भिजवलेले फक्त एक मूठ शेंगदाणे खाल्याने होतात ‘हे’ चमत्कारिक फायदे

बऱ्याच वेळा जेव्हा आपल्या भूक लागते तेव्हा आपण बाहेरचं काही तरी अनहेल्दी खातो. तुमच्या या भुकेला पर्याय म्हणजे शेंगदाणे. शेंगदाणे हे जास्त महाग नसतात. आणि सहज उपलब्ध होतात, म्हणून शेंगदाणे हे गरीबांचे बदाम असतात. बदामात मिळणारी सर्व पोषण द्रव्य शेंगदाण्यात आहेत. तुम्हाला एखाद्या भेळवाल्याकडे दखील शेंगदाणे सहज मिळतील. याचे फायदे वाचून तुम्ही भूक लागली की शेंगदाण्यालाच प्राधान्य द्याल.
शेंगदाणे हा एक उत्तम प्रोटीन आणि खनिजयुक्त पदार्थ आहे. एक लीटर दुधातून जेवढे प्रोटीन भेटतात तेवढे प्रोटीन १०० ग्रॅम शेंगदाणे खाल्ल्यानं मिळतात. मुठभर शेंगदाण्यामध्ये ४२६ कॅलरीज, ५ ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि १७ ग्रॅम प्रोटीन असतात. शेंगदाण्यापासून व्हिटॅमिन इ, के आणि बी ६ भरपूर प्रमाणात मिळते.
थंडीच्या मोसमात भुइमुगाच्या शेंगांच्या गाड्या रस्त्यांच्या दुतर्फा लागलेल्या आपण बघतो. कारण गुलाबी थंडीमध्ये भाजेलेल्या शेंगा खाण्याची मजा काही न्यारीच ! हे चविष्ट शेंगदाणे आपल्या आरोग्यासाठी खूप हितकारी असतात. शेंगदाणे मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत करतात.
त्याचबरोबर शेंगदाणे आरोग्याच्या दृष्टकोणातून खूप फायदेशीर आहेत. शेंगदाण्यामध्ये पोटॅशियम, कॉपर, सेलेनियम, कॅल्शियम, लोह इत्यादी पोषक तत्व असतात. पण हेच शेंगदाणे जेव्हा आपण भिजवून खातो तेव्हा याची पौष्टिकता अजून वाढते.
थंडीचा मोसम सुरु झाला की भाजेलेल्या भुइमुगाच्या शेंगांच्या गाड्या रस्त्यांच्या दुतर्फा दिसू लागतात. गुलाबी थंडीमध्ये भाजेलेल्या शेंगा खाण्याची मजा काही न्यारीच ! चविष्ट आणि आरोग्यास हितकारी असे हे शेंगदाणे मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यास सहायक आहेतच, शिवाय हृदयाच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील अतिशय फायदेशीर आहेत. पोटॅशियम, कॉपर, सेलेनियम, कॅल्शियम, लोह इत्यादी पोषक तत्वांनी युक्त असलेले शेंगदाणे भिजवून खाल्ल्यास त्याची पौष्टिकता अजून वाढते.
बऱ्याच लोकांना वेळी-अवेळी अन्नपचनाचा त्रास होत असतो, पोट जड होते. आणि यामुळे काहीच खाण्याची इच्छा होत नाही म्हणून हा त्रास ज्या व्यक्तीना होत असेल त्यांनी रोज रात्री एक मूठ शेंगदाणे भिजत घालावे आणि सकाळी उठल्यानंतर हे शेंगदाणे खावेत. यामुळे तुमची पचन संबंधीची तक्रारी दूर होतील शिवाय तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होणार नाही.
स्नायूंना चांगले टोनिंग आणण्याचे काम शेंगदाणे करते. भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने आपल्या मागून ना चांगल्याप्रकारे ट्रेनिंग कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असल्यामुळे स्नायूंना मजबुती येण्याचे काम भिजवलेले शेंगदाणे करतात. व्यायाम करून ढिले पडलेली स्नायू असेल त्यांनी नियमित भिजलेल्या शेंगदाण्याचे सेवन केल्याने त्यांच्या स्नायूंना व्यवस्थित प्रकारे टोनिंग होते.
