“भेटला विठ्ठल माझा”, म्हणत ‘आई कुठे काय करते’ फेम ‘अश्विनी महांगडे’ने टाळ मृदुंगाच्या गजरावर धरला ठेका, Video व्हायरल..

“भेटला विठ्ठल माझा”, म्हणत ‘आई कुठे काय करते’ फेम ‘अश्विनी महांगडे’ने टाळ मृदुंगाच्या गजरावर धरला ठेका, Video व्हायरल..

‘आषाढी वारी’ आपल्या राज्याचा सर्वात मोठा आणि सांस्कृतिक उत्सव आहे. आपले सर्व कामं बाजूला ठेवत काही दिवस देहू-आळंदी ते पंढरपूर हि वारकरी मंडळी भक्तीच्या रसात गुंग होऊन चालत जातात. माघील दोन वर्ष कुरच्या पार्श्वभूमीवर वारी झाली नाही.

त्यामुळे यंदा अनेक वारकरी आपल्या विठ्ठलाला भेटायला निघाले आहेत. या भक्तीच्या सोहळ्यात एकदा तरी गुंग व्हावे अशी अनेकांची इच्छा असते. कारण ‘आषाढी वारी’ हाच आपल्या राज्याची खरी संस्कृती आहे. या वारीला अनेक राजकारणी, उद्योजक आणि कलाकारसुद्धा आवर्जून हजेरी लावतात.

मात्र सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय हालचालींमुळे सर्वच राजकारण्यांना वारीचा विसर पडल्याचं बघायला मिळत आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी सलग दोन दिवस संत तुकाराम महाराजांच्या पालखीत जाऊन पायी वारी करण्याचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी तुळशी वृंदावन डोक्यावर घेत भक्तीचा गजरात ठेकाही धरला.

इतकच काय तर दरवर्षी प्रमाणे त्यांनी या वर्षी देखील फुगडी खेळत वारीच्या भक्तीरसाचा आनंद घेतला. त्यांचे वारीतील फोटोज आणि व्हिडियोज सध्या सगळीकडेच वायरल होत आहेत. वारीच्या सुरुवातीच्याच दिवशी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने देखील वारीमध्ये आपला सहभाग नोंदवला होता. प्राजक्ताने देखील वारीमध्ये सहभागी होत भक्तीचा आनंद घेतला.

आता अजून एका मराठी अभिनेत्रीला वारीमध्ये जाण्याचा मोह टाळता आला नाहीये, या भक्तीच्या रसात स्वतःला झोकून देत ही अभिनेत्री काही काळासाठी स्वतः वारकरीच बनली. ही अभिनेत्री अजून कोणी नसून ‘आई कुठं काय करते’ फेम अश्विनी महांगडे आहे. अश्विनी महांगडेने स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत तिने, छत्रपती संभाजी महाराजांच्या बहिणीची म्हणजेच रानुअक्का ची भूमिका साकारली होती.

राणू आक्का च्या भूमिकेला प्रेक्षकांची प्रचंड दाद मिळाली. त्यानंतर तिने आई कुठे काय करते या मालिकेत ती काम करत आहे. एक यशस्वी अभिनेत्री असली तरीही अश्विनी स्वतःला शेतकरी म्हणवून घेते. वारीमध्ये अधिक तर शेतकरीवर्गच आपल्याला बघायला मिळतो. म्हणून यावेळी अश्विनी वारकऱ्यांसोबत अगदी एकरूप झाल्याच पाहायला भेटलं.

अस्सल मराठमोळी पेहराव म्हणजेच जरीची सुंदर अशी नऊवार साडी आणि त्यावर भरजरीत शॉल, सुंदरसा मेकअप आणि मोजकेच दागिने यामुळे अश्विनीचे सौंदर्य अधिकच खुलून आलं. वारकऱ्यांबरोबर अश्विनीनं हरिभजनाच्या गजरात ठेका धरला. अश्विनी महांगडे हिने तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहे.

तिच्या या फोटो आणि व्हिडीओंना चाहत्यांची चांगलीच पसंती दर्शवली आहे. तुळशी वृंदावन डोक्यावर घेत विठूमाऊलीचा गजर करत आणि टाळ मृदुंगाच्या गजरात जय हरिनामाचा गरज करत तिनं पारंपरीक भजनांवर ठेका धरल्याचे या व्हिडियोमध्ये बघायला मिळत आहे. अनेकांनी तिच्या फोटोवर पसंती दर्शवत तिचं कौतुक केलं आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.