आपण कुठले खाद्य तेल वापरता ?, तिळासह ‘हे’ तेल आहारात वापरून पहा, शरीरात घडतील अद्भुत बदल..

दैनंदिन जीवनामध्ये आपण खाद्य तेल नियमितपणे वापरतो. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फॅट असतात. त्यामुळे तुमचे कोलेस्ट्रॉल वाढते आणि हृदयासंबंधी आजार तुम्हाला जडू शकतात. आपले शरीर फिट ठेवण्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये आपण चांगल्या तेलाचा वापर केला पाहिजे. या लेखामध्ये आपण कुठल्या खाद्य तेलाचा वापर केला पाहिजे ते पाहूया.
1. जवसाचे तेल: हे तेल ओमेगा 3 चा उत्तम स्त्रोत आहे, यामध्ये फायबर आणि प्रथिने देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. हृदय निरोगी राखण्यासाठी जवसाचा वापर अत्यंत फायदेशीर ठरतो, अनियमित खानपान आणि चरबीयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने ह्रदयरोगाचा धोका वाढतो. जवसामध्ये आढळून येणारी ओमेगा थ्री फॅटी ऍसिड रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊ देत नाही, जवसाचे तेल फॅट रहित असल्यामुळे हृदयासाठी देखील फायद्याचे आहे.
2. मोहरीचे तेल: मोहरी संशोधन तथा संवर्धन एमआरपीच्यामते मोहरीचे तेल हृदयविकाराची जोखीम 70 टक्क्यांपर्यंत कमी करते आणि संतुलित आवश्यक फॅटी ऍसिड गुणोत्तर आणि जीवनाची गुणवत्ता वाढते. याचा वापर केल्याने रोगप्रतिकारक्षमता देखील वाढते, तसेच शरीर अनेक प्रकारच्या संसर्गापासून दूर राहण्यास मदत मिळते.
3. बदामाचे तेल: बदामाच्या तेलाचा दररोज वापर केल्याने आपले शरीर फिट राहण्यास मदत मिळते, बदाम खाल्ल्याने मेंदू निरोगी राहतो. एका संशोधनानुसार बदामाच्या तेलाचा दररोज वापर करणे बुद्धी आणि धमन्यांसाठी फायदेशीर ठरते, त्यामुळे पोटाचे विकार बरे होण्यापासून आतड्याचा कॅन्सर पासूनही बचाव होतो. बदामाच्या तेलाचे नियमित सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते.
4. ओलिव ऑइल: यात असलेली फॅटी ऍसिडचे पुरेसे प्रमाण ऋदय रोगाचे धोके कमी करते. तेलामध्ये अतिरिक्त चरबीचे प्रमाण कमी असते. यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची संतुलन कायम राहतील, सोबतच सर्व हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका देखील कमी होतो.
5. तिळाचे तेल: काळे आणि पांढरे तिळापासून हे तेल काढले जाते, हे तेल मॅग्नेशियम, कॅल्शियम प्रोटीन आणि फॅट वरचा खूप चांगला स्त्रोत आहे. तिळाचे तेल आरोग्यासाठी खूप गुणकारी असते, यांच्या सेवनामुळे उच्च रक्तदाब नियंत्रण करण्यामध्ये मदत होते. सोबतच कोलेस्ट्रॉलचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी याची मदत होते. त्यामुळे हृदय विकार असलेल्यांनी तिळाच्या तेलाचा वापर करावा असा सल्ला नियमित दिला जातो.