Big Boss Marathi Season 4 मध्ये पहिल्याच दिवशी पडली वादाची ठीणगी, अपूर्वा प्रसादला म्हणाली की तुझ्या सारख्या उद्धट…

Big Boss Marathi Season 4 मध्ये पहिल्याच दिवशी पडली वादाची ठीणगी, अपूर्वा प्रसादला म्हणाली की तुझ्या सारख्या उद्धट…

बिग बॉस मराठीचा चौथा सीझन अखेर सुरू झाला आहे. बहुप्रतिक्षित शोचा पहिला भाग 16 स्पर्धकांसाठी रोलर कोस्टर राईड ठरला. बिग बॉसने 16 स्पर्धकांचे स्वागत करून शोची सुरुवात केली. बिग बॉसने 16 स्पर्धकांचे चार गट तयार केले आणि त्यांना प्रत्येक गटातून एक ‘निरुपयोगी’ स्पर्धक निवडण्यास सांगितले.

पहिल्या गटात अपूर्वा नेमळेकर, प्रसाद जावडे, योगेश जाधव आणि समृद्धी जाधव, दुसऱ्या गटात किरण माने, त्रिशूल मराठे, अक्षय केळकर आणि अमृता देशमुख आणि तिसऱ्या गटात अमृता धोंगडे, यशश्री मसुरकर, रोहित शिंदे आदी स्पर्धक होते. चौथ्या गटात तेजस्विनी लोणारी आणि शेवटच्या गटात रुचिरा जाधव, विकास सावंत, निखिल राजिरके आणि मेघा घाटगडे इ.

अपूर्वा नेमळेकर या स्पर्धकांच्या पहिल्या गटाने प्रसाद जावडे यांना नामांकित केले आणि सांगितले की प्रसाद हा घरातील ‘निरुपयोगी’ स्पर्धक आहे आणि तो गर्विष्ठ स्पर्धक आहे असे मला वाटते. प्रसादने नंतर अपूर्वावर खोटे आरोप केले आणि तिला ‘अहंकारी’ म्हटले. नंतर अपूर्वाने सांगितले की हा तिचा निर्णय आहे आणि तिला तो बदलायचा नाही. यावर चर्चा करताना प्रसाद आणि अपूर्वाचा नंतर मोठा वाद झाला.

अपूर्वाने जेव्हा तिचे मत सांगायला सुरुवात केली तेव्हा तीच मत प्रसादला अजिबात पटलं नाही म्हणून त्यांच्यात मतभेद झाल्याचं दिसून आले. अपूर्वा पुढे म्हणली की, ‘हा काय कुस्तीचा खेळ नाहीये आणि तुला असं का वाटतं कि तू योगेश जाधव पेक्षा बेटर आहेस?’ त्यानंतर अपूर्वाला पुढे काहीच न बोलू देता प्रसादने त्याचे मत मांडायला सुरुवात केली.

प्रसादाचे हे असलं वागणं बघून अपूर्वा खूपच चिडते आणि म्हणते की “तू बोलू देणार आहेस की नाही की का मला की तू स्वतःच बोलणार आहेस ?” त्यानंतर दोघांमधील वाद अधिकच चिघळत गेला. प्रसाद म्हणाला, तू बोलीस त्यावर मी माझं उत्तर दिलं आहे. त्यानंतर शब्दाने शब्द वाढतं गेले आणि अपूर्वा म्हणाली “तू बोलण्याचा मी आदर करते. पण मला तुझ्या सारख्या उद्धट माणसासोबत खेळण्यापेक्षा त्या स्ट्रॉंग स्पर्धकासोबत खेळायला जास्त आवडेल.”

अपूर्वाचे हे बोलणं प्रसादला चांगलंच खटकलं. त्यानंतर प्रसादने अपूर्वाकडे बोट दाखवत म्हणाला की मला उद्धट वैगरे अजिबात बोलू नकॊस. त्यावर उत्तर देत अपूर्वा म्हणाली, “बोटं खाली करून बोल माझ्याशी. मला बिग बॉस यांनी माझं मत विचारलं मी तुझ्याविरोधात मत दिले.” त्यात चुकलं काय.

बिग बॉस मराठी च्या चौथ्या सीजन मध्ये आताशी कुठे पाहिला दिवस आणि त्यातच सदस्यांनी आपल्याविरोधात मत दिले हे त्यांना अजिबात सहन होत नाहीये. पुढे टास्क सुरु झाल्यावर काय परिस्थिती होणार आहे? किती वाद – विवाद होतील हे तर सर्वांना पाहायलाच मिळणार आहे.

Yesmarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *