लोकप्रिय आणि सेलेब्रिटी व्यक्तींनाच ‘कर्करोग’ कसा काय होतो? जाणून घ्या

सामान्य लोकांपेक्षा सेलेब्रिटी आणि चित्रपटांमधील कलाकार यांना कर्करोग होण्याचे प्रमाण नक्कीच खूप अधिक आहे. अगदी मुमताजपासून इरफान खान, ऋषी कपूर यांची प्रकरणे नीट पहिली तर ‘सेलेब्रिटी कॅन्सर’ची काही प्रमुख कारणे दिसून येतात:
१) दुबळी रोगप्रतिकारशक्ती (इम्युनोसप्रेशन)
कलाकारांच्या विशेषतः सिनेकलाकारांच्या कामाच्या वेळा खूपच अनिश्चित असतात. यामुळे त्यांच्या शरीराचे अन्नग्रहणाचे आणि झोपेचे चक्र नेहमीच बदलते असते. यामुळे त्यांच्या शरीराची प्रचंड हानी होते. विशेषतः त्यांची प्रतिकारशक्ती फारच दुबळी होते आणि ते कर्करोगाचे सोपे लक्ष्य ठरतात.
२)सप्लिमेंट्स, उत्तेजक आणि बदलते डाएट प्लॅन्स
शो बिझनेस हा सारा प्रेझेंटेशनचा खेळ आहे. २४×७ प्रेसेंटेबल दिसणे अत्यंत महत्वाचे आहे. त्याकरिता मग व्यायाम करणं आणि व्यायामाचे परिणाम लवकरात लवकर दिसावेत म्हणून सपप्लिमेंट्स आणि उत्तेजक यांचं सेवन हे क्रमाने आलंच.
या उत्तेजक व सप्लिमेंट्समध्ये कर्करोगजन्य (कारसेनोजेनिक)घटक असतात. याचबरोबर वेगाने शरीर कमवण्यासाठी हे सेलिब्रेटी डाएट प्लॅन बदलत असतात ज्याचे पर्यावसान शेवटी दुबळ्या प्रतिकारशक्ती मध्ये होते. काही सेलिब्रेटी इतकेही कष्ट घेत नाही ते सरळ शस्त्रक्रियेचा मार्ग अवलंबतात. या शस्त्रक्रियाही कमी जास्त प्रमाणात कर्करोगाचे कारण ठरतात.
३) व्यसनं
अनेक सेलिब्रेटी हे मोठ्या प्रमाणावर धूम्रपान, मद्यपान यांच्या व्यसनी गेलेले दिसून येतात. मधल्या काळात एक सेलिब्रेटी रेव्ह पार्टी समाजमाध्यमांवर बरीच गाजली होती. जगातील एकूण कर्करुग्णांपैकी २० टक्के हे मद्यपी किंवा धुम्रपान करणारे असतात. त्यामुळे व्यसनं हे सेलिब्रिटी कर्करोगाचे एक मोठे कारण आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
४)सौंदर्यप्रसाधने, सुवासिक अत्तरे यांचा अतिवापर
अनेक कलाकार हे चित्रपटांत किंवा काही वेळा ब्रँड एन्डोर्समेंट म्हणून अनेक सौंदर्यप्रसाधनांचा मोठ्या प्रमाणात खूप जास्त काळासाठी वापर करत असतात.
या प्रसाधनातील बरेच घटक जास्त काळाकरिता शरीराच्या संपर्कात आल्यास कर्करोगाचे कारण ठरतात हे अनेक सर्वेक्षणात सिद्ध झालेले आहे त्याबाबतचे काही लेख इथे खाली जोडले आहेत.
५) वादातीत मुद्दा
बॉलीवूडमधील ‘फ्रेंड्स विद बेनेफिट्स’ किंवा ‘कास्टिंग कॉउच’ हे मुद्दे वादातीत असले तरी किमान ३० टक्के प्रकरणे तरी खरी असावीत.
अशाप्रकारे अनेक व्यक्तींसोबत अनेक वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यास प्रोस्थेट कॅन्सर अथवा HPV होण्याची दाट शक्यता असते तसेच महिलांमध्ये कर्वीक कॅन्सर ची शक्यता वाढते. त्यामुळे अशा नात्यांमुळे(?!) कर्करोग होऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही.