अक्षय कुमारला चित्रपट नाही तर जाहिरातींनी केले ‘मालामाल’, पहा एका जाहिरातीसाठी अक्षय घेतो ‘इतके’ कोटी रुपये…

बॉलीवूड मध्ये जेव्हा एखादा चित्रपट हिट होत तेव्हा त्या कलाकाराला अनेक प्रकारच्या ऑफर येऊ लागतात. त्यामध्ये टेलिव्हिजनवर दिसणाऱ्या ऍडचा देखील समावेश असतो. या ॲड करण्यासाठी ऍड कंपनी त्या कलाकाराला अतिशय दांडगे मानधन देत असते.
पण हे सगळं त्या कलाकाराच्या प्रसिद्धी आणि लोकांमध्ये असणाऱ्या इमेजवर अवलंबून असते. त्यानुसार त्या कलाकाराला मानधन मिळते। सध्याच्या घडीला रणवीर सिंग आणि अक्षय कुमार जास्त प्रमाणात टेलिव्हिजनच्या ॲड करताना दिसतात पण तुम्हाला माहित आहे का अक्षय कुमारला एक ॲड करण्यासाठी किती मानधन मिळते?
तेच आपण आज जाणून घेणार आहोत कारण फोबर्सने जाहीर केलेल्या यादीमध्ये अक्षय कुमार चा देखील समावेश करण्यात आला आहे. या यादीत तो सहाव्या क्रमांकावर आहे.
फोर्ब्स 2020 ची सर्वात जास्त मानधन घेणा-या अभिनेत्यांची यादी समोर आली आहे. या यादीची खास बाब म्हणजे या यादीत जागा मिळवणारा अक्षय कुमार हा एकुलता एक बॉलिवूड अभिनेता आहे. तो 48.5 मिलियन डॉलर म्हणजेच 362 कोटी रूपयांच्या कमाईसोबत या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.
अक्षय वर्षाला चार-पाच सिनेमे करतो, यातून त्याने ही कमाई केली असेल, असे तुम्हाला वाटत असेल तर ते मात्र चूक आहे. होय, ऐकून आश्चर्य वाटेल पण अक्षयच्या कमाईत चित्रपटांपेक्षा तो करत असलेल्या जाहिरातींचा वाटा मोठा आहे.
सध्या अक्षय कुमार 30 ब्रँडच्या जाहिराती करत आहे. यात कंज्युमर प्रॉडक्टपासून तर लक्झरी उत्पादनांचा समावेश आहे. एका जाहिरातीसाठी अक्षय प्रतिदिन 2 ते 3 कोटी रूपये घेतो. Duff & Phelpsचे मानात तर त्याची ब्रँड व्हॅल्यू 742 कोटींच्या घरात आहे.
अक्षय कुमार बॉलिवूडचा सगळ्यांत बिझी अभिनेता आहे. 2019 मध्ये त्याचे चार सिनेमे रिलीज झाले होते आणि हे चारही सिनेमे हिट होते. यातील ‘केसरी’ने 153 कोटींची कमाई केली होती. ‘मिशन मंगल’ने 200 कोटींचा गल्ला जमवला होता. तिसरा सिनेमा ‘हाऊसफुल 4’ने 204 कोटी आणि ‘गुड न्यूज’ या पाचव्या सिनेमाने 201 कोटी रूपयांचा बिझनेस केला होता.
चालू वर्षांतही अक्षयचे चार सिनेमे रिलीज होणार होते. मात्र कोरोना महामारीमुळे चित्रपटगृहे बंद असल्याने ते रिलीज होऊ शकले नाही. यापैकी काही सिनेमे लवकरच ओटीटीवर रिलीज होत आहेत. सध्या त्याचे अनेक सिनेमे पाइपलाईनमध्ये आहेत. तूर्तास अक्षय यूकेमध्ये त्याच्या ‘बेल बॉटम’ सिनेमाचे शूटींग करत आहे. तर त्याचे लक्ष्मी बॉम्ब , सूर्यवंशी , पृथ्वीराज , अतरंगी रे हे सिनेमे रिलीजच्या प्रतिक्षेत आहेत.