सांधेदुखीच्या त्रासासाठी उपयुक्त
बऱ्याच महिलांना कंबरदुखीचा त्रास असतो अशा महिलांनी भिजवलेले शेंगदाण्याचे सेवन अवश्य करावे आणि याबरोबर जोडीला गुळाचे सेवन करावे. त्यामुळे तुमच्या शरीराला लोह आणि कॅल्शियम मिळते आणि सांधे दुखी व कंबर दुखीचा त्रास असेल तर त्या त्रासापासून जवळपास सुटका मिळते. त्याचबरोबर ज्यां पुरुषांना सांधेदुखी किंवा कंबरदुखीचा त्रास असेल त्यांनी देखील रात्रभर भिजत घातलेल्या शेंगदाणे सकाळी उठून खावे.
नियमित शेंगदाणे खाण्याचे फायदे
1. शेंगदाण्यामध्ये नैसर्गिकरित्या तेल असते. त्यामुळे शेंगदाण्याच्या सेवनानं पोटाचे आजार नष्ट होतात. गॅस आणि अॅसिडिटीपासून आराम मिळतो.
2. शेंगदाण्यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचे प्रमाण असते. त्यामुळे आपली हाडे मजबूत होतात. हाडांच्या आजारावर हा उत्कृष्ट उपचार आहे. त्याचबरोबर शेंगदाण्यामध्ये पॉलीफोनोलिक अँटीऑक्सीडचे प्रमाण अधिक असते. त्यामध्ये पोटाचा कर्करोग कमी करण्याची क्षमता असते.
3. शेंगदाणे खोकल्यामध्ये उपयुक्त औषधीचे काम करतात. याच्या सेवनानं पचनशक्ती वाढते आणि भूक न लागण्याची समस्या दूर होते. शेंगदाणे गर्भवती स्त्रियांसाठी खूप चांगले मानले जातात. गर्भावस्थेत बाळाच्या विकासासाठी फायदेशीर ठरतात.
4. शेंगदाण्यात ओमेगा ६ फॅटसुद्धा भरपूर प्रमाणात आढळतात. चांगल्या त्वचेसाठी ते फायदेशीर आहेत. शेंगदाणे त्वचेसाठी उत्तम मानले जातात. शेंगदाणे खाल्ल्यानं तब्बेत चांगली राहते आणि शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही.
5. आठवड्यातून ४-५ दिवस शेंगदाणे खाल्ल्यास हृदयाशी निगडीत आजारांचा धोका कमी होतो. शेंगदाणे खाल्ल्यानं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉलची मात्रा ७.४ टक्क्यांनी घटते.
6. शेंगदाण्यात प्रोटीन, फायबर, खनिज, व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात आढळून येते. यामुळे त्वचा नेहमी तरूण राहते. नियमित शेंगदाणे खाल्ल्यास महिला आणि पुरुषांमधील हार्मोन्सचे संतुलन कायम राहते.
7. भिजविलेल्या शेंगदाण्यामध्ये अँटी ऑक्सिडंट्स, लोह, फोलेट, कॅल्शियम, आणि झिंक ही पौष्टिक तत्वे मोठ्या प्रमाणावर असतात. या तत्वांमुळे शरीरामध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या हानिकारक पेशी तयार होण्यास आळा बसतो. तसेच भिजविलेल्या शेंगदाण्यांच्या नियमित सेवनाने शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहते.
त्यामुळे हृदयाचे आरोग्य देखील चांगले राहण्यास मदत होते. तसेच ज्यांना वारंवार घसा खराब होऊन खोकल्याचा त्रास होत असेल, त्यांनाही भिजविलेल्या शेंगदाण्याच्या सेवनाने आराम मिळतो.
8. शेगदाणे भिजवून खाण्यामुळे यामध्ये असलेले न्यूट्रिएंटस आणि आयरन ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित ठेवून हार्ट सोबत अनेक आजारात बचाव करते.