अंड्यातला हा भाग खाणं पुरुषांसाठी आहे खूप फायद्याचं; जाणून घ्या!

संडे असो वा मंडे, रोज खावो अंडे!, अशी जाहिरात केली जात आहे. मात्र आपण किती अंडी खातो याचा विचार केला पाहिजे. अंडे शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक आहे. काहीजण अंडी खाताना त्यातील पिवळा भाग खात नाही तो फेकून देतात. परंतू त्या पिवळ्या भागातच खूप काही उपयुक्त घटक असतात.
व्यायामानंतर उकडलेली अंडी खाताना पिवळा भाग बाजूला काढूनच अंडी खाण्याचा सल्ला देतात. त्यामागे वजन आणि चरबी वाढेल अशी कारण सांगितली जातात. उलट त्या पिवळ्या भागामध्ये बरेच काही साामावलेलं असतं. पिवळ्या भागामध्ये पांढऱ्या भागापेक्षा अधिक प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन असतात. अंड्याचा पिवळा भाग खाण्याचे अनेक फायदे आहेत ते आपण पाहणार आहोत.
अंड्यातील पिवळ्या भागामध्ये ओमेगा थ्री हे चरबीयुक्त आम्ल असते. त्याच्या सेवनाने माणसाची प्रजनन क्षमता वाढते, केस गळती थांबते. पिवळ्या भागामध्ये कॉपर हा घटक जास्त प्रमाणात असतो.
आहारात कॉपरचा समावेश केल्यास माणसाला अकाली टक्कल पडण्यापासून रक्षण होते आणि स्नायू बळकट होतात. अंड्याच्या पिवळ्या भागात अधिक प्रमाणात प्रोटिन्स असतात. त्यामुळे स्नायू बळकट होण्यासाठी मदत होते, आणि हाडे मजबूत होतात.
अंड्याच्या पिवळ्या भागात मुबलक प्रमाणात व्हिट्यामिन डी आढळत. त्याच्या सेवनाने हाडे चांगल्या प्रमाणात मजबूत होतात. बुद्धी तल्लख होण्यासाठी सुद्धा अंड्याचा चांगला फायदा होतो
अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये फॉस्परस हा घटकही मोठ्या प्रमाणात आढळतो. त्यामुळे आपले दात बळकट होतातच त्यासोबतच हिरड्यांच्या समस्या देखील दूर होतात. कर्करोग टाळण्यासाठी अंड्याची चांगलीच मदत होते. अंडी हा व्हिट्यामिन के चा चांगला स्रोत आहे. व्हिट्यामिन कर्करोगासाठी गुणकारी असते.
अंड्यामुळे हाडांची मजबुती, निरोगी डोळे, तजेलदार त्वचा, शरीराची वाढ, चेतापेशींना संरक्षण मिळण्यासोबतच सौंदर्य राखण्यासाठीही मदत होते. अंड्यामध्ये सल्फर हा उष्ण घटक असतो. त्यामुळे ज्यांना आम्लपित्ता त्रास आहे त्यांनी मात्र आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच अंड खावं.
अंड्यातील पिवळा भाग टाकून न देता त्यासोबतच अंडी खावी. जेणेकरून अंड्याच्या या लाभदायक गुणांचा तुम्हाला चांगला उपयोग होईल. ज्या लोकांना हृदय रोगाचा त्रास आहे त्यासोबत ज्यांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे अशा व्यक्तींनी एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे या व्यक्तींनी हा जो पिवळा भाग आहे कमी प्रमाणात खायचा आहे. म्हणजे चार अंडी असतील तर त्यातील एकाकाच पिवळा भाग तुम्हाला खायचा आहे.
दरम्यान, तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात किमात 180 अंडी खाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच महिन्यात 15 अंडी पोटात जाणे आवश्यक आहेत. मात्र वरती सांगितल्याप्रमाणे ज्यांना काही त्रास असेल त्यांनी पिवळा भाग खाणं टाळावं.