अखेर लक्ष्मीकांत बेर्डे यांचं अपूर्ण स्वप्न होणार पूर्ण; बेर्डे कुटुंबाने घेतला मोठा निर्णय…

अखेर लक्ष्मीकांत बेर्डे यांचं अपूर्ण स्वप्न होणार पूर्ण; बेर्डे कुटुंबाने घेतला मोठा निर्णय…

‘लक्ष्या’ हे नाव घेतात अनेक अजरामर असे पात्र आपल्या समोर उभे राहतात. मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार, ‘लक्ष्मीकांत बेर्डे’ यांनी एका दशकाहून अधिक काळ आपल्या खास अशा विनोदीशैली आणि हटके अभिनयाने गाजविले.

आजही त्यांचे अनेक सिनेमा प्रेक्षक अतिशय आवडीने बघतात. झपाटलेला, अशी ही बनवाबनवी, धडाकेबाज, धूम धडाका, अफलातून यासारख्या सिनेमांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या कॉमेडीचा तडका लगावला होता. त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. आपल्या खास अभिनय शैलीने, विनोदी अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे सर्वांना अगदी जवळचा वाटू लागला.

आणि त्यामुळेच लक्ष्मीकांतचे कधी ‘लक्ष्या’ बनला हे कदाचित त्यालाही समजले नाही. मात्र 16 डिसेंबर 2004 साली लक्ष्मीकांत बेर्डे यांचे अकाली निधन झाले व त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. मराठी चित्रपट, त्यातील कलाकार तंत्रज्ञ यांना नेहमीच सढळ हाताने मदत करण्याचे काम लक्ष्मीकांत बेर्डे यांनी केले होते.

त्यांचे हे काम अविरतपणे सुरू राहावे यासाठी बेर्डे कुटुंबीयांनी त्यांच्या सतराव्या स्मृतिदिनी एक मोठा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दलची एक मोठी घोषणा बेर्डे कुटुंबाने केली आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया बेर्डे आणि त्यांची मुले अभिनय आणि स्वानंदी बेर्डे यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह सोबत ‘लक्ष कला मंच’ची स्थापना केली आहे.

याबद्दल ची एक पोस्ट प्रिया बेर्डे यांनी शेअर केली आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी लिहिले आहे की. ’16 डिसेंबर 2019 रोजी लक्ष्मीकांतच्या, 17 व्या पुण्यतिथीनिमित्त ‘लक्ष कला मंच’ची स्थापना झाली आहे. मागील 17 वर्षांपासून आम्ही ही संस्था उभारण्याचा व लक्ष्मीकांतची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचा अतोनात प्रयत्न करत होतो.

मात्र अनेक अडचणी आणि मनुष्यबळाचा अभाव इत्यादी सर्व गोष्टींना तोंड देत अखेर आम्हाला यात यश मिळाले.’ यातच पुढे त्यांनी म्हटले आहे की, ‘महाराष्ट्रातल्या अनेक शहरात, खेड्यापाड्यात, गावात अनेक प्रतिभाशाली आणि होतकरू कलाकार आहेत. या कलाकारांना योग्य मार्ग व व्यासपीठ मिळत नाही. शिक्षण मिळत नाही. अशा कलाकारांसाठी एखादी अकॅडमी म्हणजेच संस्था उभा करावी, असे लक्ष्मीकांतचे स्वप्न होते.

त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही ‘लक्ष कला मंच’ची स्थापना केली आहे. या सर्व सोबतच लक्ष कला मंच जो कोणी कलाकारांवर अन्याय करेल, मग ती पै’शांची फ’सवणू’क किंवा महिला कलाकार व कर्मचाऱ्यांशी गैरवर्तणूक असेल त्यांना कायद्याच्या चौकटीत राहून आळा घालेल. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कलाकारांच्या पाठीशी हा मंच अगदी ठामपणे उभा राहील.

हा मंच स्थापन करण्यात ज्यांचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा वाटा आहे, ते आहेत माझे सहकारी व बिझनेस पार्टनर श्रीमंत एन्टरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड धनंजय माने इथेच राहतातचे निर्माते, पोलीस बॉईज ऑर्गनायझेशनचे महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष, ग्राहक सेवा संस्थेचे कार्याध्यक्ष, हॉटेल मराठमोळा झटका व हॉटेल चाखलेचे मालक, अमर गवळी, सौ सायली अमर गवळी, शैलेंद्र परदेशी, माझे संपर्कप्रमुख आणि सल्लागार धनंजय वाठारकर, संतोष जी साखरे हे होत.

महाराष्ट्रातल्या तमाम कलाकारांना आमचे आवाहन आहे की, त्यांनी लक्ष कलामंच मध्ये सामील व्हावे. ‘कलेवरच्या प्रेमासाठी व कलाकारांच्या हक्कासाठी’, आपण एकत्र यावे. लवकरच एक वेबसाईट हेल्पलाइन नंबर आम्ही देखील उपलब्ध करणार आहोत.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.