शेवटच्या 3 दिवसात ‘असे’ झाले होते ‘सुशांतचे हाल ! हाऊस हेल्परने केले अनेक धक्कादायक ‘खुलासे’ !

शेवटच्या 3 दिवसात ‘असे’ झाले होते ‘सुशांतचे हाल ! हाऊस हेल्परने केले अनेक धक्कादायक ‘खुलासे’ !

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत.

34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याच्या निधानानंतर पोलीस त्याच्या मृत्यूचा तपास करत आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, सुशांतच्या हाऊस हेल्पनं त्याच्या अखेरच्या दिवसातील त्याच्या स्थितीचा खुलासा केला आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार पोलिसांच्या चौकशीत सुशांतच्या हाऊस हेल्पनं चकित करणारे खुलासे केले आहेत. सुशांत गेल्या 10 दिवसांपासून खूप अपसेट होता. गेल्या 3 दिवसांपासून तो अजिबात ठिक नव्हता. ते कोणाशी बोलतही नव्हता अशी माहिती आहे.

या रिपोर्टमध्ये असाही उल्लेख आहे की, सुशांतचा हाऊस हेल्प म्हणाला की, सुशांत यांनी आम्हाला सांगितलं होतं की, त्यांनी सर्व उधारी मिटवली आहे. परंतु ते आता आमची सॅलरी देऊ शकतील की नाही हे मात्र सांगू शकत नाही. रिपोर्टमध्ये असाही उल्लेख आहे की, दीर्घकाळापासून सुशांत डिप्रेशनमध्ये होता.

हिंदूजा हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचारही सुरू होते. कथितपणे त्यानं शेवटचा फोन कॉल त्याच्या बहिणीला आणि पवित्र रिश्तामधील त्याचा कोस्टार महेश शेट्टीला केला होता.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *