आहारात बदल केल्याने नियंत्रणात राहील रक्तदाब.. असा घ्या आहार

सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक तरुण-तरुणींना मोठ्या प्रमाणात रक्तदाबाची समस्या जाणवू लागली आहे. तसेच सध्या कोरोनाची मोठी साथ चालू आहे. त्यामुळे अनेकांना आजारापासून जपावे लागणार आहे. हायब्लडप्रेशरमुळे अनेक व्याधी होताहेत. चुकीच्या आहारामुळे तरुणांचे कोलेस्ट्रॉल वाढत आहे. यामुळे हृदयविकाराचा धोका संभवतो. योग्य आहार घेतल्यास रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो.
पावसाळ्यामध्ये अनेकदा तळलेल्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश असतो. यामुळे शरीरातील मिठाचा स्तर हा मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे रक्तदाबही वाढायला लागतो. परिणामी शरीराच्या नसा ताठर होतात. रक्ताच्या गाठी होण्याचा धोका असतो. यामुळे कोलेस्ट्रॉल देखील वाढते आणि उच्चरक्तदाबाचा धोका होतो.
रक्तदाब नियंत्रणासाठी करायचे उपाय
१. उच्चरक्तदाबाचा रुग्णांनी पावसाळ्यामध्ये तळलेले पदार्थ अधिक खाऊ नये. तसेच ज्यामध्ये मीठ कमी आहे, असा आहार घेतला पाहिजे. यामुळे शहरातील सोडियमचा स्तर सामान्य राहतो. तसेच ज्यामुळे तुमचे उच्च रक्तदाबावर नियंत्रण राहते.
२. आहारामध्ये सातत्याने ताजी फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचे नियमित सेवन करणे अतिशय लाभदायक आहे. कमी फॅट असलेल्या कडधान्याचा या ऋतूंमध्ये आहारात समावेश करावा.त्यामुळे देखील तुमच्या कोलेस्ट्रॉल कमी प्रमाणात राहते.
३. हिवाळ्यात नेहमीच तळलेल्या पदार्थाचे सेवन करू नये. उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णांसाठी हे पदार्थ अतिशय हानिकारक मानले गेले आहेत. तेलकट पदार्थापासून दूर राहणे अधिक फायद्याचे आहे.
४. अनेकदा गोड पदार्थ आणि मांसाहार करण्याकडे अशा रुग्णांचा कल असतो. मात्र, उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी गोड आणि चिकन, मटन हे पदार्थ आवर्जून टाळावेत. यामुळे देखील कोलेस्ट्रॉल वाढून तुमचे ब्लडप्रेशर वाढू शकते.
५. बदाम आणि अक्रोडचा नियमित आहारामध्ये समावेश करा. दररोज कमीत कमी पाच बदाम व ४ अक्रोड खावे. यातील ओमेगा-3 ऍसिड रक्तदाब सामान्य करण्यात लाभदायक आहे. त्यामुळे नियमितपणे याचे सेवन करत जा.
६. कुठलाही आजार कमी करायचा असल्यास तुमचा नियमितपणे व्यायाम असणे आवश्यक आहे नियमितपणे व्यायाम केल्यामुळे रक्तदाब होत नाही त्यामुळे नियमित व्यायाम करावा.