‘मुतखडा’ सारख्या भयंकर आजारावर वरदान आहे ‘तुळस’, जाणून घ्या त्याबद्दल

भारताच्या जवळजवळ सर्व कानाकोपऱ्यात तुळस आपल्याला दिसते. हिंदू संस्कृतीत तर तुळस या रोपाला पूजनीय रोप मानले जाते. तुळशीचे रोप दारात असेल हवा शुद्ध राहते व घरात रोगराई प्रवेश करू शकत नाही असे म्हंटले जाते.
तुळस या रोपाचे वनस्पतिक नाव ऑसिमम सँक्टम हे आहे. तुळशीचा आयुर्वेदिक उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आणि महत्वाचे म्हणजे मुतखड्या सारख्या भयंकर आजारावर तुळस ही फायदेशीर ठरते.
१) जर तुम्ही दररोज सकाळ, दुपार आणि संध्याकाळी तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने आपले शरीर एवढे म्हणजे एवढे शुद्ध होते की जेवढे चांद्रायण व्रत केल्यानंतरही होत नसेल एवढं शुध्द होत. तुळशीचा गंध जेवढा लांब पर्यंत जातो तेथील वातावरण व त्याठिकाणी राहणारे जीव पवित्र आणि निरोगी राहतात.
२) तुळशीच्या पानांचा उकळून काढा तयार करा. या काढ्यात मध टाका व नियमित ६ महिने याचे सेवन करा अश्याने मुतखडा हा लघवीद्वारे बाहेर पडतो. हा अचूक व एकदम सोपा उपाय आहे.
३) तुळशीचे पाने चहात टाकून हा चहा नियमित घेतल्याने किडनी स्टोनच्या आजारापासून आराम पडतो. तसेच तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने खडा लघवीवाटे बाहेर पडण्यास मदत होते.
४) पिण्याच्या पाण्यात तुळशीची पाने टाकून ते पाणी गाळून घेऊन जर ते पाणी पिले तर तुमचा मुतखडा लवकर बरा होईल.