भात खाल्ल्याने खरच वजन वाढतं की कमी होतं? वाचा हा अप्रतिम लेख

भात खाल्ल्याने खरच वजन वाढतं की कमी होतं? वाचा हा अप्रतिम लेख

भात खाण्यामुळे वजन वाढतं, असा सर्वसाधारण समज आहे. त्यामुळे भात खावा की, न खावा हा प्रश्‍न पडतो. त्यामुळे अनेक जण जेवणात खूप कमी भात खातात. भात हे बुद्धिमान लोकांचं खाणं. भातामुळे वजन वाढूही शकतं आणि वजन कमी होऊ शकतं. फक्त आपण कशा पद्धतीने भात करतो त्यावर खूप काही अवलंबून असतं.

काहीजण भात बनवताना फ्राय करताना जास्त तेल किंवा तूप टाकतात. यामुळे तांदळातील कॅलरीचे प्रमाण वाढून भातामुळे वजन वाढू शकते किंवा लठ्ठपणा येऊ शकतो. शरीराला योग्य प्रमाणात न्यूट्रियंटस्‌ मिळावेत, यासाठी भात योग्य प्रकारे करणे आवश्‍यक आहे. योग्य काळजी घेतल्यास भातामुळे वजन वाढू शकणार नाही, उलट कमी होऊ शकते. भात आवडत्या भाज्यांसोबत बनवावा.

भाज्यांमध्ये जास्त फायबर्स असल्याने जास्त वेळ पोट भरलेले राहते. तांदळासोबत इतर डाळी मिक्‍स करून खिचडी बनवावी. त्यामध्ये कॅलरी कमी प्रमाणात असतात. पूर्वी विनापॉलिशचा किंवा पॉलिश केलेला तांदूळ मिळायचा. हातसडीचा तांदूळ असे म्हणतात. जो थोडा खाल्ला तरी पोट भरल्यासारखे वाटायचे. तांदळावर जितक्‍या जास्त प्रक्रिया केल्या जातात तितके त्यातील नैसर्गिक गुणधर्म कमी होत जातात.

प्रथिनं, फॅटी ऍसिड, जीवनसत्व यांचे प्रमाण कमी कमी होत जातं. जे लोक भरपूर शरीरिक श्रम करतात, जिम किंवा इतर काही व्यायाम करतात त्यांनी भात खायला हरकत नाही. भरपूर प्रमाणात फक्त भात खाल्ल्यानं रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं आणि वजन वाढायला सुरुवात होते.

जेवणानंतर शतपावली केली पाहिजे. शक्‍यतो पांढऱ्या तांदळाच्याऐवजी हातसडीचा म्हणजेच कमी पॉलिशचा ब्राऊन राईस वापरावा. त्यात जीवनसत्त्वं टिकून असतात. भात खाताना प्रमाण मोजकं असावं. भाताबरोबर अदलून-बदलून वेगवेगळ्या डाळी खाव्यात.

मूग, तूर, मसूर, चवळी, राजमा, मिश्र डाळीचं वरण खावे. भात खाताना भाज्याचं सलाड किंवा कोशिंबीर खावी. भात खूप आवडत असेल आणि बंद करा

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *