्या वरील भागावर त्यांचे अंश असतात त्यामुळे हात न लावता आणि खाली पडू न देता औषधं खावीत.
या वयोगटासाठी आहे औषध
सर्व वयोगटातील व्यक्ती या गोळ्यांचे सेवन करू शकतात. एकावेळी लहान मुले दोन गोळ्या तर मोठ्या व्यक्ती चार ते पाच गोल्या खाऊ शकतात. शिवाय इतर कोणत्याही आजारावर या गोळ्या घेता येतात.
असा करा गोळ्यांचा वापर
रोज उपाशीपोटी तीन गोल्या केवळ सलग तीन दिवस घ्याव्यात. त्यानंतर महिनाभरानंतर पुन्हा या गोळ्या तीन दिवस घ्यायच्या आहेत. असे सलग तीन महिने या गोळ्यांचे सेवन करायचे आहे.
हे पाळा पथ्य
होमिओपॅथिक उपचार घेताना आहारात तीव्र गंध असलेले पदार्थ टाळणे उत्तम. लसूण, आलं, कच्चा कांदा, कॉफी यासारख्या पदार्थांना तीव्र वास असतो. तीव्र वासामुळे होमिओपॅथिक औषधांचा परिणाम कमी होतो.
वेळेचे नियम पाळा
होमिओपॅथी औषध घेण्याच्या पंधरा मिनिटे आधी आणि पंधरा मिनिटे नंतर काहीही खाणं किंवा पिणं टाळा. आर्सेनिक अल्बम 30 हे औषध होमिओपॅथिक फर्मासी, मेडिकल्स, होमिओपॅथिक डॉक्टर, आयुर्वेदिक शॉप या ठिकाणी उपलब्ध आहेत.
डॉक्टरांचे यावर मत
कोरोना व्हायरसचा श्वसनंस्थेवरती होणारा प्रभाव, तापमानातील या आजाराबाबत वाढलेली भीती विचारात घेतली तर अर्सेनिक अल्बम या औषधाच्या गुणर्धमाची सर्व लक्षणं मिळती जुळती आहेत. म्हणूनच आर्सेनिक अल्बम हे औषध कोरोनावर रोगप्रतिकारकशक्ती वर्धक म्हणून वापरले जाऊ शकते.
अवघे जग कोरोनाविरोधात लस शोधत आहे. मात्र, अद्यापही कोणत्याही देशाला म्हणावे तसे यश आले नाही. आपल्यातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सध्या होमिओपॅथी औषधांचा वापर केला जात आहे. केवळ रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी या औषधांचा सल्ला दिला जात आहे. पण यामुळे कोरोना बरा होतो असे नाही.
टीप
– डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच होमिओपॅथिक औषधांचा वापर करा
– होमिओपॅथिक औषधे उघडे ठेवू नका
– हे औषध घेतल्यानंतर बाटलीचे झाकण बंद करा
– या औषधांना स्पर्श करू नका
– औषधांच्या बाटलीच्या झाकणातून सरळ जिभेवर औषध घ्या.