चेहऱ्यावरील ‘ब्लैकहेड्स’ दूर करण्यासाठी घरघुती व एकदम सोप्पे उपाय !

चेहऱ्यावरील ‘ब्लैकहेड्स’ दूर करण्यासाठी घरघुती व एकदम सोप्पे उपाय !

आपल्या समाजात छान दिसण्याला फार महत्व दिले जाते. आणि त्यामुळे छान दिसण्यासाठी आजची तरुण पिढी नवनवीन प्रयोग करून बघत असतात. यामध्ये शरीरात होणारे नवनवीन बदलांमुळे चेहऱ्यावर मुरुम किंवा काळे डाग जमत असतात. याला कारण असे की वेळोवेळी चेहरा स्वच्छ न करणे. म्हणून आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्याचे काही घरगुती उपाय सांगणार आहोत, चला जाणून घेऊया.

ब्लॅकहेड्स ही अशी एक समस्या आहे जी कोणत्याही वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला होऊ शकते. पण किशोरवयीन काळात ती विशेषतः दिसू लागते आणि काळानुसार वाढत जाते.

ब्लॅकहेड्स अगोदर लहान पिवळ्या रंगाचे असतात नंतर काळे रंगाचे होऊन वाढतात. हे रोम छिद्रांमध्ये घाण जमा झाल्यामुळे तयार होतात. हार्मोनल बदल, सौंदर्य उत्पादनांचा वापर, त्वचेची अपुरी काळजी, तणाव आणि इतर समस्यांमुळे बऱ्याच वेळा ब्लॅकहेड्स उद्भवतात.

ब्लॅकहेड्स काढून टाकण्यासाठी बरीच प्रकारच्या औषधे आणि क्रीम बाजारात उपलब्ध आहेत, परंतु आपण घरगुती उपचारांचा अवलंब करणे कधीही चांगले आहे. आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा आपण वापर हा ब्लॅकहेड्स अगदी सहजपणे काढण्यासाठी वापरू शकतो.

1) ब्लॅकहेड्सला दूर करण्यासाठी बेकिंग सोडा हा एक प्रभावी उपाय आहे. हे चेहऱ्यावरील सर्व घाण साफ करते. यासह, सूक्ष्म खड्ड्यांमध्ये जमा होणारी घाण त्याच्या वापराने साफ होऊन जाते.

2) आपल्या स्वयंपाकघरातील मसाल्यांपैकी एक म्हणजे दालचिनी. ब्लॅकहेड्स काढून टाकण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. हळद आणि लिंबाच्या रसात दालचिनी मिसळुन लावण्याने याचा फायदा होतो.

3) ओट मील आणि दही याचे मिश्रण तयार करून त्याची पेस्ट लावून ब्लॅकहेड्स देखील काढून टाकले जाऊ शकतात.

4) चेहऱ्यावरील डागांच्या उपचारात लिंबाचा रस हा वापरला जातो. हे ब्लॅकहेड्स देखील सहजपणे काढून टाकते. लिंबामध्ये असलेले पोषक आणि व्हिटॅमिन सी त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात.

5) ग्रीन टीचा वापर ब्लॅकहेड्स साफ करण्यासाठी देखील केला जातो.

6) मध ही एक गोष्ट आहे जी तेलकट त्वचा तसेच कोरड्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. हे त्वचेमध्ये ओलावा निर्माण करून आणि छिद्रांना कडक करण्याचे कार्य करते. त्याचा नियमित वापर त्वचेचा रंग साफ करतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *