अकोल्याचा ‘अभिजीत सारंगचा’ कसा झाला “कालीचरण” महाराज, अ’टक झाल्यानंतर माहिती आली समोर..

अकोल्याचा ‘अभिजीत सारंगचा’ कसा झाला “कालीचरण” महाराज, अ’टक झाल्यानंतर माहिती आली समोर..

छत्तीसगड येथील एका कार्यक्रमांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी अनुद्गार काढणाऱ्या कालीचरण महाराज याला छत्तीसगड पो’लिसां’नी गुरुवारी पहाटेच्या वेळी मध्यप्रदेशच्या खजुराहो येथून अट’क केली. छत्तीसगडमध्ये झालेल्या धर्म संसदेत कालीचरण याने गांधीजीवर आ’क्षेपा’र्ह टी’का केली होती. त्याचप्रमाणे नथुराम गोडसे याचे देखील कौतुक केले होते.

त्यानंतर सो’शल मी’डियावर याबाबतचा व्हिडिओ व्हा’यरल झाला आणि त्यांच्यावर टी’केचा भडिमार झाला. देशभरातून त्याच्यावर अनेकांनी टी’का देखील केली. त्याच्यावर पो’लिसां’नी दे’शद्रो’हाचा आ’रोप ठेवला आहे. गु’न्हा दा’खल झाल्यापासून रायपूर पो’लीस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो काही सापडत नव्हता. कालीचरण महाराजाने खजुराहो मधील विश्रामधाम बुक केले होते.

पण तेथून 25 किलोमीटर अंतरावरील एका जागेत त्याचा मुक्काम होता, असे सूत्रांनी माहिती दिली आहे. विशेष म्हणजे त्याच्यासह त्याच्या सगळ्यात सहकाऱ्यांनी आपले मोबाईल स्वीच ऑफ करून ठेवले होते. त्यामुळे त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. कालीचरण महाराज हा अकोल्याचा रहिवासी आहे. अत्यंत चाणाक्ष बुद्धी असलेल्या कालीचरण महाराज याने धार्मिक क्षेत्रात आपले नाव खूप कमावले आहे.

दरम्यान, कालीचरण महाराज याला अ’टक केल्यानंतर मध्य प्रदेशचे गृहमंत्री हे संतापले असून आपल्याला याबाबत काहीही माहिती देण्यात आली नाही आणि असे कसे काय अ’टक करू शकता, असा संताप गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी व्यक्त केला. कालीचरण महाराज हा मूळ अकोल्याच्या रहिवासी आहे. अकोला सारख्या छोट्या शहरातून त्याने देशभरात नाव कमावले आहे. म्हणून आज आम्ही त्याच्या बद्दल माहिती देणार आहोत.

अनेक वर्षे अकोल्यात काढल्यानंतर त्याने धार्मिक क्षेत्रामध्ये पदार्पण केले होते. त्याचे मूळ नाव अभिजित सारंग असे आहे. कालीचरण महाराज हा अकोल्यातील शिवाजीनगर भागातील भावसार पंच येथे राहतो. त्याच्या आईचे नाव सुमित्रा तर वडिलांचे नाव धनंजय सारंग आहे, अशी माहिती मिळाली आहे. कालीचरण याला लहानपणापासूनच अभ्यासाचा प्रचंड कंटाळा होता.

त्यामुळे त्यांनी आठवीपर्यंत शिक्षण घेऊन सोडून दिले. आई वडिलांनी त्याच्या शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले. मात्र, त्याचे शिक्षणात काही मन रमले नाही. लहानपणापासून धार्मिक वृत्ती असल्याने त्याने शाळा सोडली. त्यानंतर तो थेट इंदूर येथील आपल्या मावशीकडे राहण्यासाठी गेला. तेथे तो दिवंगत भय्यूजी महाराज यांच्या आश्रमात राहत होता.

नंतर त्याने धार्मिक दिक्षा घेतली आणि तो अभिजीत सारंगचा कालीचरण महाराज झाला. काही प्रवचन आणि व्याख्यानातून त्याला प्रसिद्धी मिळत गेली. त्यानंतर तो मोठा झाला. आता गांधीजी वरील व’क्तव्य करून तो देशात कुप्रसिद्ध झाला आहे. काही महिन्यांपूर्वी कालीचरण महाराज यांची एका टीव्हीने मुलाखत घेतली होती. या वेळी बोलताना त्याने सांगितले की, मला शिक्षणात अजिबात रस नव्हता.

त्यामुळे मला शाळेतही जाण्यात आवड निर्माण झाली नाही. तसेच मला शाळेत पाठवले असता मी खूप आ’जारी पडायचो. त्यामुळे पालक देखील कधीकधी मला घरी राहण्यासाठी संमती द्यायचे. अध्यात्मिक आवड असल्याने या क्षेत्राकडे वळलो असल्याचे त्याने सांगितले. तो कालीभक्त आहे. त्यामुळे त्याने कालीचरण असे नाव धारण केल्याचे सांगण्यात येते.

आपण कालीमातेला आई तर अगस्ती ऋषींना गुरु मानत असल्याचे तो सांगतो. काही वर्षांपूर्वी अकोल्यातल्या पुरातन असलेल्या महादेवाच्या मंदिरात त्याने शिवतांडव स्तोत्र म्हटले होते. याबाबतचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर कालीचरण महाराज हा एकदम प्रसिद्धीच्या झोतात आला होता.

महापालिकेच्या निवडणुकीत झाला पराभव
2017 मध्ये अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी कालीचरण महाराज हा उभा होता. मात्र, या निवडणुकीत कालीचरण महाराज याला पराभवाचा धक्का बसला होता. कालीचरण हा सर्वसामान्य कुटुंबातील होता. त्याचे वडील हे मेडिकल दुकान चालवतात.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.