चार पाय अन हातासह जन्माला आलेल्या चिमुकलीला सोनू सूदमुळे मिळालं नवं आयुष्य! अशाप्रकारे केली मोठी मदत…

चार पाय अन हातासह जन्माला आलेल्या चिमुकलीला सोनू सूदमुळे मिळालं नवं आयुष्य! अशाप्रकारे केली मोठी मदत…

कोणताही कलाकार किती मोठा आहे हे त्याच्या चाहत्यांच्या संख्येवरून ठरवलं जात. आपल्या आवडत्या कलाकारांसाठी हे चाहते काहीही करायला तैयार होतात. विशेष म्हणजे बॉलीवूड कलाकारांचा तर खूप मोठा चाहतावर्ग देशात आणि देशाच्या बाहेर देखील आहे.

या चाहत्यांच्या प्रेमामुळेच त्यांना जास्तीत जास्त काम मिळते आणि त्यांची करोडोंची कमाई होते, हे सत्य कोणीच नाकारू शकत नाही. त्यामुळे, या कलाकारांकडून चाहत्यांच्या काही अपेक्षा असणे सहाजिकच आहे. मात्र, जेव्हा चाहत्यांना किंवा समाजाला गरज असते तेव्हा किती कलाकार म्हणजेच सेलेब्रिटी पुढे येऊन मदत करतात?

बॉलीवूडमध्ये असे खूप कमी सेलेब्रिटी आहेत, जे केवळ प्रसिद्धी म्हणून नाही तर खऱ्या अर्थाने लोकांची मदत करायची म्हणून समाजकारण करतात. सलमान खान, अजय देवगण, आमिर खान, सोनू सूद सारख्या सेलिब्रिटींनी अनेकांना मदत केली. वेगवेगळ्या प्रकारे हे सेलेब्रिटी समाजकारण करत आहेत. खास करुन अभिनेता सोनू सूद.

 

आजवर सोनू सदने अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाचे पात्र रेखाटले आहे. मात्र कोरोना काळात स्थलांतरित कामगारांसाठी निःस्वार्थ भावनेनं त्यानं जे काही कार्य केलं त्यामुळे तो खऱ्या अर्थाने ‘हिरो’ सिद्ध झाला. कोणत्याही राजकीय पक्षाच्या मदतीशिवाय आणि इतर कोणत्याही मोठ्या आर्थिक पाठबळाशिवाय सोनू हे काम केले.

त्यामुळेच सगळीकडे त्याचं तोंडभरून करण्यात आलं. आता याच सोनू सूदने पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांची मन जिंकली आहेत. त्यानं एक चिमुरडीला नवीन जीवन दिल आहे. आता तुम्ही म्हणाल, जन्म-मृत्यू तर देवाच्या हातात आहे मग सोनू सूदने असं काय केलं?

तर बिहार येथील चौमुखी कुमारी या छोट्या मुलीची त्यानं खूप मोठी मदत केली आहे. ही चिमुकली चार हात आणि चार पाय घेऊन जन्माला आली आणि त्यामुळेच तिचं चौमुखी असं नाव ठेवण्यात आलं. या मुलीला शस्त्रक्रिया करुन, सर्वसामान्यांसारखं जगता येणार होत. मात्र त्यासाठी खूप मोठा खर्च लागणार होता.

सोनू सूदने तिच्या शस्त्रक्रियेचा आणि उपचाराचा सर्व खर्च उचलला आणि शस्त्रक्रिया करण्यापूर्वीचा आणि नंतरचा फोटो शेअर करत सोशल मीडियावरून त्याबद्दल माहिती दिली. फोटो शेअर करत सोनू सूद म्हणाला, ‘माझा आणि चौमुखी कुमारीचा हा कठीण प्रवास यशस्वी ठरला.

बिहारमधील एका छोट्याशा गावात चौमुखीचा जन्म झाला, तेव्हा तिला चार पाय आणि चार हात होते. आता यशस्वी शस्त्रक्रियेनंतर ती तिच्या घरी सुखरुप परतण्यासाठी सज्ज झाली आहे.’ चौमुखीला शस्त्रक्रियेसाठी सोनूने सूरतला पाठवलं होतं. बुधवारी जवळपास सात तास तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

इशा गुप्ता, सुनील शेट्टी, पूजा बत्रा, रिधिमा पंडित, यांसारख्या कलाकारांनी सोनू सूदच्या या पोस्टवर कमेंट करत त्याची प्रशंसा केली आहे. ‘या पृथ्वीवरील सर्वोत्कृष्ट माणूस’, असं म्हणत एका चाहत्यानं सोनूच्या या कामाचं कौतुक केलं आहे. तर ‘गरीबांचा मसिहा’ असं दुसऱ्याने म्हटलं आहे. ‘तुमच्यासारखे खूप कमी लोकं असतात सर, देव कायम तुम्हाला खूश ठेवो’, असं देखील अनेकांनी लिहलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *