‘लगीर झालं जी’मधील अभिनेत्रीची ‘देवमाणूस-२’ मध्ये होणार धडाक्यात एंट्री? साकारणार महत्वाची भूमिका..!

‘लगीर झालं जी’मधील अभिनेत्रीची ‘देवमाणूस-२’ मध्ये होणार धडाक्यात एंट्री? साकारणार महत्वाची भूमिका..!

सध्या ओटीटी आणि मिनी सिरीजचा जमाना आहे. ओटीटी वरती अनेक मिनी सिरीज प्रेक्षकांना बघायला मिळतात. काहीच भागांच्या या सीरिजमध्ये कथानक उत्तम प्रकारे दाखवण्यात येते आणि त्यांचा शेवटही लवकर होतो. त्यामुळे इतर मालिकांच्या तुलनेत ओटीटी प्लॅटफॉर्मची लोकप्रियता सध्या चांगलीच वाढत आहे.

मात्र काही मेकर्सने मिनी सिरीज आणि मालिका यांची चांगलीच सांगड घातली आहे. असे समीकरण माघील कित्येक वर्षांपासून हॉलीवूड, कोरियन आणि इतर भागांमध्ये वापरण्यात येत होते. त्याच्या तुलनेत भारतामध्ये हे ट्रेंड थोडे उशिरा सुरु झाले. आणि खूप कमी मालिकांच्या मेकर्सला हे समीकरण जमत आहे.

असे समीकरण मात्र एका मराठी मालिकेच्या मेकर्सला योग्य प्रकारे जमलं. म्हणून तर तेच पुढे चालवत देवमाणूसचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. देवमाणूस या मालिकेचे पहिले पर्व अल्पावधीतच चांगलेच लोकप्रिय ठरले. उत्तम आणि हटके कथानक, जोडीला कलाकारांचा दमदार अभिनय, यामुळे ती मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली.

कथानकामध्ये आवश्यक असलेले रहस्य, थरार याची योग्य सांगड घातली होती. त्यामुळेच अनेक रोमांचकारी वळण देवमाणूस एक मध्ये प्रेक्षकांना बघायला भेटले. मालिकेला जास्त न खेचता मेकर्सने पहिल्या सीजनला संपवले. मात्र, पहिले ज्या सीजन वळणावरती संपले होते त्यावेळी अनेक प्रेक्षकांचा हिरमोड झाला होता.

अनेकांना अनपेक्षित असा शेवट बघायला मिळाला. तेव्हाच देवमाणूसचे दुसरे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल, याचे संकेत मिळाले होते. म्हणूनच या मालिकेचे दुसरे पर्व देखील सुरुवातीपासूनच चांगलेच लोकप्रिय ठरत आहे. पहिल्याच आठवड्यात या मालिकेने इतर मालिकांना मागे टाकत टीआरपीच्या चढाओढीत अव्वल स्थान प्राप्त केले आहे.

पहिल्या पर्वाच्या तुलनेत दुसऱ्या सीजनमध्ये कथानकाने अनेक रंजक वळण घेतले आहे. त्यातच आता एका नवीन पात्राची दमदार एन्ट्री या मालिकेत होणार आहे. बिग बॉस मराठी पर्व 3 मध्ये या मालिकेतील अभिनेत्री सोनाली पाटील झळकली होती. आता बिग बॉसचे पर्व संपले असून पुन्हा एकदा सोनाली पाटील देवमाणूस मध्ये दिसणार का?

सोडली पाटील देवमाणूसमध्ये पुन्हा एंट्री घेणार या चर्चा रंगलेल्या असतानाच ‘लागिर झालं जी’ या मालिकेतील अभिनेत्री देवमाणूस मध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेमध्ये जुन्या कलाकारांसोबत अनेक नवीन चेहरे बघायला मिळत आहे. याच नवीन चेहऱ्यांपैकी एक शिवानी घाटगे देखील आहे.

मालिकेच्या प्रोमोमध्ये देखील शिवानीची झलक बघायला मिळाली होती. मात्र अद्याप तिची मालिकेमध्ये इंट्री झाली नव्हती. लागीर झालं जी या लोकप्रिय मालिकेमध्ये, शिवानी घाटगेने शितलीच्या सुमन काकीची भूमिका साकारली होती. सुमन काकी हे पात्र देखील त्यावेळी चांगलेच प्रसिद्ध झाले होते आणि सोबतच शिवानी घाटगेची लोकप्रियता देखील चांगलीच वाढली होती. त्यामुळे आता देवमाणूस मध्ये शिवानी नेमकी कोणती भूमिका साकारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published.