जेवनानंतर आणि रोज सकाळी चिमुटभर बडीशेप खा होतील ‘हे’ आरोग्यवर्धक फायदे

जेवण केल्यानंतर खालेल्या अन्नाचे चांगल्या पद्धतीने पचन होण्यासाठी बडीशेप उपयुक्त असते इतकाच त्याचा उपयोग माहीत असतो. बडीशेपमध्ये व्हिटॅमीन सी,कॅल्शिअम, सोडीअम, फॉस्फरस, आर्यन आणि पोटॅशिअमसारखी शरीराला आवश्यक खनिज असतात. चला तर मग जाणून घेऊया बडीशेप खाण्याचे आरोग्यदायी फायदे.
जेवनानंतर चिमुटभर बडीशेप खाल्याने तोंडाचा दुर्गंध दूर होण्यास मदत मिळते. जेवनानंतर चिमुटभर बडीशेप खाल्याने सारखी लघवी लागत असेल तर तिच्यावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. याबरोबरच शरीरातील अनावश्यक विषारी द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते.
दररोज बडीशेप खाल्ल्याने दृष्टी चांगली होते. प्रत्येक दिवशी 5-6 ग्रॅम बडीशेप खाण्याने डोळे निरोगी राहतात. नियमीतपणे थोडीशी बडीशेप खाल्ल्याने चयापचय दर सुधारण्यास मदत होते आणि अपचन, बद्धकोष्ठता, पोटदुखी, अशा गोष्टी पासून आराम मिळण्यास मदत मिळते.
नियमीतपणे थोडीशी बडीशेप खाल्ल्याने शरीरात चयापचय दर वाढतो आणि चरबी कमी होते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. खोकला येत असल्यास मधात बडीशेप मिक्स करून दिवसातून दोन ते तीन वेळा चावून खाल्ल्यास खोकला कमी होईल.
मळमळ होत असेल नियमित जेवणानंतर बडीशेप खावी. त्यामुळे पचन होण्यात मदत होते आणि मळमळही थांबते. बडीशेप मध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतात, ज्यामुळे कफ सारख्या समस्यापासून मुक्त होण्यास मदत होते.