पदभार गेल्यानंतर रवी शास्त्रींनी टाकला बॉ’म्ब ! म्हणाले; कोहलीनं कर्णधार पद वर्कलोडमूळे सोडले नाही, तर ड्रेसिंग रूममध्ये..

पदभार गेल्यानंतर रवी शास्त्रींनी टाकला बॉ’म्ब ! म्हणाले; कोहलीनं कर्णधार पद वर्कलोडमूळे सोडले नाही, तर ड्रेसिंग रूममध्ये..

माघील काही दिवसांपासून, क्रिकेटविश्वामधे चांगलीच खळबळ सुरु असल्याचं बघायला मिळत आहे. आपल्या देशातील क्रिकेटविश्वामधे तर एका पाठोपाठ एक असे मोठाले धक्के बसतच आहे. आयपीएल असेल किंवा बीसीसीआय असेल सगळीकडेच, क्रिकेटपटू वेगवेगळे निर्णय घेत मोठाले धक्के क्रिकेटप्रेमींना देत आहेत.

आयपीएलचे सामने सुरु होण्यापूर्वीच, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने एक ट्विट केले होते. आपल्या ट्विटमध्ये त्याने, बंगलोरच्या संघाच्या आणि भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर, सगळीकडे एकच गोंधळ उडाला होता. रनमशीन विराट कोहलीचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.

त्यामुळे, विराट कोहली खऱ्या अर्थाने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार बनण्यास योग्य आहे असंच अनेकांचे मत आहे. मात्र, दुसरीकडे रोहित शर्माचा खेळ दिवसेंदिवस उत्तम होतच राहिला आणि कर्णधारपदाची धुरा त्याच्याकडे असावी असे काही जणांचे मत बनू लागले. त्यामुळे अनेक दिवसांपासून, रोहित आणि विराट दोघांमध्ये अबोला असल्याच सांगितलं जात होत.

इतकंच नाही तर, भारतीय क्रिकेट संघ, रोहित आणि विराट अशा दोन गटांमध्ये विभाजल असल्याचं देखील बोललं जात होत. त्यातच, विराट कोहलीने टी-२० सामन्यांमध्ये, आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. त्यानंतर, तर भारतीय क्रिकेट संघातील दोन गटांची आणि रोहित व विराट मधील अबोल्याची चर्चा उघडपणे सगळीकडे होऊ लागली.

ड्रेसिंग रूमचे वातवरण, जसे हवे तसे राहत नाहीये. त्याचा परिणाम खेळावर होतो, असं देखील काहींच मत होत. आणि आता, एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये रवी शास्त्री यांनी मोठा खुलासा केला आहे. ‘ड्रेसिंग रूममध्ये असलेल्या वादामुळे, विराट कोहलीने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला,’ असं रवी शास्त्री यांनी सांगितले आहे.

याबद्दल बोलताना रवी शास्त्री म्हणाले की,’विराट कोहली एक उत्तम खेळाडू आहे. तो कामाच्यावेळी कितीही दबाव सहन करू शकतो. मात्र, ड्रेसिंग रूममध्ये असणारा वाद निराशाजनक ठरतो. अनेक खेळाडू कोहलीच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात. यामध्ये काही सिनियर तर काही ज्युनियर खेळाडू देखील आहेत. म्हणून, कोहलीने हा निर्णय घेतला.’

त्यावर, विराटने घेतलेला हा निर्णय योग्य आहे कि चुकीचा हे विचारल्यावर, रवी शास्त्री म्हणाले, ‘करियरमध्ये चढ उतार येतच असतात. ते कोणालाच चुकले नाही. आणि जर सतत वादच होत असतील, तर ते वाद टाळण्यासाठी आपणहून बाजूला होणे योग्यच ठरते.’ पण रवी शास्त्रींनी केलेल्या या खळबळजनक खुलास्यामुळं सगळीकडेच चर्चाना उधाण आले आहे.

विराट आणि रोहित यांच्यामध्ये असा नक्की काय वाद होता की, त्यामुळे कोहलीने थेट आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. ड्रेसिंग रूममध्ये, नक्की काय वाद पेटला याबद्दल कोणतेही वक्तव्य देण्याचे रवी शास्त्रींनी टाळले. मात्र, विराट कोहली आणि संघातील इतर सिनियर खेळाडूंमध्ये वाद होता हे आता समोर आले आहे.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published.