बोंबला ! एकाच वेळी 4 मुलींना करत होता डेट ! जेव्हा एकसोबत चौघी समोर आल्या तेव्हा अशी झाली तरुणाची फजिती!

बोंबला ! एकाच वेळी 4 मुलींना करत होता डेट ! जेव्हा एकसोबत चौघी समोर आल्या तेव्हा अशी झाली तरुणाची फजिती!

टिंडर, हपन,क्युपिड, टॅन-टॅन असे एक ना अनेक ऑनलाईन डेटिंग ऍप आज इंटरनेटवर, थोडक्यात प्रत्येकाच्या फोनवर उप्लब्ध आहेत. या ऍपच्या माध्यमातून अनेकजण नवीन लोकांना मिळतात, त्यांना डेट करतात. कधी-कधी या ऍपच्या माध्यमातून एका चांगल्या मैत्रीची किंवा चांगल्या नात्याची सुरुवात होते.

पण अनेकवेळा या ऍपवर फसवेगिरीच सुरु असते. अनेकांनी या ऍप मुळे फसवेगिरी आणि धोकेबाजीचा सामना केला आहे. केवळ मुलींचीच नाही तर मुलाची देखील या ऍपच्या माध्यमातून अनेकवेळा फसवेगिरी झाली आहे. असे अनेक प्रकरण रोज इंटरनेटवर बघायला मिळतात. यातील काही प्रकरण अतिशय गंभीर असतात तर, काही केवळ इतरांचे मनोरंजन करतात.

पण कधी विचार केला आहे का, की ऑनलाईन डेट करत असताना जेव्हा, तरुण-तरुणी पुढची एक पायरी गाठून, एकमेकांना भेटतात आणि आपल्या नात्याचा स्वीकार करतात, त्यानंतर काय होते? अनेकवेळा अशी नाती, काही काळ टिकतात. तर काही वेळेस अशी नाती, अतूट बंधनात देखील अडकले जातात. मात्र आपण डेट करत असताना, थोडे तरी जागरूक राहिलेच पाहिजे.

जर अशा वेळी तुम्ही जागरुक नसाल तर, तुमची चांगलीच फजिती होऊ शकते. आणि प्रकरण गंभीर देखील होऊ शकते. असच काही पश्चिम बंगालमधील कूचबिहार येथे घडले. एक तरुण, एकाच वेळी, एक नाही,दोन नाही तर चार मुलींना डेट करत होता. या चारही मुलींसोबत तो नात्यामध्ये होता. चार पैकी दोन मुलींना तो अशाच डेटिंग ऍपच्या माध्यमातून भेटला होता.

तर त्यापैकी एकीला तो आधीपासून ओळखत होता. एकाच वेळी हा तरुण,या चार मुलींसोबत नात्यामध्ये होता. चौघींना देखील त्याने, लग्नाचे वचन दिले होते. पुढे पूर्ण आयुष्य तुझ्यासोबतच घालवणार, असं या चौघींना देखील हा तरुण म्हणाला होता. मात्र माघील काही दिवसांपासून, त्याच्या या चार मैत्रिणींपैकी दोघीना त्याच्यावर संशय येत होता.

त्यामुळे त्यांनी त्याच्या सोशल मीडियावरच्या सर्व पोस्ट, स्टोरीवर नजर ठेवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना सगळं काही साधारण आहे आणि उगाच आपण संशय करत आहे, असं वाटू लागलं. मात्र अचानक त्याच्या पोस्टवरील कमेंट्स आणि इतर मुलीची प्रतिक्रिया बघून त्यांना संशय आला. त्यानंतर त्या दोघीनी एकमेकींना संपर्क केला.

तेव्हा त्यांना आपल्या बॉयफ्रेंडच्या वागण्यावरून मोठा धक्का बसला. मग त्यांनी, तरुणाच्या आयुष्यातील इतर दोन मुलींचा देखील पत्ता शोधून काढला. चौघीजणी प्रथम एकमेकींना भेटल्या. आपल्याला असा धोका देणारा, शांत कसा बसू शकतो म्हणून त्यांनी थेट तरुणाच्या घरी धाड मारली. तरुणाला या सर्व प्रकारचा काहीच सुगावा नव्हता.

अचानक चौघीना सोबत बघून त्याला काय करावे हेच सुचत नव्हते. तो इकडे तिकडे पळू लागला. आणि यातून सुटका म्हणून त्याने चक्क विष पिले.याबद्दल समजताच, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्या तरुणाची तबियत ठीक आहे. मात्र फसवेगिरी करणाऱ्या या तरुणाला जन्माची अद्दल घडली हे नक्की.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *