सावधान…! चुकूनही पिऊ नका कोल्ड्रिंग…. पित असाल तर भोगावे लागतील हे परिणाम

उन्हाळ्यामध्ये आपल्याला शरीराची गर्मी करण्यासाठी थंडपेय द्यावे लागतात. त्यासाठी आपण दही, ताक आणि इतर पदार्थ वापरतो. तसेच लिंबू सरबत देखील यावर प्रभावी आहे. मात्र, असे असले तरी तरुण पिढी सध्या मोठ्या प्रमाणात कोल्ड्रिंगचा वापर करत असते. कोल्ड्रिंगमध्ये अतिशय घातक रसायने असतात. त्यामुळे असे द्रव्य पिणे हे शरीराला अतिशय घातक असते. त्यामुळे कधीही असे घातक पदार्थ न पिता आपण घरगुती बनवलेले थंड पेय पिले तरच चांगले ठरेल.
तसेच उन्हाळ्यामध्ये अनेकजण हे थंडावा मिळविण्यासाठी एसीची वापर मोठ्या प्रमाणात करत असतात. मात्र, असा वापर केल्याने देखील शरीराला अपाय होतात. त्यामुळे कुलर किंवा आपल्या घरातील खिडक्या उघड्या ठेवाव्यात. त्यामुळे आपल्याला अधिक त्रास होणार नाही आणि आपल्या शरीराचे तापमान मेन्टेन राहील. तसेच शरीराला थंडावा मिळण्यासाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचे सेवन करावे यामुळे फायदा होईल.
कोल्ड्रिंग मुळे आपल्याला होणारे नुकसान आपल्याला या लेखात सांगणार आहोत.
१. रक्तातील साखर वाढते: कोल्ड्रिंग पिल्याने तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण केवळ मिनिटात वाढत जाते. तसेच शरीरातील साखर व सोडियम देखील यामुळे वाढते.
२. रक्तदाब वाढतो: जर आपण कोल्ड्रिंगचे नियमितपणे सेवन करत असाल तर हे अतिशय धोकादायक आहे. कोल्ड्रिंक पिल्यानंतर चाळीस मिनिटाच्या आत तुमचा रक्तदाब हा वाढण्यास सुरुवात होतो. त्यानंतर तुमचे डोके हे सारखे दुखत राहते.
३. कॅल्शियम मॅग्नेशियम जाते: जर आपण कोल्ड्रिंग सेवन करत असाल आणि त्यानंतर एका तासानंतर लघवीला गेल्यास आपल्या शरीरातील कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक यासारखे अनेक पदार्थ लघवीवाटे निघून जातात. यामुळे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो.
४. वजन वाढते: आपण जर नियमित कोल्ड्रिंग पिणारे असाल तर जरा याकडे लक्ष असुद्या. नेहमीच कोल्ड्रिंग घेतले तर आपले वजन वाढते. तसेच शरीराची चरबी देखील खूप वाढते. यामुळे हृदयरोग, मधुमेह यासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. त्याचा मोठा परिणाम होतो.