Big Boss Marathi मधील प्रेक्षकांची लाडकी ‘ही’ स्पर्धक आहे नॅशनल लेव्हलची नेमबाज..मिळवलेत अनेक पदक..

Big Boss Marathi मधील प्रेक्षकांची लाडकी ‘ही’ स्पर्धक आहे नॅशनल लेव्हलची नेमबाज..मिळवलेत अनेक पदक..

बिग बॉस मराठी सुरु होऊन आता जवळपास एक महिना झाला आहे. अनेक स्पर्धकांचे खेळ आता बऱ्यापैकी सर्वाना समजू लागले आहेत. सुरुवातीला स्पर्धकांनी आपलाच डंका घरामध्ये वाजवला होता आता ते बॅकफूटवर खेळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

येणाऱ्या प्रत्येक नवीन दिवशी खेळ वेगळेच वळण घेत आहे, आणि त्यामुळे घराबाहेर देखील स्पर्धकांची लोकप्रियता वाढत किंवा कमी होत आहे. मात्र, बिग बॉसच्या घरात असणाऱ्या अनेक स्पर्धकांची लोकप्रियता पहिल्या दिवसपासूनच चांगली असल्याचे बघायला मिळत आहे. त्यामध्ये काहींची लोकप्रियता तर आता शिगेला पोहोचली आहे.

यामध्ये कोल्हापूरच्या सोनाली पाटीलच नाव सर्वात पहिले घ्यावे लागेल. सोनाली पाटीलने बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी अनेक, मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. वैजू नं १ या मालिकेमधून सोनालीने अभिनय क्षेत्रामध्ये प्रवेश केला. त्यानंतर तिची लोकप्रियता वाढतच गेली. सोनाली जेव्हा वैजूचे ऑडिशन द्यायला गेली होती, तेव्हा ऑडिशन नक्की काय असत हे देखील तिला माहित नव्हतं, असं बिग बॉसच्या घरातच गप्पा रंगल्या होत्या तेव्हा तिने सांगितले.

सुरुवातीपासून, टीव्हीवर यायचं असं, कोल्हापूरच्या सोनालीचे स्वप्न होते. असं देखील तिने सांगितले. आणि आपले हे स्वप्न तिने पूर्ण देखील केले. देवमाणूस मालिकेमध्ये सोनालीने, वकिलीणबाईची भूमिका साकारली होती. त्या भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. आणि त्यानंतर तिने थेट, बिग बॉसच्या घरात धडाकेबाज एंट्री घेतली.

पहिल्याच दिवसापासून, सोनालीच्या अस्सल कोल्हापूर्वी हटके अंदाजावर, प्रेक्षक घायाळ झाले आहेत. मात्र, खुप कमी लोकांना माहित आहे की, ही अभिनेत्री एक प्रशिक्षित पि’स्तूल ने’मबा’ज आहे. मनोरंजन क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी सोनालीने अमृतसर येथील अखिल भारतीय १० मीटर एअर पि’स्तूल स्पर्धेत भाग घेतला होता आणि तिने ती ही स्पर्धा जिंकलीसुद्धा.

त्यामध्ये तिने पदकदेखील मिळवले. बिग बॉस मराठीमधेच एका एपिसोडमध्ये, ती विशाल निकम आणि विकास पाटील यांच्याशी बोलत होती तेव्हा, तिने पिस्तूल नेमबाजी स्पर्धेबद्दल बोलत होती. सोनालीने सांगितले की, ‘तो क्षण आमच्या सर्वांसाठी खूप खास होता. मी जिंकेल कि नाही हे मला माहित नव्हतं, पण जिंकायचंच असा निर्धार मनाशी केलेला होता.

मी स्पर्धेसाठी उभी राहिले, त्यावेळी तो अनुभव खूप वेगळा होता. तिथे उत्साही वातवरण होते. आणि मी जिंकले, तो क्षणच अभूतपूर्व होता. जेव्हा मी पदक जिंकले तेव्हा, पप्पांना खूप अभिमान वाटला होता. आपल्या मुलीने केलेल्या कामगिरीचं त्यांना खूप कौतुक वाटलं. पण एका गोष्टीच सतत वाईट वाटतं वाहत, माझं टिव्हीवरच काम बघायलाच ते राहिले नाही.

आज मला आणि माझं काम पाहण्यासाठी बाबा येथे असायला हवे होते. त्यांना आपल्या पोरीचं खूप कौतुक वाटलं असत. ते एकदम तंदुरुस्त होते, त्यांना कोणताही आ’जार नसताना, ते अचानक आम्हाला सोडून गेले.’ हे सर्व सांगत असताना, सोनालीला भरून आलं होत. आपल्या वडिलांच्या आठवणीने, तिने हळहळ व्यक्त केली.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *